शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

चार घुसखोर अतिरेक्यांना कंठस्नान

By admin | Updated: September 12, 2016 04:37 IST

शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतरही काश्मीर धुमसतच असून, रविवारी अनेक घटनांनी खोऱ्यातील अशांततेत भर पडली.

श्रीनगर/नवी दिल्ली : शांतता प्रस्थापित करण्यासाठी सर्वपक्षीय शिष्टमंडळाच्या दौऱ्यानंतरही काश्मीर धुमसतच असून, रविवारी अनेक घटनांनी खोऱ्यातील अशांततेत भर पडली. नियंत्रणरेषेवरून भारतात घुसणाऱ्या चार अतिरेक्यांना सुरक्षा दलांनी कंठस्नान घातले. पुंछमध्ये अतिरेक्यांसोबत चकमकीत एक पोलीस कर्मचारी शहीद झाला व अधिकाऱ्यासह दोघे जखमी झाले. पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल च दगडफेक करणारे आंदोलक यांच्यातील हिंसाचारात अनेक जखमी झाले. दरम्यान, गेल्या आठवड्यात पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या एका युवकाचा मृत्यू झाल्याने, ताज्या हिंसाचारातील मृतांची संख्या ७८ वर पोहोचली. नियंत्रणरेषेजवळ घुसखोरी करण्याचा अतिरेक्यांचा डाव हाणून पाडत, सैन्याने चार अतिरेक्यांना रविवारी ठार मारले. नौगाम भागात घुसखोरीचा हा प्रयत्न उधळून लावला, तर अन्य एका भागात तंगधरमध्ये दुसरा प्रयत्न हाणून पाडला आणि तिसरी घटना गुरेज भागात घडली. सैन्याच्या एका अधिकाऱ्याने सांगितले की, ‘नौगाम भागात सीमारेषेजवळ सैनिकांना संशयास्पद हालचाली दिसून आल्या. याच वेळी अतिरेक्यांनी सुरक्षा दलावर गोळीबार सुरू केला. प्रत्युत्तरात सुरक्षा दलानेही या अतिरेक्यांना लक्ष्य केले. या चकमकीत चार अतिरेकी मारले गेले. घटनास्थळावरून स्फोटके हस्तगत करण्यात आली आहेत.’ आठवडाभरात परिस्थिती सुरळीत कराकेंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंग यांनी रविवारी सायंकाळी राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित दोवाल यांच्यासह वरिष्ठ अधिकाऱ्यांची बैठक घेऊन काश्मीरमधील ताज्या परिस्थितीचा आढावा घेतला. काश्मिरी युवकांना हिंसाचारासाठी चिथावणी देणाऱ्यांवर सुरक्षा दलांनी लक्ष केंद्रित करावे आणि एका आठवड्यात खोऱ्यातील परिस्थिती सुरळित होऊन, गेले दोन महिने बंद असलेले उद्योग-व्यापार, तसेच शाळा-कॉलेजे पुन्हा सुरू होऊन परिस्थिती सुरळीत होईल, यासाठी पावले उचलावीत, असे निर्देश त्यांनी दिल्याचे सूत्रांनी सांगितले.‘पेलेट’चा पुन्हा वापरदक्षिण काश्मीरच्या पुलवामा जिल्ह्यात सुरक्षा दल आणि दगडफेक करणारे आंदोलक यांच्यात झालेल्या हिंसाचारात अनेक नागरिक जखमी झाले आहेत. पोलिसांनी सांगितले की, करिमाबाद व आजूबाजूच्या भागात राहणारे हजारो नागरिक रात्रीच्या छापेमारीच्या विरोधात रविवारी सकाळी रस्त्यावर उतरले.सलग ६५व्या दिवशी निर्बंध काश्मिरातील हिंसाचारात मृत्युमुखी पडलेल्या नागरिकांची संख्या ७८ वर पोहोचली आहे. ५ आॅगस्टला पोलीस गोळीबारात जखमी झालेल्या तरुणाचा उपचार सुरू असताना मृत्यू झाला, तर अन्य एका जखमीचाही मृत्यू झाला. श्रीनगरच्या तीन पोलीस ठाण्यांच्या हद्दीत रविवारी संचारबंदीसदृश प्रतिबंध लावण्यात आले आहेत. काश्मिरात सलग ६५ व्या दिवशीही जनजीवन विस्कळीत आहे.