शहरं
Join us  
Trending Stories
1
गोजुबावीत अजितदादांच्या प्रतिमेसमोर अघोरी पूजा, 'टाचण्या टोचलेले लिंबू'; अमोल मिटकरींच्या ट्विटने मोठी खळबळ
2
अमेरिकेची ‘माइन हंटिंग’ मोहीम! इराणकडून समुद्रतळात पेरलेले पाणसुरुंग काढण्याचे ट्रम्प यांचे आदेश
3
डोनाल्ड ट्रम्प यांच्यासमोरच अंदाधुंद गोळीबार; अमेरिकेत खळबळ, सुरक्षा जवानांनी संशयिताला पकडलं
4
ट्रम्प यांच्या व्हाईट हाऊसमध्ये गोळीबार! कोण होता तो हल्लेखोर? आतापर्यंत काय घडलं?
5
आता पंजाबमध्ये होणार ‘ऑपरेशन लोटस’चा खेळ;  ‘आप’च्या ३५ ते ४० आमदारांवर भाजपचे लक्ष
6
आजचे राशीभविष्य - २६ एप्रिल २०२६, प्रत्येक काम यशस्वीरित्या पूर्ण होईल, मान व प्रतिष्ठा वाढेल
7
दावा, सस्पेन्स अन् ऑपरेशन टायगर! ठाकरे-फडणवीसांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट? राजकीय वर्तुळात चर्चा
8
मीसिंग लिंक उद्घाटनाला मुहूर्त! १ मेपासून मुंबई-पुणे प्रवास होणार जलद; कोंडीजाचातून होणार सुटका
9
राज्यात उष्णतेचा वाढता कहर, त्यातच काही जिल्ह्यात पुन्हा विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा
10
एका नर्समुळे लागला १०८ वर्षांपूर्वी ब्रिटिशांनी दिलेल्या जमिनीचा शाेध; जागेसाठी ‘जेजे’चा संघर्ष
11
संजय गायकवाड यांच्याकडे मराठी भाषेची सूत्रे द्यायची का?; हे असे भारी भारी आमदार कुठे सापडतात?
12
ही तर माेठ्या संकटाची नांदी! अमलीपदार्थांचा पुरवठा हा भारताविरुद्धच्या छुप्या युद्धाचा एक भाग
13
लहान वयात मोठी व्याधी! ४ ते ८ वर्षे वयोगटातील मुलांमध्ये वाढतोय आता ‘किडनी स्टोन’चा धोका 
14
शिवाजी महाराज नसते तर बागेश्वर मौलवी असते; नागपूरकर भोसलेंची धीरेंद्र कृष्ण शास्त्रींवर टीका
15
पनवेलचा आरआरटी फार्माचा मालक ठोंबरे राज्यातील बोगस इंजेक्शनचा ‘मास्टरमाइंड’
16
स्ट्रॉंग रूममधील ३० सोन्याची पाकिटे गायब; अधिकारी निघाला चोर, कॅनरा बँकेत ७ कोटींचा डल्ला
17
बाबा सिद्दीकी हत्या प्रकरणात उत्तर प्रदेशातील एका व्यावसायिकाचा जामीन अर्ज हायकोर्टाने फेटाळला
18
महाराष्ट्र मेडिकल कौन्सिलचे आज मतदान; परळच्या हाफकिनमध्ये बुधवारी होणार मतमोजणी
19
हा पदार्थ करेल तुमच्या शरीरात अनोखी जादू...; शाकाहारी व्यक्तींसाठी 'टोफू' हे एक वरदान
20
DC vs PBKS : पंजाब किंग्स इज चेज मास्टर! दिल्ली कॅपिटल्सविरुद्धच्या विजयासह रचला नवा इतिहास
Daily Top 2Weekly Top 5

अन्नधान्य वितरण अधिकारी म्हस्केंना अभय

By admin | Updated: February 14, 2015 23:51 IST

अन्नधान्य वितरण अधिकारी म्हस्केंना अभय

अन्नधान्य वितरण अधिकारी म्हस्केंना अभय
अकरा दिवसांनंतरही निलंबन नाही
औरंगाबाद : रेशन दुकानदारांकडून लाच स्वीकारताना अटक करण्यात आलेले अन्नधान्य वितरण अधिकारी अभय म्हस्के यांच्यावर अद्यापही निलंबनाची कारवाई झालेली नाही. ॲन्टी करप्शन ब्युरोच्या अधिकार्‍यांकडून दहा दिवसांनंतरही जिल्हा प्रशासनाला कारवाईचा अहवाल प्राप्त झालेला नसल्यामुळे ही कारवाई रखडल्याचे जिल्हा प्रशासनातर्फे सांगण्यात आले.
औरंगाबादचे अन्नधान्य वितरण अधिकारी अभय म्हस्के यांना ३ फेबु्रवारी रोजी लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकार्‍यांनी २५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना रंगेहाथ अटक केली. रॉकेलचा कोटा वाढवून देण्यासाठी म्हस्के यांनी संबंधित दुकानदाराकडे वरील रक्कम मागितली होती. या प्रकरणात म्हस्के यांना दोन दिवसांची पोलीस कोठडी झाली. या कारवाईमुळे राज्य सरकारकडून लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई होणे अपेक्षित होते. मात्र, अकरा दिवस झाले तरी राज्य सरकारकडून म्हस्के यांच्यावर निलंबनाची कारवाई झालेली नाही. उलट पोलीस कोठडी संपल्यानंतर अभय म्हस्के हे रजा टाकून गेल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले.
ॲन्टी करप्शनमुळेच कारवाईला विलंब
निलंबनाच्या कारवाईला विलंब होण्यामागे ॲन्टी करप्शन विभाग कारणीभूत असल्याचे जिल्हाधिकारी कार्यालयातील अधिकार्‍यांनी सांगितले. म्हस्के हे तहसीलदार आहेत. त्यामुळे त्यांच्यावर राज्य सरकारकडूनच कारवाई होऊ शकते. त्याकरिता जिल्हा प्रशासनाने निलंबनाबाबतचा प्रस्ताव तयार करून तो सरकारला पाठवावा लागतो. मात्र, त्यासाठी ॲन्टी करप्शन विभागाने अद्याप त्यांच्या कारवाईचा अहवाल जिल्हा प्रशासनाला सादर केलेला नाही. त्यामुळेच जिल्हा प्रशासनाचा प्रस्तावही राज्य सरकारला जाऊ शकला नसल्याचे अधिकार्‍यांनी सांगितले.
पोलीस अधिकार्‍याचे चार दिवसांत निलंबन
अभय म्हस्के यांच्याप्रमाणेच गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक शिवा ठाकरे हेही ६ फेबु्रवारी रोजी शेगाव येथे लाच घेताना रंगेहाथ पकडले गेले होते. या प्रकरणात पोलीस खात्याने लगेचच त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली. परंतु ठाकरे यांच्या तीन दिवस आधी लाचलुचपत खात्याच्या जाळ्यात अडकलेल्या म्हस्के यांच्यावर मात्र, अद्याप अशी कारवाई झालेली नाही. त्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.