शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

गौहरने पैसे देऊन श्रीमुखात मारुन घेतली ?

By admin | Updated: January 4, 2015 16:18 IST

गौहर खानने ज्यूनिअर कलाकाराला पैसे देऊन भर कार्यक्रमात स्वतःला मारहाण करायला लावली होती असा दावा गौहरला मारहाण करणा-या अकील मलिकने केला आहे.

ऑनलाइन लोकमत

मुंबई,  दि. ४ - अभिनेत्री आणि मॉडेल गौहर खानला श्रीमुखात लगावण्याच्या प्रकरणात आता नवीन खुलासा झाला आहे. गौहर खानने पैसे देऊन भर कार्यक्रमात स्वतःला मारहाण करायला लावली होती असा दावा गौहरला मारहाण करणा-या अकील मलिकने केला आहे. 
गेल्या महिन्यात एका रिएलिटी शोच्या शुटिंग दरम्यान शोची सूत्रधार गौहर खानला अकिल मलिकने श्रीमुखात लगावली होती. गौहर मुसलमान असूनही छोटे कपडे घालते असे मलिकने मारहाणीनंतर म्हटले होते. याप्रकरणी गौहरने पोलिसांकडे तक्रार दाखल केली असून पोलिसांनी मलिकला अटकही केली होती. मात्र आता या प्रकरणाला नवीन वळण मिळाले आहे.मारहाणीसाठी गौहरनेच पैसे दिले होते असा दावा मलिकने  एका वृत्तवाहिनीशी बोलताना केला. २८ नोव्हेंबरपूर्वी मला गौहर खान कोण आहे हेदेखील माहित नव्हते. २८ नोव्हेंबर रोजी शूटींग संपल्यावर गौहरला भेटायला गेलो व मला काही मिळवून देण्याची विनंती केली. यानंतर गौहरने मला दुस-यादिवळी सकाळी येऊन भेटायला सांगितले. दुस-या दिवशी सकाळी गौहरने दबंग ३ मध्ये काम मिळवून देण्याचे आश्वासन दिले व त्या मोबदल्यात रिएलिटी शोच्या शुटिंगमध्ये मला मारहाण कर असे सांगितले होते असा आरोपही मलिकने केला. मारहाणीनंतर मी तुझ्याविरोधात पोलिसांकडे तक्रार करीन पण पोलिसांनी तुझ्यावर कठोर कारवाई करु नये अशी विनंतीही पोलिसांना करीन असे गौहरने म्हटल्याचे मलिकने सांगितले. हे सर्व संभाषण तोंडी झाले होते असे मलिकने नमुद केले.