शहरं
Join us  
Trending Stories
1
पंजाब पोलीस संदीप पाठक यांच्या दिल्लीतील घरी पोहोचले, खासदार मागच्या दाराने पळून गेले
2
जनगणनेसाठी तुमची माहिती नोंदविली का? स्व-गणना कशी करावी, कोणती माहिती लागते...
3
एक दिवसाची सुट्टी सांगून गेले आयजी, साडे तीन महिने झाले पोलिसांनाच माहिती नाही...; राजस्थानमध्ये खळबळ...
4
Pune crime: CCTV मधील ‘त्या’ दृश्याने उलगडलं संपूर्ण प्रकरण; चिमुरडीच्या मृत्यूने नसरापूर पेटलं
5
सिब्बल यांचा युक्तिवाद निष्फळ, ममतांना धक्का, सुप्रीम कोर्टाने मतमोजणीबाबत दिले असे आदेश
6
उल्हासनगरातील नेताजी चौकात मुलीच्या वादातून राडा, तरुणांच्या पोटात चाकू खुपसून जीवेठार मारण्याचा प्रयत्न 
7
'मला दाखवला तो मुलगा हीरोसारखा होता, हा तो नाहीच', मांडवात वधूचा धिंगाणा, थेट पोलीसच बोलावले, मग...
8
Video व्हायरल...! पापा की परी गटारीच्या झाकणावरून उडाली...! स्कुटरवरून सुस्साट आलेली, SUV ला ओव्हरटेक मारायला गेली... 
9
८ मुलांची आई जावयासोबत फरार; मेहंदीच्या बहाण्याने शेतात भेटले अन् दुचाकीवरून पळाले!
10
आता केवळ शेअर्समध्ये गुंतवणूकीचा काळ संपला; 'या'वर तुटून पडले भारतीय, पैसे गुंतवण्याचा केला विक्रम
11
"प्रत्येकाला पक्ष वाढवण्याचा अधिकार, २०२९ मध्ये शिवसेना-भाजपा स्वबळावर लढू शकते"; संजय शिरसाट यांचे मोठे विधान
12
पेट्रोलमध्ये ८५ टक्के इथेनॉलच्या चर्चेने 'हा' शेअर सुसाट; नितीन गडकरींच्या मुलाची आहे कंपनी
13
Pune Crime : 'वासरू दाखवतो’ म्हणत गोठ्यात नेलं; चिमुकलीवर अत्याचार करून मृतदेह शेणाच्या ढिगाऱ्याखाली लपवला
14
भारताच्या 'या' राज्यात सापडला दुसऱ्या महायुद्धाच्या काळातील जिवंत बॉम्ब; लष्कराच्या सतर्कतेमुळे मोठा अनर्थ टळला!
15
तीन बायका करामत ऐका! साध्या शिपायाने केला असा खेळ, पत्नी, मेहुणी, सासू अन् मैत्रिणींना...  
16
SBI मध्ये जमा करा ₹२,००,००० आणि मिळवा ₹१,०५,९८३ चं फिक्स व्याज, मिळेल सरकारची गॅरेंटीही
17
"लाईफ जॅकेट दिले तरी लोकांनी घातले नाहीत"; जबलपूर क्रूझ अपघातावर कॅप्टनने रडत मागितली माफी
18
"राजा बेटा उठ ना...", आईला बिलगलेल्या त्रिशानच्या मृतदेहाजवळ बापाचा टाहो; ऐकून काळजाचं पाणी होईल! 
19
अमेरिकन कंपनीचा खेळ खल्लास! रातोरात लागणार टाळे; ट्रम्प यांनीही वाचवण्याचे प्रयत्न केले नाहीत
20
राज्यात बारावीचा निकाल जाहीर, पुन्हा मुलींनी मारली बाजी; ९४ टक्के निकालासह कोकण विभाग अव्वल
Daily Top 2Weekly Top 5

BREAKING: मोठी बातमी! रेमडेसिवीर इंजेक्शनच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं घातली बंदी; कोरोनाच्या पार्श्वभूमीवर निर्णय

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 11, 2021 17:48 IST

Remdesivir Injection Export: कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे.

Remdesivir Injection Export: कोरोनावर गुणकारी असलेल्या रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात थांबविण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. देशातील कोरोनाची स्थिती जोवर सुधारत नाही तोवर रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषधांची निर्यात बंद राहणार आहे, असं केंद्र सरकारकडून जाहीर करण्यात आलं आहे. एएनआय या वृत्तसंस्थेनं याबाबतचं ट्विट केलं आहे. (Export of injection Remdesivir prohibited till the COVID19 situation in the country improves Government of India)

देशातील प्रत्येक स्थानिक औषध निर्मिती संस्थांना त्यांच्या संकेतस्थळावर रेमडेसिवीरचा उपलब्ध साठ्याची माहिती देण्याचेही आदेश केंद्रानं दिले आहेत. याशिवाय देशातील सर्व औषध प्रशासन आणि अधिकाऱ्यांना रेमडेसिवीर औषधांच्या साठ्याची इत्यंभूत माहिती आणि नोंद घेण्याच्या सूचना देखील केंद्रानं जारी केल्या आहेत. रेमडेसिवीरचा काळाबाजार थांबविण्यासाठी देखील योग्य ती कडक कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. 

देशात कोरोनाची वाढती संख्या लक्षात घेता येत्या काळात रेमडेसिवीरची देशांतर्गत मागणी मोठ्या प्रमाणात वाढू शकते. त्यामुळे देशांतर्गत मागणी पूर्ण करण्यासाठी रेमडेसिवीरच्या निर्यातीवर बंदी घालण्यात येत असल्याचं केंद्रानं म्हटलं आहे. रेमडेसिवीरच्या उप्तादनावरही बारकाईनं लक्ष असल्याचंही केंद्रानं सांगितलं आहे. 

रेमडेसिवीरची चढ्या दरानं विक्रीकोरोना रुग्णांसाठी रेमडेसिवीर इंजेक्शन आणि औषध गुणकारी ठरत असल्यानं मागणी वाढली आहे. याचाच फायदा घेत या औषधाचा काळा बाजार सुरू असल्याचीही प्रकरणं पुढे आली आहेत. राज्यात अनेक ठिकाणी रेमडेसिवीरचा काळा बाजार करणाऱ्यांवर कारवाई देखील करण्यात येत आहे. 

राजेश टोपे यांनीही केली होती निर्यातबंदीची मागणीराज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनीही शनिवारी सर्वपक्षीय बैठकीत रेमडेसिवीरच्या निर्यातीवर केंद्र सरकारनं बंदी घालावी, अशी मागणी केली होती. राज्यातील रुग्णांना रेमडेसिवीर सहज उपलब्ध व्हावे यासाठी याचा देशपातळीवर निर्णय व्हावा असं टोपे म्हणाले होते.  

टॅग्स :corona virusकोरोना वायरस बातम्याCorona vaccineकोरोनाची लसCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसNarendra Modiनरेंद्र मोदी