गंगा माता तिच्या मुलाला शोधत आहे, नितीश कुमारांचा मोदींना टोला

By Admin | Updated: February 26, 2017 10:49 IST2017-02-26T10:49:32+5:302017-02-26T10:49:32+5:30

बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं. म्हणाले गंगा माता तिच्या मुलाला शोधत आहे

Ganga Mata is searching for her son, Nitish Kumar's rally in Modi | गंगा माता तिच्या मुलाला शोधत आहे, नितीश कुमारांचा मोदींना टोला

गंगा माता तिच्या मुलाला शोधत आहे, नितीश कुमारांचा मोदींना टोला

>ऑनलाइन लोकमत
पाटणा, दि. 26 - बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनी पंतप्रधान मोदींना लक्ष्य केलं आहे.  ‘गंगा मातेने बोलवले आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणतात, पण आम्ही वाराणसीला गेलो त्यावेळेस लोकं सांगत होती की गंगा माता तिच्या मुलाला शोधत आहे. असं आपल्या शैलीत म्हणत त्यांनी मोदींना टोला लगावला. 
 
पाटणामध्ये गंगा नदीच्या स्वच्छतेबद्दल आयोजीत एका कार्यक्रमात बोलताना नितीश यांनी मोदींवर निशाणा साधला. 2014 लोकसभा निवडणुकीतील  विजयानंतर  गंगा मातेने बोलावलं आहे असं मोदी म्हणाले होते. 
 
यापुर्वी राष्ट्रीय जनता दलाचे अध्यक्ष लालू प्रसाद यादव यांनीही पंतप्रधान मोदींवर गंगा नदीच्या मुद्दयावरून टीका केली होती. गंगा माता केव्हा बोलावते का?,’ असं म्हणत त्यांनी मोदींची खिल्ली उडवली होती. 
 

Web Title: Ganga Mata is searching for her son, Nitish Kumar's rally in Modi