शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
2
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
3
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
4
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
5
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
6
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
7
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
8
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
9
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
10
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
11
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
12
अफगाणिस्तानात पुन्हा एकदा हाहाकार! तीन दिवसांत दुसऱ्यांदा बसले भूकंपाचे तीव्र धक्के, काबुलची धरती हादरली!
13
यवतमाळमध्ये कार ट्रकला धडकली, सहा महिन्यांच्या चिमुकलीसह वडिलांचा जागीच मृत्यू; आई गंभीर जखमी
14
CBSE 10th Result 2026: CBSE चा दहावीचा निकाल जाहीर; कुठे आणि कसा पाहायचा? वाचा...
15
'आमची मोहीम अजून संपलेली नाही'; इराणला मोसादचा थेट इशारा, इस्रायली गुप्तचर संस्थेच्या विधानाने खळबळ
16
Mamata Banerjee : दीदी संतापल्या! "हिंमत असेल तर रोज माझी कार तपासा"; ममता बॅनर्जींचं निवडणूक आयोगाला चॅलेंज
17
सोन्याच्या बाजारात मोठी खळबळ: रशिया, तुर्कीसह बड्या देशांकडून सोन्याची धडाधड विक्री; नेमकं कारण काय?
18
"तुम्ही ममतांचा हिशोब करा, आम्ही गुंडांना उलटे टांगून सरळ करू!"; पश्चिम बंगालमध्ये अमित शाह कडाडले
19
Latest Marathi News LIVE Updates: US-इराण यांच्यातील युद्धविराम आणखी २ आठवडे वाढण्याची शक्यता, पुन्हा होणार चर्चा?
20
छुप्या युतीचा पर्दाफाश? इराणचे सॅटेलाइटच्या मदतीनं अमेरिकन ठिकाणांवर हल्ले! या देशानं केला मोठा खेला?
Daily Top 2Weekly Top 5

फेसबुकमुळे माओवादी कमांडर पोलिसांच्या जाळ्यात

By admin | Updated: June 18, 2014 11:12 IST

मेघालय येथील माओवादी संघटनेचा कमांडर फेसबुकमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आर.संगमा असे या कमांडरचे नाव असून गेल्या चार महिन्यांपासून तो फरार होता.

ऑनलाइन टीम

बंगळुरु, दि. १८- मेघालय येथील माओवादी संघटनेचा कमांडर फेसबुकमुळे पोलिसांच्या जाळ्यात अडकला आहे. आर.संगमा असे या कमांडरचे नाव असून गेल्या चार महिन्यांपासून तो फरार होता. 
मेघालयमधील गारो नॅशनल लिबरेशन आर्मी या प्रतिबंधित माओवादी संघटनेत आर.संगमा हा दोन नंबरवरील कमांडर होता. ही संघटना मेघालयमधील गारो समाजासाठी स्वतंत्र गोरखालँड राज्य व्हावे यासाठी २००९ मध्ये स्थापन झाली आहे. ही संघटना उत्तरपूर्व भारतात खंडणी व बाँबस्फोटांसारख्या गंभीर घटनांमध्ये सक्रीय आहे. संघटनेचा कमांडर आर.संगमा २०१४ मध्ये उत्तरपूर्वेतील डोंगरद-यांमधून पळ काढण्यात यशस्वी झाला होता. यानंतर मेघालय पोलिस त्याच्या मागावर होते. संगमा त्याची पत्नी व दोन मुलांसह बंगळुरु येथे स्थलांतरित झाला होता. खंडणी व गुन्हेगारी कारवायांमधून आलेल्या पैशातून त्याने बंगळुरुत अलिशान घर घेतले होते. यासाठी त्याने सर्व पैसे सासराच्या बँक अकाऊंटवर जमा केले होते.
पोलिसांच्या ससेमिरा चुकवण्यासाठी त्याने बंगळुरुत १० मोबाईल फोन व २० सिमकार्डचा वापर केला. मात्र या दरम्यान संगमाला फेसबुकचे वेड लागले. फेसबुकवर फोटो टाकणे, दररोज स्टेटस अपडेट करायची त्याला सवय जडली. या आधारे पोलिसांनी बंगळुरु पोलिसांच्या मदतीने संगमाचा मागोवा घेतला. अखेरीस सोमवारी त्याला बंगळुरुतील चांदपूरा येथून अटक करण्यात आली.