शहरं
Join us  
Trending Stories
1
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
2
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
3
US Israel Iran War : अरबी समुद्रात अमेरिकेचा थरार! इराणचे तेल घेऊन जाणारे जहाज रोखले; आतापर्यंत ३७ जहाजे परत पाठवली
4
शुभेंदू अधिकारी यांच्या सभेत घडलं असं काही, हाकेच्या अंतरावर असलेल्या ममता बॅनर्जी भडकल्या, थेट सभा सोडून निघून गेल्या
5
मुकेश अंबानींच्या Reliance ने इतिहास रचला; असा कारनामा करणारी देशातील पहिली कंपनी...
6
तमिळ अभिनेत्री अक्षया हरिहरनच्या नावे बोगस मतदान! पोलिंग बूथवर उडाली खळबळ; कोर्टात जाणार...
7
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
8
दिल्ली विमानतळावर अपघात! २३२ प्रवाशांना घेऊन जाणाऱ्या स्विस एअरच्या विमानाच्या इंजिनला आग; ६ जण जखमी, धावपट्टी बंद
9
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
10
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
11
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
12
IPL मध्ये अडखणाऱ्या मुंबई इंडियन्ससाठी गुडन्यूज, ‘या’ सामन्यातून रोहित शर्मा करणार कमबॅक
13
त्याच हॉटेलमध्ये राष्ट्राध्यक्षांवर ४५ वर्षांपूर्वी झालेला गोळीबार; डोनाल्ड ट्रम्प थोडक्यात बचावले, पण...
14
पाकिस्तानने इव्हेंट बनवून ठेवला...! अमेरिका चर्चेसाठी जाणार नाही, दौरा रद्द; इराणचे परराष्ट्रमंत्री कधीचेच निघाले...
15
संरक्षण क्षेत्रात भारताची आघाडी! रशियाच्या जुन्या भागीदाराला मिळाली साथ; पुतिनही हैराण
16
अशोक खरातचे आणखी 'काळे कारनामे' उघड! ऑफिसबॉयनंतर कुकनेही उडवली झोप; फार्महाऊसमधील कृत्य एसआयटीच्या हाती
17
कोणत्याही क्षणी काश पटेल यांचे FBI संचालक पद जाणार? ट्रम्प प्रशासनामध्ये खळबळ, गच्छंतीची शक्यता
18
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
19
Credit Card : क्रेडिट कार्ड वापरताय? गरजेपेक्षा जास्त खर्च करणं पडेल महागात; थेट Income Tax ची नोटीस येण्याची शक्यता
20
साप्ताहिक राशीभविष्य: ७ राशींना शानदार, उत्साह वाढेल; पद-पैसा-चांगला लाभ, पण आरोग्य सांभाळा!
Daily Top 2Weekly Top 5

"दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं"; आर्किटेक्टच्या लेकीने फोडला टाहो

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 21, 2024 14:07 IST

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे.

जम्मू-काश्मीरच्या गांदरबलमध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यात ७ जणांचा मृत्यू झाला आहे. या हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या आर्किटेक्ट शशी भूषण अबरोल यांच्या कुटुंबीयांनी सांगितलं की, पत्नीने करवाचौथचा उपवास ठेवला होता आणि ती व्हिडीओ कॉल करत होती, मात्र शशी यांनी फोन उचलला नाही. याच दरम्यान ५-६ वर्षांची मुलगी आजतकवर रडत म्हणाली की, "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं."

टनलमध्ये आर्किटेक्ट/डिझाईनर म्हणून काम करणाऱ्या शशी यांची मुलगी म्हणाली, "जेव्हा आई पूजेसाठी तयार होत होती, तेव्हा माझं पप्पांसोबत थोडा वेळ बोलणं झालं. तू काय करतेस असं त्यांनी मला विचारलं. तेव्ही मी बोलले काही नाही, मग मी फोन आईच्या हातात दिला." हे सांगताना मुलगी आईला प्लीज रडू नकोस असं सांगत होती. यावेळी "दहशतवादी खूप वाईट आहेत, त्यांनी माझ्या पप्पांना मारलं" असं मुलीने रडत रडत म्हटलं.

पत्नीने सांगितलं की, "काल सहा वाजता त्यांच्याशी बोलणं झालं होतं. व्हिडीओ कॉल केला. त्यानंतर मी पुन्हा व्हिडीओ कॉल करेन, असं त्यांना सांगितलं. मग मी रात्रभर फोन करत राहिले, पण त्यांनी फोन उचललाच नाही. दहशतवाद्यांनी सर्वांची घरं उद्ध्वस्त केली. आमचं आता कोणीही नाही."

शशी यांच्या वडिलांनी सरकारकडे मागणी केली की, शशी भूषण यांच्या पत्नीला सरकारी नोकरी मिळावी कारण आता घरात कमावणारं कोणीच नाही. मुलं काय खातील?. शशी यांच्या एका मित्राने ही दुर्घटना झाल्याचं सांगितलं. त्यांना उपचारासाठी रुग्णालयात नेण्यात आलं. त्यांनी ७ वर्षे काम केलं, आर्किटेक्ट आहेत. सरकारी मदतीबाबत ते म्हणाले की, आतापर्यंत कोणीही आलेलं नाही. शशी यांना एक मुलगी आणि एक मुलगा आहे. 

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरterroristदहशतवादीTerror Attackदहशतवादी हल्ला