शहरं
Join us  
Trending Stories
1
पश्चिम बंगालमधील हिंसाचार शिगेला! सुवेंदू अधिकारी यांच्या PA वर गोळीबार; उपचारादरम्यान मृत्यू
2
इराणशी डील करतोय हे ट्रम्प यांनी सांगितलेच नाही; इस्रायल म्हणतोय, “आम्ही हल्ले सुरू ठेवणार”
3
महाराष्ट्रात पॅटर्न तामिळनाडूत होणार? विजयला सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी DMK-AIADMK एकत्र येणार?
4
SRH vs PBKS : सनरायझर्स हैदराबादची अव्वल कामगिरी! ‘त्या’ तीन चुकांमुळे पंजाब किंग्सचा पराभव
5
“काँग्रेसमध्ये आमचे अनेक धुरंधर आहेत, ६ जण निवडूनही आलेत”; हेमंत बिस्वा सरमांचे मोठे विधान
6
Abhishek Sharma Record : १३ चेंडूत ३५ धावा! वादळी खेळीसह अभिषेक शर्मानं मोडला ख्रिस गेलचा विक्रम
7
मुलीच्या पाठवणीनंतर काळाचा घाला! यमुनेत नाव उलटून ९ जण बुडाले; तीन सुरक्षित बाहेर, ६ जणांचा शोध सुरू
8
एका मताची ताकद! माजी मंत्र्याचा धक्कादायक पराभव; तिरुपत्तूरच्या निकालावर आनंद महिंद्रांनी सोशल मीडियावर काय लिहिलं?
9
IPL New Record : क्लासेन-ईशानचा शानदार शो! सनरायझर्स हैदराबादनं केली मुंबई इंडियन्सची बरोबरी
10
गुड न्यूज...! पेट्रोल, डिझेल अन् घरगुती गॅसचे दर स्थिर राहणार...; जागतिक संकटानंतरही मोदी सरकारची मोठी घोषणा
11
शेजारच्या बाईने माझ्याविषयी अफवा पसरवली;पर्वती प्रकरणात आजोबांचा दावा; कोर्टात नेमकं काय घडलं ?
12
पराभव होताच ममतांच्या निकटवर्तीयांचे 'एक्झिट'! ज्या IAS अधिकाऱ्यासाठी घेतली होती PM मोदींशी टक्कर; त्यांनीही दिला राजीनाम!
13
“११८ आमदारांचा पाठिंबा असलेले पत्र घेऊन या”; राज्यपाल-विजय भेटीत काय घडले? TVKचे तोंडी बहुमत!
14
SRH vs PBKS : झेल सोडण्याचा कहर! शशांक सिंगची पुन्हा मोठी चूक; चहलसह पॉटिंगही शॉक (VIDEO)
15
मध्य रेल्वेवरील पहिल्या नॉन-AC लोकलची चाचणी मुंबईत होणार नाही, थेट उत्तर प्रदेशात! कारण काय?
16
पश्चिम बंगालमध्ये भाजप देणार महिला मुख्यमंत्री? 'या' नावांची जोरदार चर्चा, ९ मे रोजी शपथविधी
17
युद्धाचे ढग विरणार? अमेरिका आणि इराणमध्ये ऐतिहासिक कराराची तयारी; पुढच्या ४८ तासांत होणार मोठा फैसला!
18
IPL 2026, SRH vs PBKS: पंजाब किंग्सचे खेळाडू 'काळ्या फिती' बांधून का उतरले मैदानात? जाणून घ्या त्यामागचं कारण
19
तामिळनाडूमध्ये काँग्रेसची 'दिल्ली'सारखी चूक? विजयला पाठिंबा देण्याच्या निर्णयावरून 'त्या' पुनरावृत्ती भीती
20
West Bengal Violence : २०० हून अधिक FIR, ४३३ जणांना अटक; बंगाल निवडणुकीनंतर हिंसाचार, पोलिसांची मोठी कारवाई
Daily Top 2Weekly Top 5

बिअरच्या कॅनवर गांधीजींचे छायाचित्र, अमेरिकेतील कंपनीचा प्रताप

By admin | Updated: January 4, 2015 13:04 IST

जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे.

ऑनलाइन लोकमत 

हैद्राबाद,दि. ४ - जीवनभर दारुविरोधात संघर्ष करणारे महात्मा गांधी यांचे छायाचित्र अमेरिकेतील मद्य उत्पादक कंपनीने त्यांच्या बिअरच्या कॅनवर छापल्याचा संतापजनक प्रकार समोर आले आहे. संबंधीत कंपनीविरोधात हैद्राबादमधील न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली असून यानंतर कंपनीने माफी मागत वादावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला आहे. 
अमेरिका स्थित न्यू इंग्लंड ब्रूईंग कंपनी या कंपनीने राष्ट्रपिता महात्मा गांधीजींच्या नावे अमेरिकेतील बाजारपेठेमध्ये 'गांधी बोट' ही बिअर आणली आहे. गांधींजींप्रमाणे ही बिअरही शाकाहारी असून आत्म शुद्धिकरण आणि सत्याच्या शोधात असलेल्यांसाठी ही बिअर उपयुक्त आहे अशी जाहिरातबाजीही या कंपनीने सुरु केली होती. हा प्रकार समजताच त्याचे तीव्र पडसाद भारतात उमटले. हैद्राबादमधील एका वकिलाने न्यायालयामध्ये कंपनीविरोधात याचिका दाखल केली होती. महात्मा गांधीजींचे छायाचित्रांचा अशा कामासाठी वापर करणे दंडनीय अपराध असून यामुळे राष्ट्रभावना दुखावल्याचा आरोप याचिकाकर्ते वकिल जनार्दन रेड्डी यांनी केला होता. याप्रकरणी उद्या सुनावणीही होणार आहे.  भारतात तीव्र पडसाद उमटताच कंपनीला जाग आली असून कंपनीने या कृत्यांसाठी भारतीयांची माफीही मागितली आहे.