शहरं
Join us  
Trending Stories
1
काँग्रेसच्या झेंड्याला ठाकरेंच्या मताची काठी; तब्बल दहा वर्षानंतर लोकसभेसाठी काँग्रेसला मुंबईत खाते उघडण्याची संधी
2
पैशांच्या अवैध वाहतुकीवर तिसरा डोळा; निवडणूक आयोगाचे मुंबई आणि परिसरातील रेल्वे स्थानकांवर विशेष लक्ष
3
भर समुद्रात पाकच्या बोटीवरून ६०० कोटींचे ड्रग्ज जप्त; भारतीय तटरक्षक दल, एटीएस व एनसीबीची मोठी कारवाई
4
निवडणुकीत जातीपातीच्या जाणिवा टोकदार ; एकाच जातीचे उमेदवार; तिथे पाहतात पोटजात
5
ठाण्यातील ‘त्या’ सव्वातीन लाख मतांचे मालक कोण? अजित की शरद पवार?
6
देवेगौडांचा नातू ‘सेक्स स्कँडल’मध्ये; विदेशात पलायन? एसआयटी चौकशी
7
साताऱ्यातील प्रचारात मुंबई बाजार समितीतील भ्रष्टाचाराचा मुद्दा ‘हॉट’ ; उदयनराजे भोसले आणि शशिकांत शिंदे यांच्यात थेट लढत
8
1 मे ध्वजारोहण : उमेदवार मंत्री वगळले, पण नातलग ?
9
राष्ट्रीय स्वयंसेवक संघ नेहमीच आरक्षणाचा समर्थक राहिला : मोहन भागवत
10
मोटारीला चपलांचा हार आणि आरोप-प्रत्यारोपांचे प्रहार; जरांगे पाटलांनी केला आरोप
11
यापूर्वीही आरक्षणाला संघाचा विरोध : राहुल गांधी
12
तरुणाई का संतापली? निराश तरुण मतदानाकडेच पाठ फिरवताना दिसताहेत
13
निवडणूक आहे, जिभेला लगाम घाला !
14
दुबईत साकारतेय जगातील सर्वात मोठे विमानतळ; प्रथमच नवीन विमान वाहतूक तंत्रज्ञानाचा होणार वापर
15
त्यांच्या कारकिर्दीत ‘ते’ म्हणतील ते सगळं केलं, आता भावनिक व्हायच नाही; अजित पवारांचा वार
16
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
17
बारामती, शिरुरमध्ये पोलिसी बळाचा वापर, मतदारांना धमक्या; संजय राऊतांचा गंभीर आरोप
18
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
19
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
20
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी

उत्तर प्रदेशातील हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये स्फोट; परिसरात खळबळ

By ऑनलाइन लोकमत | Published: September 12, 2019 12:42 PM

आसपासच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना

उन्‍नाव: हिंदुस्तान पेट्रोलियमच्या गॅस प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आहे. यामुळे एक टाकी फुटल्याची माहिती समोर येत आहे. उत्तर प्रदेशातील उन्नावमध्ये असलेल्या दहीचौकी परिसरात झालेल्या स्फोटानंतर परिसरात खळबळ माजली. यानंतर अग्निशमन दलाच्या गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या स्फोटात कोणतीही जीवितहानी झालेली नाही. या स्फोटानंतर आसपासच्या गावांना सतर्क राहण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत.  स्फोट झाल्यानंतर प्लांटमध्ये आग लागली. यावेळी अनेक जण प्लांटमध्ये काम करत होते. त्यामुळे बरेच कर्मचारी आतमध्ये अडकले असण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. सध्या घटनास्थळी अग्निशमन दलाच्या गाड्या दाखल झाल्या आहेत. गॅसची टाकी फुटल्यानं परिसरात एकच घबराट पसरली. त्यामुळे पाच किलोमीटर परिसरातील गावांमध्ये अलर्ट जारी करण्यात आला आहे. आवश्यकता भासल्यास गावं रिकामी करावी लागू शकतात, अशा सूचना ग्रामस्थांना देण्यात आल्या आहेत. स्फोटाची माहिती मिळताच प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. आग विझवण्यासाठी लखनऊवरुन फोम टेंडर्स पाठवण्यात आले आहेत. उन्नाव, कानपूर आणि लखनऊमधील अग्निशमन दलाचे जवान घटनास्थळी असून आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू आहेत. वॉल्व्ह लीक झाल्यानं गॅस प्लांटमध्ये मोठा स्फोट झाला आणि त्यामुळे आग लागल्याची माहिती समोर येत आहे. 

टॅग्स :Uttar Pradeshउत्तर प्रदेशBlastस्फोट