हमाल पंचायतीस आर्थिक मदत

By Admin | Updated: May 10, 2014 19:06 IST2014-05-10T16:51:00+5:302014-05-10T19:06:38+5:30

अहमदनगर: कै.कोंडाजी तान्हाजी बारवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारवकर परिवाराच्यावतीने हमाल पंचायतीस ११ हजार १११ रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.

Financial Assistance for Himal Panchayats | हमाल पंचायतीस आर्थिक मदत

हमाल पंचायतीस आर्थिक मदत

अहमदनगर: कै.कोंडाजी तान्हाजी बारवकर यांच्या स्मृतिदिनानिमित्त बारवकर परिवाराच्यावतीने हमाल पंचायतीस ११ हजार १११ रुपयांचा आर्थिक मदतीचा धनादेश पंचायतीचे अध्यक्ष शंकरराव घुले यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला.
कोंडाजी हे पेशाने शिक्षक असले तरी ते हाडाने श्रमजीवी होते. त्यांनी कष्टाला कधीही कमी लेखले नाही. कुठलेही काम ते समरसतेने करत. गरजवंताला मदत करणे हा त्यांचा स्थायीभाव होता. मोठ्या कष्टातून त्यांनी मुलांना शिकविले. त्यांच्या पावलावर पाऊल ठेवून बारवकर कुटुंबीय समाजकार्य करत आहे, ही भूषणावह बाब असल्याचे प्रतिपादन शंकरराव घुले यांनी यावेळी केले. हमाल पंचायतीच्या माध्यमातून हमालांचा विकास साधला जातो. हमालांबरोबरच त्यांच्या कुटुंबीयांसाठीही मदत केली जाते. (प्रतिनिधी)

Web Title: Financial Assistance for Himal Panchayats