निदर्यी पित्याने मुलाला मुनाक कालव्यात फेकले

By Admin | Updated: August 28, 2016 10:20 IST2016-08-28T10:20:40+5:302016-08-28T10:20:40+5:30

मुलांना दोनवेळचे जेवण द्यायचीही ऐपत नसल्याने मुलींना घरात बंद करुन निघून गेलेल्या बंटी गुप्ताने आपल्या दोन वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे.

Father of the Nation Father threw the child in Munak canal | निदर्यी पित्याने मुलाला मुनाक कालव्यात फेकले

निदर्यी पित्याने मुलाला मुनाक कालव्यात फेकले

ऑनलाइन लोकमत 

मुंबई, दि. २८ - मुलांना दोनवेळचे जेवण द्यायचीही ऐपत नसल्याने मुलींना घरात बंद करुन निघून गेलेल्या बंटी गुप्ताने आपल्या दोन वर्षाच्या मुलाची हत्या केल्याचे समोर आले आहे. १८ ऑगस्टला बंटीने त्याच्या दोन वर्षाच्या मुलाला मुनाक कालव्यात फेकून दिले. मुलाचा बुडून मृत्यू झाला. 
 
दिल्ली पोलिसांनी मागच्या आठवडयात समयपूर बादली भागातील घरातून बंटीच्या दोन मुलीची सुटका केली. बंटी या दोन्ही मुलींना घरात बंद करुन आपल्या दोनवर्षाच्या मुलाला घेऊन निघून गेला होता. पोलिसांना या मुली सापडल्या त्यावेळी त्यांची अत्यंत वाईट स्थिती होती. अनेक दिवसांपासून त्या उपाशी होत्या तसेत शरीरावरील जखमांमुळे त्यांना इन्फेक्शन झाले होते. 
 
बंटी मद्याच्या आहारी गेला होता. त्याला मुलांपासून स्वत:ची सुटका करुन घ्यायची होती. माझी मुले माझ्यावर ओझे बनली होती. त्यांच्या जखमांमधून येणा-या दुर्गंधीचा मला त्रास व्हायचा. त्यामुळे मी त्यांना संपवण्याचा निर्णय घेतला असे बंटीने पोलिस चौकशीत सांगितले. नोकरी नसल्याने बंटीची पत्नी त्याला तीन महिन्यांपूर्वी सोडून गेली होती. 

Web Title: Father of the Nation Father threw the child in Munak canal