आधी घोषणा, आता कृती! महिलांनी भेट दिलेल्या 'सिंदूर'च्या रोपाचे PM मोदींनी केले वृक्षरोपण

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 5, 2025 12:30 IST2025-06-05T12:27:50+5:302025-06-05T12:30:35+5:30

PM Modi Sindoor Plant: काही दिवसांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना कच्छ येथील महिलांनी सिंदूरचे रोप भेट म्हणून दिले होते. हे रोप स्वीकारताना मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त करत एक घोषणा केली होती. 

First the declaration, now the action! PM Modi planted the 'Sindoor' sapling gifted by women | आधी घोषणा, आता कृती! महिलांनी भेट दिलेल्या 'सिंदूर'च्या रोपाचे PM मोदींनी केले वृक्षरोपण

आधी घोषणा, आता कृती! महिलांनी भेट दिलेल्या 'सिंदूर'च्या रोपाचे PM मोदींनी केले वृक्षरोपण

PM Modi News: भारतीय लष्कराच्या ऑपरेशन सिंदूरनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी २७ मे रोजी पहिल्यांदाच गुजरात दौऱ्यावर गेले होते. या दौऱ्यात पंतप्रधान मोदींची काही महिलांनी भेट घेतली होती. १९७१ च्या युद्धामध्ये महत्त्वाची भूमिका राहिलेल्या या महिलांनी मोदींना सिंदूरचे रोप भेट दिले होते. हे रोप स्विकारल्यानंतर मोदींनी ते निवासस्थान परिसरात लावण्याची घोषणा केली होती. 

'लोकमत'चं WhatsApp चॅनल फॉलो करा!

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा कच्छमध्ये सभा झाली होती. यावेळी कच्छमधील काही महिलांनी त्यांना सिंदूरचे रोप भेट दिले होते. हे रोप स्विकारल्यानंतर बोलताना पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले होते की, दिल्लीतील लोक कल्याण मार्गावर असलेल्या पंतप्रधान निवास परिसरात लावणार. 

वाचा >>“मोदी-शाह-फडणवीसांना शिवसेना काय आहे ते समजेल, दबाव, ब्लॅकमेलिंग सहन करणार नाही”: राऊत

मोदींनी सिंदूरचे केले वृक्षरोपण

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गुरूवारी (५ जून) पंतप्रधानांच्या निवासस्थान परिसरात सिंदूरचे वृक्षरोपण केले. वृक्षरोपणाचे फोटो शेअर करताना मोदींनी त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

"1971 च्या युद्धात शौर्य आणि पराक्रम करणाऱ्या वीरांगणा माताभगिनींनी अलिकडेच गुजरात दौऱ्यावर असताना मला सिंदूरचे रोप भेट दिले होते. जागतिक पर्यावरण दिनी हे रोप नवी दिल्लीतील पंतप्रधान निवासस्थानी लावण्याचे भाग्य मला लाभले. हे रोप आपल्या देशातील स्त्री शक्तीच्या धाडस आणि प्रेरणेचे सक्षम प्रतीक राहील", असे पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले. 

सिंदूरचे रोप रोप देणाऱ्या महिलांनी काय केलं होतं?

१९७१च्या युद्धावेळी कच्छमधील महिलांनी भुज येथील एअरबेसची धावपट्टी ७२ तासांमध्ये व्यवस्थित केली होती. युद्धकाळात महिलांनी अशा पद्धतीने त्यांचे योगदान दिले होते. याच महिलांनी मोदींना सिंदूरचे रोप भेट म्हणून दिले. 

Web Title: First the declaration, now the action! PM Modi planted the 'Sindoor' sapling gifted by women