शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
2
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
3
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
4
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
5
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
6
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
7
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
8
भयंकर... भयंकर! अश्लील फोटो, व्हिडीओ क्लिप; अमरावतीनंतर नागपूरमध्ये १९ वर्षीय तरुणीवर लैंगिक अत्याचार
9
अयान म्हणतो, तो चार भिंतीतला अ‍ॅक्ट 'विथ हर कन्सेंट', सोशल मीडियातून हेरले सावज; तो 'फ्लॅट' ऐय्याशीचा हॉटस्पॉट
10
"२ किलो मटन खातील...! टीएमसीचे लोक नेमकं कोणतं मांस खातात?" हिमंता बिस्वा सरमा यांचं ममता बॅनर्जींना 'ओपन चॅलेंज'
11
"ये गलत आंकडा बता रहे हैं...!", लोकसभेत अखिलेश यादव यांनी अमित शाह यांना टोकलं; नेमकं काय घडलं?
12
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
13
काँग्रेस आमदाराला जन्मठेप! भाजप नेत्याच्या हत्येप्रकरणी न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल
14
इस्रायलचे हल्ले आता जागतिक सुरक्षेसाठी मोठा धोका! तुर्कीच्या परराष्ट्र मंत्र्यांचा इशारा; जगाला केले हे आवाहन...
15
डिग्रीपेक्षा 'स्किल' महत्त्वाची! घरबसल्या कमवा ₹1 लाख; आजच शिका ‘या’ 5 हाय डिमांड स्किल्स
16
Travel : राजवाडा, बोटींग आणि रंगीबेरंगी कारंजे… कोकणचं 'स्वित्झर्लंड' तुम्ही पाहिलंय का?
17
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
18
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
19
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
20
"उंदीर-झुरळांसोबत राहावं लागलं, गंभीर आजार झाला"; सोनाली राऊतचे 'बिग बॉस मराठी'च्या टीमवर गंभीर आरोप; म्हणाली...
Daily Top 2Weekly Top 5

हिंदूसोबत लग्न केलं म्हणून चर्चने मागितलं स्पष्टीकरण

By admin | Updated: March 18, 2016 13:18 IST

हिंदू महिलेशी लग्न केल्याबद्दल चर्चने आपल्या सदस्याकडे स्पष्टीकरण मागितल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे

ऑनलाइन लोकमत - 
कोच्ची, दि. १८ - हिंदू महिलेशी लग्न केल्याबद्दल चर्चने आपल्या सदस्याकडे स्पष्टीकरण मागितल्याची धक्कादायक घटना केरळमध्ये घडली आहे. बेन्नी थोम्माना यांच्याकडून हे स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. बेन्नी थोम्माना सेंट जोसेफ चर्चेचे सदस्य आहेत. 10 वर्षापुर्वी त्यांनी लिजा जयासुधन या हिंदू  महिलेशी लग्न केलं होतं. बेन्नी थोम्माना आणि लिजा जयासुधन दोघेही आपापल्या धर्माच्या रुढी, परंपरांच पालन करतात. 
 
बेन्नी यांना मार्च 2016 मध्ये जेव्हा हे पत्र मिळालं तेव्हा त्यांना धक्काच बसला. बेन्नी यांनी चर्चचे धार्मिक विधी न करता लग्न केल्याप्रकरणी त्यांच्याकडून स्पष्टीकरण मागवण्यात आले आहे. बेन्नी यांना चर्चच्या विशेष प्रशासकीय न्यायाधिकरणासमोर हजर होण्यास सांगण्यात आलं आहे. 
 
विशेष विवाह कायद्याअंतर्गत 7 फेब्रुवारी 2005 मध्ये विवाहाची नोंदणी करण्यात आली आहे. मी कायद्याविरोध कोणतंही कृत्य केलेलं नाही. आम्हाला धमकावलं जात आहे. आम्हाला शांततेत आयुष्य जगायचं आहे असं बेन्नी यांनी सांगितलं आहे. न्यायाधिकरणासमोर आम्ही हजर होणार नाही. धर्मांतर करण्याचा तर प्रश्नच उद्भवत नाही. कोणत्या धर्मांचं पालन करायचं हे आमची मुले ठरवतील असंही बेन्नी बोलले आहेत. 
 
फादर पदायत्ती यांनी चर्च नामकरणविधी, दफनविधी आणि विवाह यांची नोंद ठेवतं असल्याचं सांगितल. न्यायाधिकरण त्यांना आध्यात्मिक कार्यासाठी बोलावत आहे. आम्ही कोणालाही धर्मातर करण्यास सांगत नाही आहोत. कुटुंबाने लग्नाची माहिती लपवली होती त्यामुळे चर्चला यासाठी इतका उशीर लागल्याचं स्पष्टीकरण फादर पदायत्ती यांनी दिलं आहे.