शहरं
Join us  
Trending Stories
1
महाराष्ट्राच्या राजकारणात राज ठाकरेंचे स्थान काय? फोडाफोडीच्या आरोपांवरुन पवारांची बोचरी टीका
2
Arvind Kejriwal : "भाजपा अमित शाहांना पंतप्रधान बनवणार, योगींना 2 महिन्यांत हटवणार"; केजरीवालांची भविष्यवाणी
3
बाल्टिमोर ब्रिज दुर्घटनेला ५० दिवस उलटूनही २० भारतीय जहाजात अडकले; जाणून घ्या कारण
4
आदिल खानने राखी सावंतच्या आजाराला म्हटलं 'ढोंग'; कॅन्सर, हार्ट प्रॉब्लेमची केली पोलखोल
5
Sunil Chhetri : भारतीय फुटबॉलचा 'चेहरा' निवृत्त; दिग्गजासाठी किंग कोहलीचे खास तीन शब्द
6
Gold vs Share: सोनं की शेअर! 5 वर्षांत कुणी दिला अधिक परतावा अन् केलं मालामाल? जाणून घ्या
7
स्वाती मालिवाल यांच्याबाबतच्या प्रश्नावर केजरीवाल यांनी पाळलं मौन, संजय सिंह म्हणाले...  
8
NDA ला ४०० पेक्षा अधिक जागा मिळाल्या, तर शेअर बाजारात.., दिग्गज परदेशी गुंतवणूकदाराचं भाकित
9
दारु घोटाळ्यात १५ दिवसांसाठी जेलमधून आलेल्या अरविंद केजरीवालांवर विश्वास का ठेवायचा? - काँग्रेस
10
भारतीय फुटबॉलचा नायक सुनील छेत्रीची निवृत्तीची घोषणा; झाला भावूक
11
बाप्पाच्या मिरवणुकीत बंदुक काढली, तुम्हाला आत टाकणारच; आदित्य ठाकरेंचा सरवणकरांना इशारा
12
ना आलिया, ना दीपिका अन् नाही कतरिना..., ही आहे बॉलिवूडमधील सर्वात महागडी अभिनेत्री
13
देशातील पहिला पौराणिक ओटीटी प्लॅटफॉर्म 'Hari Om' सुरु करणार, Ulluचे मालक विभू अग्रवाल यांची घोषणा
14
जेट एअरवेजच्या नरेश गोयलांच्या पत्नीचे निधन; तिच्याच आजारपणामुळे मिळालेला जामीन
15
"मुस्लिमशी लग्न केल्यानंतर अख्खी मुंबई...", तन्वी आजमींनी सांगितली 'ती' जुनी आठवण
16
'दुनियादारी' फेम अभिनेता पंतप्रधान नरेंद्र मोदींना भेटून भारावला, म्हणाला - "आयुष्यातला मौल्यवान क्षण.."
17
धक्कादायक! कार चालवताना चालकाची अचानक तब्येत ढासळली; ड्रायव्हिंग शीटवर जीव सोडला
18
"लोकसभा निवडणुकीनंतर सर्वात आधी पाकिस्तानात जाणार मोदी"; पाकिस्तानी मीडियाचा मोठा दावा
19
'हे काय शहाणपणाचे लक्षण नाही'; पंतप्रधान मोदींच्या रोड शोवरुन शरद पवारांची टीका
20
हादरवणारी घटना! एकतर्फी प्रेमातून २१ वर्षीय युवतीची हत्या; पहाटे घरात घुसून हल्ला

Amit Shah : जम्मू-काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करणार, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांचे प्रतिपादन

By ऑनलाइन लोकमत | Published: October 25, 2021 8:41 AM

Amit Shah : शहा म्हणाले, ‘या केंद्रशासित प्रदेशात १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच आली आहे आणि स्थानिक युवकांना ५ लाख रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी २०२२ अखेर एकूण ५१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सरकारचे लक्ष्य आहे.’ ज

जम्मू : जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवाद नष्ट करून नागरिकांच्या हत्यांना पूर्णविराम देण्याचे सरकारचे लक्ष्य आहे, असे ठाम प्रतिपादन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी रविवारी येथे केले. ते म्हणाले, कोणालाही शांतता आणि विकासात अडथळे आणू दिले जाणार नाहीत. शहा म्हणाले, ‘या केंद्रशासित प्रदेशात १२ हजार कोटी रुपयांची गुंतवणूक आधीच आली आहे आणि स्थानिक युवकांना ५ लाख रोजगार संधी उपलब्ध करून देण्यासाठी २०२२ अखेर एकूण ५१ हजार कोटी रुपयांच्या गुंतवणुकीचे सरकारचे लक्ष्य आहे.’ जम्मू आणि काश्मीरला विशेष दर्जा देणारे घटनेतील ३७० वे कलम ५ ऑगस्ट, २०१९ रोजी रद्द केल्यानंतर प्रथमच शहा जम्मू आणि काश्मीरच्या तीन दिवसांच्या दौऱ्यावर आले आहेत.येथील भगवतीनगरमध्ये जाहीर सभेत बोलताना शहा यांनी नॅशनल काॅन्फरन्स, पीपल्स डेमोक्रॅटिक पक्ष व काँग्रेसचे नाव न घेता म्हटले की, गेल्या ७० वर्षांत जम्मू आणि काश्मीरच्या विकासाला आलेल्या अपयशाचे उत्तर देण्याची जबाबदारी तीन कुटुंबांची आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली विकासाचा नवा अध्याय जम्मू आणि काश्मीरमध्ये सुरू झाला आहे. परंतु, त्यात अडथळा आणण्याचे हानिकारक तत्त्वांचे प्रयत्न सुरू आहेत. शांतता आणि विकासात कोणीही अडथळे आणू शकणार नाही याची खात्री देण्यासाठी मी येथे आलो आहे, असे ते म्हणाले. सभेला मोठी उपस्थिती होती आणि लोकांनी घोषणा देत व टाळ्या वाजवत शहा यांचे स्वागत केले.

टॅग्स :Amit Shahअमित शाहJammu Kashmirजम्मू-काश्मीर