ताबा रेषेवर स्फोट; एक जवान शहीद

By Admin | Updated: June 13, 2014 03:27 IST2014-06-13T03:27:20+5:302014-06-13T03:27:20+5:30

काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आज झालेल्या स्फोटात लष्कराचा एक जवान शहीद झाला

Explosion on possession line; A young martyr | ताबा रेषेवर स्फोट; एक जवान शहीद

ताबा रेषेवर स्फोट; एक जवान शहीद

जम्मू : काश्मीरच्या पूंछ जिल्ह्यातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर आज झालेल्या स्फोटात लष्कराचा एक जवान शहीद झाला असून अन्य तिघेजण जखमी झाले आहेत, अशी माहिती अधिकृत सूत्रांनी दिली.
कर्नल मनीष मेहता यांनी दिलेल्या माहितीनुसार, सकाळी ८.३० च्या सुमारास गस्त घालणाऱ्या एका पथकावर आयईडीने हल्ला करण्यात आला. यात एक जवान शहीद झाला तर तिघे जखमी झाले आहेत.
शहीद झालेल्या जवानाचे नाव शंकर सिंग असे असून जखमींमध्ये मोहिंदरसिंग, शामवीर व सुरिंदर प्रसाद हे जवान आहेत. दहशतवाद्यांनी ज्या मार्गावरून हे पथक जाणार होते त्यावर भुसूरुंग पेरून ठेवले होते. (वृत्तसंस्था)

Web Title: Explosion on possession line; A young martyr