शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2026: MI vs CSK सामन्याआधी चेन्नईला मोठा धक्का; मराठमोळा स्टार क्रिकेटर स्पर्धेतून बाहेर
2
हंगेरीची मोठी घोषणा! नेतन्याहूंना अटक करणार; नवीन पंतप्रधान पीटर माग्यार यांचा इस्रायलला मोठा इशारा
3
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
4
Latest Marathi News LIVE Updates: चेन्नई सुपर किंग्जचा आयुष म्हात्रे दुखापतीमुळे IPL 2026 बाहेर
5
खाडी देशांत युद्ध...! भारतीय पर्यटकांनी या देशांकडे वळविला आपला मोर्चा; उन्हाळ्यात तुम्ही कुठे जाणार?
6
धक्कादायक! रील बनवण्याची हौस जिवावर बेतली; बाईकवरून स्टंट करताना पडून ३ भावांचा मृत्यू
7
एकनाथ शिंदेंनी शब्द पाळला; पहलगाममध्ये आदिलच्या कुटुंबाला घर बांधून दिले, १२ लाख खर्च केले!
8
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
9
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
10
Apple कडून वर्षाकाठी मिळतात ₹५२५ कोटी; टिम कुक यांची एकूण संपत्ती किती? आकडा ऐकून धक्का बसेल...
11
मध्यमवर्गीयांसांठी Hyundai स्वस्तात मस्त इलेक्ट्रिक SUV आणनार, 500 kmची रेंज अन् ढासू फीचर्स मिळणार; TATAचं टेन्शन वाढणार?
12
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
13
"मला विराट कोहलीसारखा पार्टनर हवाय...", युजवेंद्र चहलसोबत डेटिंगच्या चर्चा सुरू असतानाच 'बिग बॉस' फेम शेफाली बग्गाचं वक्तव्य
14
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
15
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
16
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
17
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
18
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
19
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
20
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
Daily Top 2Weekly Top 5

नाशिकच्या पथकाकडून अकरा जणांचे जबाब

By admin | Updated: October 28, 2015 00:05 IST

अजिंठा विश्रामगृहात जाबजबाब : दहा तास चालली चौकशी

अजिंठा विश्रामगृहात जाबजबाब : दहा तास चालली चौकशी
जळगाव: पोलीस निरीक्षक अशोक सादरे यांच्या आत्महत्येप्रकरणी दाखल गुन्‘ाच्या तपासासाठी नाशिक आयुक्तालयातील सहायक आयुक्त विजयकुमार चव्हाण यांचे पथक मंगळवारी पुन्हा जळगावात दाखल झाले. अजिंठा विश्रामगृहात त्यांनी रामानंद नगरच्या अकरा पोलीस कर्मचार्‍यांचे जबाब घेतल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली. दुपारी बारा वाजेपासून ते रात्री दहा वाजेपर्यंत दहा तास या जबाब नोंदविण्याचे कामकाज सुरू होते.
तपासाधिकारी विजयकुमार चव्हाण, पोलीस निरीक्षक नरेंद्र पिंगळे यांच्यासह पाच जणांचा या पथकात समावेश होता. याआधी १७ ऑक्टोबर रोजी चव्हाण यांचे पथक जळगावात आले होते. मंगळवारी दुपारी हे पथक पोलीस अधीक्षक कार्यालयात दाखल झाले. थोडा वेळ थांबून पोलीस अधीक्षक, अपर पोलीस अधीक्षक व स्थानिक गुन्हे शाखेकडून काही कागदपत्रे घेतली. त्यानंतर रामानंद नगर पोलीस स्टेशनला जाऊन आवश्यक ती माहिती घेऊन थेट अजिंठा विश्रामगृह गाठले.

यांचे नोंदविले आहेत जबाब
सादरे यांनी वाळूच्या डंपरवर कारवाईसाठी ज्या कर्मचार्‍यांना पाठविले होते ते राजेंद्र उगले,अनिल फेगडे, किरण पाटील, शैलेश चव्हाण, ललित भदाणे, ज्ञानेश्वर वाघ, सुनील पाटील, शशिकांत महाले, गोपाल बेलदार, हितेश बागुल, सुधाकर शिंदे आदींचे जबाब नोंदविले आहेत. ठाणे अमंलदाराचीही त्यांनी चौकशी केली. त्या दिवशी कोणत्या कर्मचार्‍याला काय सांगण्यात आले, त्यांनी काय केले. पोलीस स्टेशनला कोण आले. सादरेंनी खरोखर धमकी दिली का? यासह अनेक प्रश्न विचारुन त्यांचे जबाब नोंदवून घेतले.

सागरची कुंडली मागविली
सागर चौधरी याने जिल्‘ात कोणाविरुध्द केव्हा व काय तक्रार केली आहे. तसेच त्याच्याविरुध्द जिल्‘ात कुठे व काय तक्रारी, गुन्हे दाखल आहेत याची माहिती त्यांनी मिळविण्याचा प्रयत्न केला, मात्र ही माहिती एका दिवसात मिळणे शक्य नसल्याने दोन ते तीन दिवसात उपलब्ध करून देण्याच्या सूचना त्यांनी केल्या. अजिंठा विश्रामगृहावर जबाब सुरू असताना दोन कर्मचारी दुपारी पोलीस अधीक्षक कार्यालयात कागदपत्रे घेण्यासाठी आले होते. संध्याकाळीही काही कर्मचार्‍यांनी रामानंद नगरला जाऊन माहिती घेतली.