शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
3
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
4
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
5
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
6
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
7
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
8
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
9
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
10
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
11
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
12
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
13
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
14
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
15
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
16
IPL 2026 : मलिंगाचा भेदक मारा; महागडा प्रफुलही शेवटी चमकला! CSK ला रोखत SRH नं मैदान मारलं
17
हा तर डिस्ट्रेस एड्रेस! पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर काँग्रेसकडून पलटवार झाला; खर्गे म्हणाले, हताश होऊन पंतप्रधान...
18
आयुष म्हात्रेनं लंगडत लंगडत धाव घेतली; धोका पत्करुन डाव खेळला तोही फसला! पण खरंच याची गरज होती का?
19
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
20
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
Daily Top 2Weekly Top 5

मोदी सरकार-2चं पहिलं संसदीय अधिवेशन जूनच्या पहिल्या आठवड्यात; जुलैमध्ये अर्थसंकल्प

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 26, 2019 15:31 IST

5 ते 15 जून दरम्यान अधिवेशन होणार असल्याची सूत्रांची माहिती

नवी दिल्ली: भाजपानं लोकसभा निवडणुकीत दणदणीत विजय मिळवल्यानंतर आता दिल्लीत नव्या सरकारच्या पहिल्या अधिवेशनाच्या हालचाली सुरू झाल्या आहेत. नव्या सरकारचं पहिलं अधिवेशन 5 ते 15 जून या काळात होण्याची शक्यता आहे. तर जुलै महिन्यात मोदी सरकार-2 आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करेल, अशी माहिती सूत्रांनी दिली. यामधून सरकार अनेक महत्त्वपूर्ण घोषणा करण्याची शक्यता आहे.लोकसभा निवडणुकीत तब्बल 303 जागा जिंकत विक्रमी कामगिरी केल्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज त्यांच्या आईची भेट घेण्यासाठी गुजरातला गेले आहेत. 30 मे रोजी ते पंतप्रधानपदाची शपथ घेतील. यावेळी काही मंत्रीदेखील त्यांच्यासोबत शपथ घेऊ शकतात. यानंतर आठवड्याभरात राष्ट्रपतींच्या अभिभाषणानं संसदेच्या अधिवेशनाला सुरुवात होईल. या अधिवेशनात नवनिर्वाचित खासदारांना शपथ दिली जाईल. मोदी सरकार-2 जुलैमध्ये आपला पहिला पूर्ण अर्थसंकल्प सादर करण्याची शक्यता आहे. भाजपानं लोकसभा निवडणुकीपूर्वी प्रसिद्ध केलेल्या संकल्पपत्रात अनेक महत्त्वपूर्ण आश्वासनं दिली होती. त्यांची घोषणा अर्थसंकल्पातून केली जाऊ शकते. अल्प भूधारक शेतकऱ्यांना, लहान दुकानदारांना निवृत्ती वेतन, जीएसटीच्या टप्प्यात महत्त्वाचे बदल, सर्वांना कर्जमाफी योजना अशा महत्त्वपूर्ण घोषणा या अर्थसंकल्पातून केल्या जाऊ शकतात.  

टॅग्स :Lok Sabha Election 2019 Resultsलोकसभा निवडणूक निकालNarendra Modiनरेंद्र मोदीParliamentसंसदBJPभाजपाBudgetअर्थसंकल्प