शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

मित्रांसमोरच दोन अल्पवयीन तरुणींवर सामूहिक बलात्कार

By admin | Updated: September 16, 2016 12:14 IST

राजधानी दिल्लीत दोन अल्पवयीन तरुणींवर त्यांच्याच मित्रांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे

ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 16 - राजधानी दिल्लीमधील महिलांच्या सुरक्षेवरील प्रश्नचिन्ह अजूनही कायम असल्याचं दिसत आहे. दोन अल्पवयीन तरुणींवर त्यांच्याच मित्रांसमोर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. तरुणींच्या मित्रांना मारहाण करण्यात आली आणि त्यानंतर त्यांच्यासमोर तरुणींवर बलात्कार करण्यात आला. पीडित तरुणींनी दिलेल्या माहितीच्या आधारे पोलिसांनी चार आरोपींना अटक केली असून यामधील काही तरुण अल्पवयीन असण्याची शक्यता आहे. 
 
 
'आम्ही आमच्या मित्रांसोबत मुंदका मेट्रो स्टेशनजळ असणा-या मैदानामधील झाडाखाली बसलो होते. तेव्हा पाच तरुण आम्ही सुरक्षारक्षक असल्याची बतावणी करत तिथे आले आणि जबरदस्ती करण्यास सुरुवात केली. जेव्हा आमच्या मित्रांनी प्रतिकार केला तेव्हा त्यांच्यामधील दोघांनी मारहाण करत त्यांना झाला बांधले. त्यानंतर आम्हाला झुडूपात खेचत नेले आणि आमच्यावर बलात्कार केला. विरोध केलात तर तुमची हत्या करेन अशी धमकीही दिली होती. बलात्कार केल्यानंतर पोलिसांमध्ये तक्रार न करण्याची धमकी देत त्यांनी सोडून दिलं. आरोपींनी आमची सुटका केल्यानंतर आमच्या मित्रांना आम्ही सोडवलं. त्यानंतर पोलिसांशी संपर्क साधला,' अशी माहिती पीडित तरुणींनी पोलिसांना दिली आहे.
 
 
'तक्रार झाल्यानंतर पीडित तरुणींना वैद्यकीय तपासणीसाठी रुग्णालयात नेण्यात आलं. आरोपी जवळच्याच झोपडपट्टीत राहणारे आहेत. स्थानिकांनी दिलेल्या माहितीनुसार त्यांनी याअगोदरही महिलांची छेड काढली आहे. पण त्यातील कोणत्याही पीडितीने तक्रार केली नाही,' असं पोलिसांनी सांगितलं आहे.
 
अमन विहार पोलिसांनी चार आरोपींना अटक केली आहे. चौकशी केल्यानंतर आरोपींनी गुन्हा कबूल केला आहे. आरोपींनी आपण अल्पवयीन असल्याचा दावा केला असून पोलीस तपास करत आहेत. पाचवा आरोपी फरार असून त्याच्या शोध पोलीस घेत आहेत.