शहरं
Join us  
Trending Stories
1
पक्ष विलीन करा अन् विधान परिषदेची आमदारकी घ्या; शिंदेसेनेची बच्चू कडूंना अट, निर्णयाकडे लक्ष
2
Train waiting Ticket Rules: ट्रेनचं कोणतं तिकीट सर्वात पहिले होतं कन्फर्म? GNWL आणि PQWL चा काय आहे अर्थ?
3
आजचे राशीभविष्य, २८ एप्रिल २०२६: मेष आणि धनु राशीला आर्थिक लाभ, 'या' राशीनं राहावं सावध!
4
चीन-पाकिस्तानची धडधड वाढली! होर्मुझची सामुद्रधुनीतून पुरवठा बंद; तेल आणि गॅससाठी दोन्ही देश अडचणीत
5
दात तुटला, डोळाही सुजला..., इन्फ्लुएन्सरच्या मित्राकडून अभिनेत्रीला मारहाण, नक्की काय घडलं?
6
इंडोनेशियातील भयंकर घटना! रेल्वे स्थानकावर उभ्या असलेल्या ट्रेनला एक्सप्रेसची धडक, ४ ठार
7
Hingoli Earthquake: वसमत तालुक्यात भूकंपाचे सत्र सुरूच; एकाच महिन्यात चौथ्या धक्क्याने नागरिक धास्तावले!
8
'पद पाहिजे? मग माझ्यासोबत झोप, नाहीतर...', भाजपा नेत्याने दिली ऑफर, महिलेचा गंभीर आरोप
9
शिकाऊ डॉक्टरांच्या हलगर्जीमुळे बाळाचा मृत्यू?; आईची भोईवाडा पोलिसांत तक्रार, कारवाईची मागणी
10
परवडणारी घरे गेली कुठे? मुंबईकरांची ‘म्हाडा’कडे पाठ; आतापर्यंत २,६४० घरांसाठी आले ४५,८१० अर्ज
11
आधी मैत्री अन् मग लग्नाचं आमिष दाखवून आर्किटेक्ट महिलेवर अत्याचार; BMC सहायक आयुक्ताला अटक
12
कुजबुज! लोकप्रिय व्यक्तिमत्व डॉ. अभिजित बिचुकलेंना विधान परिषदेवर संधी द्यावी, शिंदेंकडे मागणी
13
महामार्गांवरील वाहतूक चिन्हांचे आता होणार ऑडिट; आयआयटी रुरकीची नेमणूक प्रस्तावित
14
फरार ‘मार्क’सोबत जियाचे जॉइंट अकाउंट; पोलिस कोठडीत वाढ, १४.९५ लाख ड्रग्ज विक्रीचे?
15
भाईंदरपाड्यात सुरक्षा रक्षक, गावकऱ्यांत हाणामारी; १२ गुंठे जमिनीवरून पेटला वाद, सरनाईकांवर आरोप
16
अखेरच्या व्हिडिओ कॉलवर कृष्णानं वडिलांना सांगितले; ‘पप्पा, मी येतोय’...पण तो आलाच नाही
17
Virat Kohli New Record : किंग कोहलीचा 'विराट' पराक्रम! IPL मध्ये ९००० धावांसह रचला नवा विक्रम
18
रात्रीत सर्व संपलं...उरला फक्त चपलांचा खच; स्मशानशांतता अन् बाजारातून कलिंगड गायब
19
ड्रेनेजच्या सफाईमुळे हत्याकांडाचा उलगडा! ३ महिन्यांपूर्वी बहिणीची हत्या करणारा आरोपी भाऊ अटकेत
20
‘सुपर एल निनो’च्या उंबरठ्यावर! १५० वर्षांपूर्वीसारखी महाप्रलयंकारी स्थिती निर्माण होण्याची भीती
Daily Top 2Weekly Top 5

Farmer's Agitation: चर्चा निष्फळ, कायदे मागे घेण्यावर सर्व संघटना ठाम; शेतकरी रॅली काढणारच

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 23, 2021 06:46 IST

नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. 

विकास झाडे -नवी दिल्ली : केंद्र सरकारने केलेले कृषी कायदे सर्वोत्तम आहेत. तरीही आम्ही ते काही काळ स्थगित ठेवण्याचा प्रस्ताव दिला आहे. आता यापेक्षा आम्ही अधिक काहीही करू शकत नाही, असे सांगत मंत्रीगटाने शेतकरी नेत्यांसोबतची बैठक आवरती घेतली. नाराज झालेल्या मंत्रीगटाने पुढच्या बैठकीची तारीखही शेतकऱ्यांना दिली नाही. तिकडे कायदे मागे घेण्याच्या मागणीवर शेतकरी ठाम आहेत. प्रजासत्ताकदिनी राजधानी दिल्लीत शेतकरी ट्रॅक्टर रॅलीही काढणार आहेत. आंदाेलकांची जोरदार तयारी - आंदोलनाला ५८ दिवस पूर्ण झाले आहेत. सरकारचा निषेध म्हणून येत्या २६ जानेवारी रोजी दिल्लीच्या रिंंगरोडवर ट्रॅक्टर रॅली काढण्याचे शेतकऱ्यांनी निश्चित केले आहे. शेतकऱ्यांची यासाठी जय्यत तयारी सुरू आहे. यात महिलाही मोठ्या संख्येने सहभागी होणार आहेत. रॅलीला जाता यावे यासाठी शेतकऱ्यांनी दिल्लीकडे कूच केले आहे. ठिकठिकाणी रॅलीची रंगीत तालीमही सुरु आहे.प्रसारमाध्यमांकडे गेल्याने शेतकरी नेत्यांना सुनावले -शुक्रवारी विज्ञान भवनात शेतकरी नेते आणि मंत्रीगटासोबत अकरावी बैठक होती. दहाव्या बैठकीत सरकारने शेतकऱ्यांना दिलेला कायदे स्थगितीचा प्रस्ताव फेटाळल्याने अस्वस्थ झालेले कृषी मंत्री नरेंद्रसिंग तोमर म्हणाले, सरकार कायदे रद्द करणार नाही. कायद्या सुधारणा हव्या तर सुचवा, ते दीड ते दोन वर्षांसाठी स्थगित करायचे असेल तर बोला. तुम्ही आतापर्यंत सहकार्य केल्याबाबत आभारी आहोत. आम्ही सन्मान म्हणून स्थगितीचा प्रस्ताव दिला परंतु तुम्ही त्यावर निर्णय घेऊ शकले नाहीत. या प्रस्तावाबाबत तुम्ही मीडियाकडे न जाता आमच्याशी बोलू शकले असते, असेही तोमर यानी नेत्यांना सुनावले.पुढच्या बैठकीची तारीख ठरली नाही -केंद्रानेही आता कठोर भूमिका घेतली आहे. शेतकऱ्यांकडून जोपर्यंत सरकारकडे कोणताही प्रस्ताव जात नाही तोपर्यंत पुढची बैठक होणार नाही. तोमर यांनी तूर्तास कोणतीही बैठक नसल्याचे बैठकीनंतर सांगितले. आजच्या मंत्रीगटामध्ये वाणिज्य मंत्री पीयूष गोयल, राज्यमंत्री सोमप्रकाश यांचा समावेश होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार केवळ २० मिनिटे आजची अधिकृत बैठक चालली.

टॅग्स :Farmer strikeशेतकरी संपFarmerशेतकरीagitationआंदोलनCentral Governmentकेंद्र सरकारdelhiदिल्ली