प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 27, 2026 14:45 IST2026-04-27T14:45:19+5:302026-04-27T14:45:56+5:30

मुंगेरमधील एका तरुणाचं फेसबुकच्या माध्यमातून फिलिपिन्सच्या तरुणीशी ओळख झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला.

facebook lovestory turns marriage bihar man weds philippines woman in traditional ceremony | प्रेमासाठी काय पण! फिलिपिन्सच्या तरुणीचा बिहारच्या मुलावर जडला जीव; सातासमुद्रापार आली अन्...

फोटो - tv9hindi

सोशल मीडियाच्या माध्यमातून झालेलं प्रेम आता आयुष्यभराची साथ असणार आहे. बिहारमध्ये अशीच एक घटना समोर आली आहे. मुंगेरमधील एका तरुणाचं फेसबुकच्या माध्यमातून फिलिपिन्सच्या तरुणीशी ओळख झाली. पुढे मैत्रीचं रुपांतर प्रेमात झालं आणि त्यांनी लग्न करण्याचा मोठा निर्णय घेतला. दोघांनी आता भारतात लग्न केलं असून या लग्नाची संपूर्ण परिसरात जोरदार चर्चा केली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, मुंगेर जिल्ह्यातील असरगंज येथील रहिवासी ऋषी कुमार याची फेसबुकवर फिलिपिन्सची तरुणी सारा पॉलिन क्रूझ हिच्याशी ओळख झाली होती. सुरुवातीला दोघांमध्ये मैत्री झाली आणि हळूहळू या मैत्रीचं रूपांतर पुढे प्रेमात झालं. ऋषी सध्या भागलपूरमधील एका पेंट कंपनीत कार्यरत आहे.

ऋषीची नऊ वर्षांपूर्वी फेसबुकवर साराशी ओळख झाली होती. सुरुवातीला केवळ मित्र असलेल्या या दोघांचं नातं काळानुसार अधिक घट्ट होत गेलं आणि त्यांनी लग्न करण्याचा महत्त्वाचा निर्णय घेतला.

सारा फिलिपिन्सवरून भारतात आणि तिथून मुंगेरला पोहोचली. रविवारी या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. जिल्ह्यातील हवेली खडकपूर येथील ऐतिहासिक पंच बदन शिव मंदिरात हा विवाह सोहळा संपन्न झाला. सारा या लग्नामुळे खूप आनंदी दिसत होती, तर ऋषीदेखील प्रचंड उत्साहात होता.

हे अनोखं लग्न पाहण्यासाठी संपूर्ण मंदिर परिसरात स्थानिकांनी मोठी गर्दी केली होती. स्थानिक तरुण आणि परदेशातील तरुणीची ही जोडी पाहण्यासाठी लोकांची मोठी झुंबड उडाली होती. फेसबुकपासून सुरू झालेली ही लव्हस्टोरी लग्नापर्यंत पोहोचली असून लग्नाचे फोटो आता जोरदार व्हायरल होत आहेत.

Web Title : प्यार के लिए सरहदें पार: फिलीपींस की युवती ने बिहार में रचाई शादी

Web Summary : फिलीपींस की सारा को फेसबुक के माध्यम से बिहार के ऋषि से प्यार हो गया। वह भारत आई और उन्होंने एक मंदिर में शादी कर ली। उनकी कहानी, ऑनलाइन दोस्ती से शादी तक, एक स्थानीय सनसनी बन गई है।

Web Title : Filipina travels across oceans for love, marries Bihar man.

Web Summary : A Filipina woman, Sara, fell in love with Rishi from Bihar via Facebook. She travelled to India, and they married in a temple. Their story, from online friendship to marriage, has become a local sensation.