शहरं
Join us  
Trending Stories
1
‘धर्मांतरासारखे प्रकार खपवून घेऊ नका’ मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे पोलिसांना कडक निर्देश
2
आजचे राशीभविष्य, १९ एप्रिल २०२६: शारीरिक व मानसिक आरोग्य उत्तम राहील, आर्थिक बाबीत सावध राहा!
3
तब्बूने मुंबईतील वर्सोवामध्ये घेतला आलिशान फ्लॅट, मोजले तब्बल 'इतके' कोटी
4
Video: Jasprit Bumrah फॅन्ससोबत काढत होता सेल्फी, बाजूने Hardik Pandya आला अन् म्हणाला...
5
Air Travel Rules: ...तर ‘त्या’ प्रवाशांना विमानात ‘नो एन्ट्री’, नव्या नियमांचा मसुदा तयार!
6
साप्ताहिक राशीभविष्य: ८ राशींना सुखाचा काळ, व्यापारी करारातून लाभ; नोकरीत पगारवाढ, इगो टाळा!
7
'धुरंधर'चा आलम भाई ५२ व्या वर्षीही अविवाहित, कधीही लग्न न करण्याचा घेतला निर्णय; कारण...
8
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन हे काँग्रेसचा जप, खोटारडेपणाचा गजर”: हर्षवर्धन सपकाळ
9
आयत्या पिठावर रेघोट्या मारून राजकारण होत नाही; जनतेची कामे करा: एकनाथ शिंदे
10
Gold Rates: सोन्याचे दर खाली घसरतील की आणखी चढतील?
11
Supreme Court: घर मालकीहक्काचा निर्णय सोसायटी घेऊ शकत नाही : उच्च न्यायालय
12
Maharashtra Weather: अलर्ट! राज्यावर दुहेरी संकट, कडक उन्हासोबत अवकाळी पावसाचा शक्यता
13
जबरदस्तीने फोटो काढून अत्याचार अन् धर्मांतरास प्रवृत्त केल्याचा आरोप;  पंचवटी पोलिसांची मोठी कारवाई
14
केंद्रीय कर्मचाऱ्यांना गुड न्यूज; महागाई भत्ता २ टक्के वाढला; पेन्शनरांनाही होणार लाभ 
15
मुंबईत यकृत प्रत्यारोपणासाठी ८३७ रुग्ण वेटिंगवर, अवयवदानाबाबत पुन्हा जागरुकतेची आवश्यकता
16
Rahul Gandhi: ‘भारताचा आत्मा वाचवण्यासाठीच विधेयक रोखले!’- राहुल गांधी
17
खेळण्यातील कारचा वापर करून हल्ल्याचा कट, ४ संशयित दहशतवाद्यांना अटक
18
PM Modi: महिला आरक्षण रोखून विरोधकांनी पाप केले; त्यांना शिक्षा मिळणारच: पंतप्रधान मोदी
19
Iran fires on Indian ships: होर्मुजच्या सामुद्रधुनीमध्ये भारतीय जहाजांवर गोळीबार; इराणचे पुन्हा निर्बंध 
20
मोठी अपडेट! गोळीबारात एक जहाज होर्मुझमधून निसटले, इराणने भारताची १४ जहाजे रोखलेली
Daily Top 2Weekly Top 5

शेतकरी आंदोलनावरून नितीश कुमारांचे मोठे विधान, मोदी सरकारला केले असे आवाहन

By बाळकृष्ण परब | Updated: November 30, 2020 20:38 IST

Farmer Protest News : शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत.

ठळक मुद्देकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईलकेंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल

पाटणा - दिल्लीच्या सीमेवर सुरू असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनाचे आता राजकीय पडसाद उमटू लागले आहेत. शेतकऱ्यांच्या आंदोलनावरून विरोधी पक्षांसोबत भाजपाचे मित्रपक्षही सरकारला धारेवर धरू लागले आहेत. दरम्यान, बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमार यांनीही शेतकरी आंदोलनाबाबत मोठे विधान केले आहे. केंद्र सरकारने शेतकऱ्यांना हमीभाव सांगावा, त्यानंतरच शेतकऱ्यांचे समाधान होईल, असे विधान नितीश कुमार यांनी केले आहे.नितीश कुमार म्हणाले की, केंद्र सरकारची शेतकऱ्यांसोबत चर्चा झाली तर धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारचा अडथळा येणार नसल्याची खात्री शेतकऱ्यांना मिळेल. तसेच धान्याची खरेदी होईल आणि केंद्राकडून जे मूल्य निर्धारीत केले असेल ते त्यांना मिळेल, असेही नितीश कुमार म्हणाले.पाटणा येथील खगौल येथे दीघा-एम्स एलिव्हेटेट मार्गाचे लोकार्पण करताना पत्रकारांनी शेतकरी आंदोलनाबाबत विचारले असता नितीश कुमार म्हणाले की, सध्या जी बोलणी चालू आहे. तसेच जे सांगितले जात आहे त्यानुसार केंद्र सरकार शेतकऱ्यांसोबत चर्चा करण्यास इच्छुक असल्याचे संकेत मिळत आहेत. केंद्र सरकार धान्याच्या खरेदीमध्ये कुठल्याही प्रकारची अडचण येणार नसल्याचे सांगणार आहे. बिहारमध्ये आम्ही २००६ मध्येच जुनी व्यवस्था संपुष्टात आणली आहे. २००६ नंतर आम्ही धान्याची खरेदी पॅक्सच्या माध्यमातून करत आहोत. आधी इथे धान्याची खरेदी होत नसे. मात्र आम्ही ती करत आहोत.वाजपेयी सरकारमध्ये कृषिमंत्री म्हणून काम केलेले नितीश कुमार म्हणाले की, देशभरात याबाबत जे काही केले जात आहे ते लोकांमध्ये जाऊन सांगण्याची गरज आहे. शेतकऱ्यांसोबत चर्चा व्हावी, असे केंद्र सरकारचे मत आहे. चर्चा झाली तर शेतकऱ्यांना कुठल्याही पिकाच्या खरेदीमध्ये अडथळा येणार नसल्याची खात्री मिळेल. खरेदी होईल आणि जे मूल्य केंद्र सरकारकडून निर्धारित केले जाईल, ते त्यांना मिळेल.

टॅग्स :Nitish Kumarनितीश कुमारCentral Governmentकेंद्र सरकारFarmerशेतकरी