शहरं
Join us  
Trending Stories
1
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
2
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
3
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
4
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
5
“प्रियंका चोप्रामुळे राघव चड्ढा यांचा भाजपात प्रवेश”; नवज्योत सिंग सिद्धू यांच्या पत्नीचा मोठा दावा
6
धक्कादायक! नाशिक, अमरावतीसारखा प्रकार कोल्हापुरात; तरुणींचे Video बनवून ब्लॅकमेल, तरुणाला अटक
7
Budh Pradosh 2026: कर्जमुक्ती आणि मुलांच्या उज्ज्वल भविष्यासाठी २९ एप्रिलला न चुकता करा 'बुध प्रदोष' व्रत
8
Top Marathi News LIVE Updates: १ मेपासून मराठीची मोहीम सुरूच राहणार; मंत्री प्रताप सरनाईक यांची माहिती
9
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
10
अजितदादांच्या अपघातादिवशीच विमान कंपनीला ९ कोटींचे बक्षीस; रोहित पवारांचे खळबळजनक आरोप
11
भारत लष्करी खर्चात जगात पाचवा ठरला! शेजारी पाकिस्तान जवळपासही कुठेच नाहीय..., चीन मात्र...
12
गोलsss... पंतप्रधान नरेंद्र मोदी सिक्कीमच्या तरुणांसोबत खेळले फुटबॉल, PHOTOS ची रंगली चर्चा
13
वाढदिवसासाठी Reel तयार करण्याच्या नादात युवकाने भलताच उद्योग केला; शेवटी हातात पडल्या बेड्या
14
Adhar Card : मोठा बदल! आता आधार कार्ड तुमचे वय सिद्ध करणार नाही, तुम्हाला जन्मतारखेचा पुरावा म्हणून 'ही' कागदपत्रे दाखवावी लागणार
15
कलमा वाचता येतो का? विचारले अन् सुरक्षा रक्षकांवर चालवला चाकू; मीरा रोडच्या हल्ल्यात 'लोन वुल्फ'चा संशय
16
Robert Kiyosaki Prediction: रॉबर्ट कियोसाकी यांची २०२६-२७ मध्ये मोठ्या आर्थिक संकटाची भविष्यवाणी; भारतीय गुंतवणूकदारांनी काय करावं?
17
‘RTE’ प्रवेश! पसंतीच्या शाळेसाठी पालकांची कोंडी; ३० एप्रिलपर्यंत मुदतवाढ, तरीही संभ्रम कायम
18
तुमच्या छोट्याशा बाल्कनीला, खिडकीला द्या 'ग्रीन टच'; कमी जागेत बाग फुलवण्याच्या 'मास्टर ट्रिक'
19
दाऊदला मोठा झटका! जवळचा सहकारी 'सलीम डोला' तुर्कस्तानमधून जेरबंद; भारतीय गुप्तचर यंत्रणांची कारवाई
20
हृदयद्रावक! IPL सामना पाहून घरी परतणाऱ्या २ भावांवर काळाचा घाला; 'हिट अँड रन'मध्ये मृत्यू
Daily Top 2Weekly Top 5

रोजंदारी शिक्षकांचा आदिवासी विकासवर मोर्चा

By admin | Updated: December 23, 2014 22:10 IST

रात्री उशिरापर्यंत ठिय्या, तिघे रुग्णालयात

रात्री उशिरापर्यंत ठिय्या, तिघे रुग्णालयातनाशिक : आदिवासी विकास विभागातील रोजंदारी स्वरूपातील सुमारे १८१५ शिक्षकेतर कर्मचारी व तासिकेवरील १४७७ शिक्षक यांना कायम करण्याच्या मागणीसाठी उत्तर महाराष्ट्रातील सहा एकातिमक आदिवासी विकास प्रकल्पातील सुमारे ५१० रोजंदारी शिक्षकतेर कर्मचारी व शिक्षकांचा मोर्चा काल सायंकाळी आदिवासी विकास विभागावर येऊन धडकला. रात्री उशिरापर्यंत या कर्मचार्‍यांनी आदिवासी कार्यालयासमोर ठिय्या आंदोेलन सुरू केले होते.१८ डिसेंबरपासून तळोदा येथून सुमारे पाचशेहून अधिक आदिवासी विकास रोजंदारी शिक्षकेतर व शिक्षक कर्मचार्‍यांनी पायी मोर्चा सुरू केला. हा मोर्चा काल (दि,२३) सायंकाळी आदिवासी विकास विभागावर येऊन धडकला. राज्यभरात सुमारे ३२९२ अशी कंत्राटी स्वरूपातील कर्मचारी व शिक्षक असून, त्यांना कायम करण्याच्या मागणीसाठी हा मोर्चा काढण्यात आला आहे. १८ डिसेंबरपासून निघालेला हा मोर्चा काल दुपारी आडगावला येऊन सायंकाळी तो आदिवासी विकास विभागावर येऊन थडकला. सकाळपासूनच आदिवासी विकास विभागाभोवती कडक पोलीस बंदोबस्त होता. सायंकाळी आलेल्या मोर्चातील एक शिष्टमंडळ संघटनेचे अध्यक्ष केशव ठाकरे, उपाध्यक्ष विलास पाडवी, सचिव एस. पी. गावित, कोषाध्यक्ष बी. जी. पाडवी, सदस्य बबिता पाडवी यांच्या शिष्टमंडळाने अपर आदिवासी आयुक्त लोखंडे यांच्याशी चर्चा केली. लोखंडे यांनी या मागण्या मंत्रालयीन पातळीवर पोहोचवतो, असे आश्वासन दिले. मात्र ठोस निर्णय झाल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याचा निर्णय आदिवासी विकास रोजंदारी शिक्षक कर्मचारी संघटनेच्या पदाधिकार्‍यांनी घेतल्याने रात्री उशिरापर्यंत आदिवासी विकास विभागासमोर हे ठिय्या आंदोलन सुरू होते. (प्रतिनिधी)इन्फो..तिघे रुग्णालयातसलग पाच दिवसांपासून चालल्याने आदिवासी विकास रोजंदारी शिक्षक कर्मचारी संघटनेचे सचिव एस. पी. गावित, सदस्य बी. जी.पाडवी व अन्य एक अशा तिघांना छातीत दुखू लागल्याने व श्वसनाचा त्रास जाणवू लागल्याने जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती या मोर्चात सहभागी गणेश वसावे व आशिष वाडीले यांनी दिली. जिल्हा रुग्णालयात तिघांना दाखल करण्यात आल्याची माहिती मिळताच आंदोलनकर्त्यांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेऊन पदाधिकार्‍यांच्या प्रकृतीची विचारपूस केली.फोटो कॅप्शन२३ पीएचडीसी-११३- आदिवासी विकास विभागासमोर ठिय्या आंदोलन करताना आदिवासी विकास रोजंदारी शिक्षकेतर व शिक्षक कर्मचारी संघटनेचे पदाधिकारी