शहरं
Join us  
Trending Stories
1
Israel Hamas War: आता इस्रायलचा विजय झाल्याशिवाय हे हल्ले थांबणार नाहीत; पंतप्रधान Benjamin Netanyahu यांचे मोठे विधान
2
मोठी बातमी: बारामती मतदारसंघातील PDCC बँकेच्या शाखा व्यवस्थापकाविरुद्ध आचारसंहिता भंगाचा गुन्हा
3
"...ही देशातील प्रत्येक दलित, मागास, आदिवासीसाठी धोक्याची घंटा; I.N.D.I.A.च्या इराद्यापासून सावध राहा" - PM मोदी
4
15 दिवसांत उत्तर द्या, अन्यथा...; विजय वडेट्टीवार यांना न्यायालयाचा अवमान केल्याची नोटीस
5
"त्या लोकांना केवळ मला उद्ध्वस्त करण्यासाठी कामं नेमून दिली होती"; देवेंद्र फडणवीसांचा खळबळजनक दावा
6
Apple चे नवीन iPad Air अन् iPad Pro लॉन्च; जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
7
जॅक फ्रेझर-मॅकगर्क, अभिषेक पोरेल, त्रिस्तान स्तब्स यांची आतषबाजी, DC चे राजस्थानसमोर दोनशेपार लक्ष्य
8
"महाराष्ट्र काँग्रेसचे लोक 26/11च्या मुंबई हल्ल्यातील दहशतवाद्यांना क्लिन चिट देत आहेत..."; मोदींचा हल्लाबोल
9
"इंडी आघाडीचा एकच अजेंडा, ...तर ते 'मिशन कॅन्सल' चालवणार"! पंतप्रधान मोदींचा जोरदार हल्ला 
10
४,४,४,४,४,४,६,४,६,६! जॅक फ्रेझर मॅकगर्कची वादळी फिफ्टी; आर अश्विनने RR मिळवून दिली पहिली विकेट 
11
'नॉट रिचेबल' किरण सामंत अखेर 'रिचेबल', 15 मिनिटे बाकी असताना बजावला मतदानाचा हक्क!
12
रिषभची विकेट घेऊन युझवेंद्र चहलने इतिहास घडवला; ट्वेंटी-२०त पराक्रम करणारा पहिला भारतीय
13
EVM मशीनची पूजा केल्याप्रकरणी रुपाली चाकणकर यांच्याविरोधात गुन्हा दाखल 
14
'अडीच कोटीत EVM हॅक करून देतो', अंबादास दानवेंना तरुणाचा फोन; पुढे असे घडले...
15
Maharashtra Lok Sabha Election 2024 Live Updates : महाराष्ट्रात तिसऱ्या टप्प्यात ५४.०९ टक्के मतदान
16
"काँग्रेसला राम मंदिराबाबतचा न्यायालयाचा निर्णय बदलायचा आहे", भाजपा नेत्याचा दावा
17
पॅट कमिन्सने असं काय सांगितलं की हार्दिक पांड्या, सूर्यकुमार यादव यांना बसला शॉक?
18
Narendra Modi : "चार जूनला इंडिया आघाडीची एक्सपायरी डेट"; नरेंद्र मोदींचं टीकास्त्र
19
लोकसभा निवडणुकीत भाजप 400 जागा का मागत आहे? खुद्द पीएम मोदींनी सांगितले...
20
रवींद्र महाजनींच्या निधनानंतर आत्महत्या करायला गेला होता गश्मीर, म्हणाला -"मी टेरेसवर गेलो आणि..."

देशातील ९ दशलक्ष कामगारांचा रोजगार बुडाला

By ऑनलाइन लोकमत | Published: November 17, 2019 7:00 AM

देशाच्या इतिहासातील हा मोठा आकडा असल्याचे एका अभ्यासात समोर

ठळक मुद्देअझिम प्रेमजी विद्यापीठाचा अभ्यास  सेवाक्षेत्र वगळता रोजगार संधी घटल्या

नवी दिल्ली : गेल्या सात वर्षांमधे देशातील तब्बल ९ लाख नोकरदारांचा रोजगार बुडाला असून, देशाच्या इतिहासातील हा मोठा आकडा असल्याचे एका अभ्यासात समोर आले आहे. सेवा क्षेत्र वगळता इतर सर्व क्षेत्रातील रोजगारात कमालीची घट झाली आहे. नवरोजगार निर्मितीचा वेगही अत्यंत कमी असल्याचे प्रबंध सांगतो. अझिम प्रेमजी विद्यापीठाने २०११-१२ ते २०१७-१८ या कालावधीतील रोजगार निर्मितीचा अभ्यास केला असून, त्यातून ही माहिती समोर आली आहे.

‘इंडियाज एम्प्लॉयमेंट क्रायसेस : रायझिंग एज्युकेशन लेव्हल्स अ‍ॅण्ड फॉलिंग नॉन अ‍ॅग्रीकल्चरल जॉब ग्रोथ’ हा प्रबंध त्यांनी नुकताच सादर केला आहे. प्रेमजी विद्यापीठाच्या शाश्वत रोजगार निर्मिती केंद्राने हा प्रबंध प्रसिद्ध केला आहे. जवाहरलाल नेहरु विद्यापीठातील अर्थशास्त्राचे प्राध्यापक संतोष मेहरोत्रा आणि सेंट्रल युनिव्हर्सिटी आॅफ पंजाब मधील प्राध्यापक जे. के. पारिडा यांनी हा प्रबंध लिहिला आहे. खासगी आणि सरकारी या दोन्ही क्षेत्रात अस्थायी स्वरुपाच्या काही रोजगार संधी निर्माण झाल्या आहेत. तिच स्थिती असंघटित क्षेत्राची देखील आहे. तसेच, २०११-१२ नंतर खासगी आणि सार्वजनिक क्षेत्रातील पगारदारांच्या मूळ वेतनामधे देखील फारशी वाढ झालेली दिसत नाही. देशात २०११-१२ साली असलेले ४७४ दशलक्ष असलेले रोजगार २०१७-१८ साली ४६५ दशलक्षा पर्यंत खाली आले आहेत. कृषी क्षेत्रातील रजगाराच्या संधी गेल्या सात वर्षाला ४५ लाख या प्रमाणे घटल्या आहेत. म्हणजेच २०११ ते २०१७-१८ या कालावधीत सुमारे २७ दशलक्ष रोजगार कृषी क्षेत्रातून हद्दपार झाले आहेत. तसेच, उत्पादन क्षेत्रातील ३५ लाख रोजगार याच कालावधीत बुडाले आहेत. त्याच बरोबर बांधकाम क्षेत्रातील रोजगाराचा दरही खालावला आहे. हाताला काम नसलेल्या युवकांची संख्या दहा कोटीवर (१०० दशलक्ष) पोहचली आहे. उत्तरप्रदेशात सर्वाधिक २१ दशलक्ष युवकांच्या हाताला काम नाही. खालोखाल बिहार, पश्चिम बंगाल, महाराष्ट्र, मध्यप्रदेश, राजस्थान, गुजरात, कर्नाटक, तमिळनाडू, ओडिसा, झारखंड आणि आसाम या राज्यांचा क्रमांक येतो. सध्या लघु आणि मध्यम उद्योगांमधेच तुलनेने अधिक रोजगार संधी निर्माण होत आहेत. अकृषी रोजगारामधे या उद्योगांचा वाटा तब्बल ६८ टक्के आहे. 

 

टॅग्स :PuneपुणेjobनोकरीGovernmentसरकार