पाकिस्तानच्या माऱ्यात ४ भारतीय जवान जखमी

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2019 05:05 IST2019-09-17T05:05:39+5:302019-09-17T05:05:46+5:30

पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने रविवारी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत उखळी तोफांतून केलेल्या मा-यात भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत.

Five Indian soldiers injured in Pakistan flood | पाकिस्तानच्या माऱ्यात ४ भारतीय जवान जखमी

पाकिस्तानच्या माऱ्यात ४ भारतीय जवान जखमी

जम्मू : येथील पूंछ जिल्ह्यामध्ये प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर पाकिस्तानने रविवारी रात्री शस्त्रसंधीचे उल्लंघन करीत उखळी तोफांतून केलेल्या मा-यात भारतीय लष्कराचे चार जवान जखमी झाले आहेत.
भारतीय लष्कराचे जनसंपर्क अधिकारी लेफ्टनंट कर्नल देवेंदर आनंद यांनी सांगितले की, रविवारी रात्री साडेदहा वाजल्यापासून पाकिस्तानी सैन्याने मेंढर क्षेत्रातील बालाकोटे येथे मारा सुरू केला. याच परिसरात गस्त घालत असलेल्या भारतीय जवानांवर रात्री साडेबारा वाजताही मारा करण्यात आला. त्यात चार भारतीय जवान किरकोळ जखमी झाले आहेत. त्यांच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पाकिस्तानने यंदाच्या वर्षात २०५० वेळा शस्त्रसंधीचे उल्लंघन केले असून, त्यात २१ भारतीय ठार झाल्याचे भारताने म्हटले होते.
भारतीय लष्कराने काही दिवसांपूर्वी शस्त्रसंधीचे उल्लंघन केले आहे, असा आरोप पाकिस्तानने नुकताच केला होता. इस्लामाबाद येथील भारतीय उच्चायुक्त कार्यालयातील प्रभारींना बोलावून घेऊन त्यांच्याकडे पाकिस्तानी अधिकाऱ्यांनी निषेधही व्यक्त
केला. (वृत्तसंस्था)

Web Title: Five Indian soldiers injured in Pakistan flood