शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

अपेक्षांचं बॅलन्स शीट

By admin | Updated: July 3, 2014 16:47 IST

अच्छे दिन आयेंगे असं स्वप्न दाखवत निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांचं राजकीय कौशल्य देशानं अनुभवलं, पण आता १२१ कोटी लोकसंख्येच्या देशाला उत्सुकता आहे ती त्यांच्या आर्थिक नीतीची.

अच्छे दिन आयेंगे असं स्वप्न दाखवत निवडणूक जिंकून नरेंद्र मोदी यांचं राजकीय कौशल्य देशानं अनुभवलं, पण आता १२१ कोटी लोकसंख्येच्या देशाला उत्सुकता आहे ती त्यांच्या आर्थिक नीतीची. १0 जुलै रोजी मोदी सरकारतर्फे मांडल्या जाणार्‍या पहिल्या अर्थसंकल्पाच्या पार्श्‍वभूमीवर ‘लोकमतनं विविध क्षेत्रांत काम करणार्‍या तज्ज्ञांची मतं, आणि सर्वसामान्यांच्या ‘अपेक्षांचं बॅलन्सशीट’ तयार केलं. ते खास तुमच्यासाठी..
 
‘बजेट’ची कूळकथा!
बजेट हा शब्द आता आपल्या अंगवळणी पडला आहे. परंतु, या शब्दाची नेमकी उत्पत्ती कशी झाली? तो प्रचलित कसा झाला, हे ठाऊक नसते. बजेट शब्दाची उत्पत्ती फ्रेंच शब्द ‘बॉगेत’ (ु४ॅी३३ी) पासून झाली आहे. याचा अर्थ ‘चामड्याची पिशवी’ असा होतो. (आपण आपले पैसेही चामड्याच्या पिशवीत अर्थात पाकिटातच ठेवतो.) आपल्या घरातही आपण ‘बजेट’ या शब्दाचा सर्रास वापर करत असतो. लग्नकार्य असेल किंवा महिन्याच्या खर्चाचा ताळमेळ घालायचा असेल तर ‘बजेट’ हा शब्द आपसूक आपल्या तोंडी येतो.
 
 
अरुण जेटली मांडणार ८४ वा अर्थसंकल्प
भारत स्वतंत्र झाल्यापासून आतापर्यंत एकूण ३६ अर्थमंत्री झाले आहेत. व्यक्तीचा हिशेब केल्यास विद्यमान अर्थमंत्री अरुण जेटली हे २६ वे अर्थमंत्री आहेत.
स्वतंत्र भारताचा पहिला अर्थसंकल्प आर.के. षण्मुगम चेट्टी यांनी २६ नोव्हेंबर १९४७ रोजी संसदेला सादर केला.
येत्या १0 जुलैला सादर होणारा अर्थसंकल्प हा भारताच्या इतिहासातील ८४ वा अर्थसंकल्प राहील. 
आतापर्यंत ६६ पूर्ण अर्थसंकल्प आणि १३ अंतरिम अर्थसंकल्प सादर केले गेले आहेत. याशिवाय चार वेळा विशेष अर्थसंकल्पीय मागण्याही सादर होऊन मंजूर झाल्या आहेत.
 
चामड्याची पिशवी
‘बजेट’ शब्द प्रचलित होण्याचा एक छान किस्सा आहे. इंग्लंडचे माजी अर्थमंत्नी सर रॉबर्ट वॉलपोल यांच्याशी निगडित हा किस्सा आहे. १७३३ मध्ये अर्थसंकल्प सादर करण्यासाठी वालपोल संसदेत आले. येताना त्यांनी एक चामड्याची पिशवी आपल्यासोबत आणली होती. त्यांनी बजेट सादरही केले. परंतु, यानंतर काही दिवसांनंतर त्यांची चेष्टा करण्यासाठी ‘बजेट इज ओपन’ या नावाने एक पुस्तिका प्रकाशित करण्यात आली आणि यानंतर हा शब्द प्रचलित झाला.