शहरं
Join us  
Trending Stories
1
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
2
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
3
“भाजपात दुय्यम स्थान, RSS प्रमुखपदी महिलेला जबाबदारी देणार का”; विजय वडेट्टीवारांचा थेट सवाल
4
"थोडीही चुक केली तरी संपूर्ण ताकदीनं उत्तर देऊ..."; इराणचा ट्रम्प यांना थेट इशारा
5
मध्यपूर्वेतील तणावाचा परिणाम: भारतातील LPG वापरात १३% घट; पुरवठा साखळीवर मोठा परिणाम
6
अक्षय्य तृतीयेला सोनं खरेदी करताय? आधी 'या' महत्त्वाच्या गोष्टी जाणून घ्या, तुमचाच होईल फायदा...
7
बापाचे राक्षसी कृत्य! "मी त्यांना सांभाळेन", असं म्हणणाऱ्या पतीनेच ११ मिनिटांनी रिद्धी आणि सिद्धीची केली हत्या
8
मुख्यमंत्री वैद्यकीय निधी ठरतोय रुग्णांचा ‘आधार’, उपनगरात ८६९ रुग्णांना ८.१० कोटींची मदत
9
PM मोदींचे भाषण अन् कारमधला फोटो... 'युवा आमदार' मैथिली ठाकूर होतेय ट्रोल, कारण...
10
१२ कोचची नॉन-AC ट्रेन, आजपर्यंत मिळाल्या नाहीत अशा १० सेवा मिळणार; प्रवाशांना मोठा फायदा!
11
Mumbai RTO News: आरटीओच्या सेवा ऑनलाइन; तरीही कार्यालयांमध्ये हेलपाटे
12
पेट्रोल ११९.८५ रुपये तर डिझेल १२३ रुपयांवर! तेल कंपन्या पुन्हा वाढवणार भाव? जाणून घ्या महाराष्ट्रातील दर
13
समृद्धी महामार्गावर निष्काळजीपणाचा कहर! बस अपघातात चिमुकलीचा मृत्यू, २५ प्रवासी जखमी
14
"माझ्यामध्ये दैवीशक्ती आहे, कॅन्सरसारखे आजारही बरे करतो", संगमनेरमधील भोंदूबाबा गजाआड
15
Shreyas Iyer: "मिशन चॅम्पियनसाठी पाय जमिनीवर असू द्या", श्रेयस अय्यर पंजाबच्या खेळाडूंना असं का म्हणाला?
16
“PM मोदींचे राष्ट्राला उद्देशून संबोधन म्हणजे विरोधकांना मोठी चपराक”: DCM एकनाथ शिंदे
17
"ज्या भाजपने महाराष्ट्रात..."; 'महिला आरक्षण'वरून अंजली दमानिया यांची फडणवीसांवर बोचरी टीका
18
रणवीर-दीपिका पुन्हा आईबाबा होणार! क्युट फोटो पोस्ट करत शेअर केली गुडन्यूज
19
Ration Card News: आता लाभार्थ्यांना एकाचवेळी मिळणार तीन महिन्यांचे रेशन
20
PM Modi: विरोधकांची महिलाविरोधी कट्टर मानसिकता जनतेसमोर उघड करा: पंतप्रधान मोदी
Daily Top 2Weekly Top 5

३० उमेदवारांचे शिक्षण दहावीच ! रणधुमाळी : पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले ४० जण...

By admin | Updated: October 27, 2015 00:25 IST

एम.जी. मोमीन ल्ल जळकोट

एम.जी. मोमीन ल्ल जळकोटजळकोट नगरपंचायतीच्या १७ जागांसाठी ७९ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. त्यातील ४० उमेदवारांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले असून, ३० उमेदवार दहावीपर्यंतच शिक्षण घेतले असल्याचे उमेदवारांनी सादर केलेल्या शपथपत्रावरून पहावयास मिळत आहे. जळकोट नगरपंचायतीची रणधुमाळी जोरात सुरू आहे. प्रत्येक पक्षांकडून जोरदार प्रचार सुरू झाला आहे. ७९ उमेदवार रिंगणात असले तरी त्यातील ३० जणांचे शिक्षण दहावीपर्यंतच झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. वॉर्ड क्र. ७ मधील भाजपाचे उमेदवार शिवानंद देशमुख यांचे शिक्षण मेकॅनिकल इंजिनिअरिंग असे झाले आहे. वॉर्ड क्र. ४ मधील काँग्रेसच्या डॉ. शितल काळे आणि अपक्ष गंगाधर लष्करे यांचे शिक्षण पदवीपर्यंत झाले आहे. तसेच वॉर्ड क्र. २ मधील अपक्ष ज्योती धुळशे˜े यांचे, वॉर्ड क्र. ३ मधील शिवसेनेच्या कल्पना डोंगरे आणि वॉर्ड क्र. ११ मधील अपक्ष दयानंद गायकवाड हे पदवीपर्यंत शिक्षण घेतलेले आहेत. दहावीपर्यंत शिक्षण घेतलेल्यांमध्ये अजिम लाटवाले, हलिमाबी शेख, शशिकला संपाळे, मथुराबाई नामवाड, उस्मान मोमीन, वहिदाबी मोमीन यांचा समावेश असून हे सर्व उमेदवार भाजपाचे आहेत. तसेच सुभाष धुळशे˜े, ताहेराबी शेख, शहजादबी बागवान, भागिरथीबाई गायकवाड, श्रावण गायकवाड, दस्तगीर घोणसे, सोमनाथ धुळशे˜े, सुशिला डांगे, गंगाबाई डांगे, सूर्यकांत धूळशे˜े या राष्ट्रवादीच्या उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंतच झालेले आहे. जळकोट नगरपंचायत निवडणुकीसाठी उभ्या असलेल्यांपैकी नऊ महिला उमेदवार या सुशिक्षित नसल्याचे त्यांनी सादर केलेल्या शपथपत्रावरून स्पष्ट होते. या महिला उमेदवारांनी स्वाक्षरीच्या जागी अंगठा उमटविला आहे. पार्वती बोधले (शिवसेना), ललिता गायकवाड (एमआयएम), अकबर मुल्ला (एमआयएम) या उमेदवारांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झाले असल्याचे पहावयास मिळत आहे. शाहनूरबी बागवान, चंद्रकला धुळशे˜े, शोभा गबाळे, सुमन तोगरे, ललिता गवळे, नागनाथ धुळशे˜े, प्रेमलाबाई मिसाळे, मैनोद्दीन बागवान, रिजवानबी मोमीन, पिराजी कोकणे या काँग्रेसच्या उमेदवारांचे शिक्षण दहावीपर्यंत झाले आहे. त्याचबरोबर ललुबाई कळसे, लक्ष्मीबाई कांबळे, दत्तात्रय गायकवाड, उषाताई मोरे या अपक्ष उमेदवारांचे शिक्षण केवळ दहावीपर्यंत झालेले आहे.