शहरं
Join us  
Trending Stories
1
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
2
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
3
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीड जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
4
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
5
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
6
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
7
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
8
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
9
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
10
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
11
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
12
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
13
Sonam Raghuvanshi : “आज पैशाच्या ताकदीपुढे आमचा पराभव”; सोनम रघुवंशीला जामीन मिळताच राजाच्या भावाचा संताप
14
कोलंबिया सरकार ८० हिप्पोंना ठार मारणार; अनंत अंबानी यांनी केली 'वनतारा'मध्ये पाठवण्याची विनंती
15
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
16
सोनम रघुवंशी जामिनावर सुटली, पण मेघालयातच अडकली; शिलॉन्ग न्यायालयाचा मोठा निर्णय
17
रशिया, चीनची जर क्षेपणास्त्रे आली तर अमेरिका बचाव करू शकणार नाही; पेंटागनची धक्कादायक कबुली 
18
"बोलने तो दो यार..." किंग कोहलीची शाळेतील विद्यार्थ्यांसमोरील 'बोलंदाजी' चर्चेत (VIDEO)
19
“इथे व्यवसाय करायचा असेल तर मराठी येणे आवश्यकच”; मंत्री प्रताप सरनाईकांनी स्पष्टच सांगितले
20
कोकणवासींना गुड न्यूज! १ मेपासून विशेष ट्रेन, वीकेंडला स्पेशल ३६ सेवा; कधीपर्यंत सुरू असेल?
Daily Top 2Weekly Top 5

'घराणेशाहीचे राजकारण लोकशाहीसाठी घातक', गांधी कुटुंबाचे नाव घेत शशी थरुरांचे मोठे वक्तव्य

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 4, 2025 12:04 IST

Shashi Tharoor on Dynastic Politics: घराणेशाहीवर शशी थरुरांचा स्फोटक लेख; भाजपकडून कौतुक, थर काँग्रेसवर टीकेची झोड!

नवी दिल्ली :काँग्रेस नेते शशी थरूर आपल्या विधानांमुळे नेहमी चर्चेत राहतात. आता पुन्हा एकदा 'राजकारणातील घराणेशाही'बाबत केलेल्या वक्तव्यामुळे चर्चेत आले आहेत. थरुरांनी भारतीय लोकशाहीसाठी 'घराणेशाहीचे राजकारण' घातक असल्याचे म्हटले. याचा थेट परिणाम प्रशासनाच्या गुणवत्तेवर होतो. त्यामुळे, घराणेशाही राजकारणापेक्षा गुणवत्तेला प्राधान्य देण्याची वेळ आली असल्याचे मत त्यांनी एका लेखातून व्यक्त केले. दरम्यान, थरुर यांच्या या लेखानंतर, भाजपने त्यांना 'खतरों के खिलाडी' म्हटले आहे.

शशी थरुर यांनी प्रोजेक्ट सिंडिकेटसाठी लिहिलेल्या “Indian Politics Are a Family Business” लेखात घराणेशाही राजकारणाबद्दल आपले मत व्यक्त केले. ते म्हणाले की, आज भारतातील प्रत्येक राजकीय पक्ष घराणेशाही राजकारणात अडकला आहे. प्रत्येकजण स्वतःच्या घराणेशाहीला चालना देण्यावर लक्ष केंद्रित करतो. हे चुकीचे आहे. असे केल्याने प्रशासनाच्या गुणवत्तेवर परिणाम होतो. जेव्हा असे होते तेव्हा लोकशाहीचा खरा अर्थ पूर्ण होत नाही.

विविध पक्षांचे उदाहरण देत थरूर पुढे म्हणतात की, काँग्रेस तसेच समाजवादी पक्ष, राजद, शिवसेना (उद्धव गट) आणि द्रमुक यांसारख्या अनेक इंडिया आघाडीतील पक्षांत नेतृत्व पिढ्यान्‌पिढ्या हस्तांतरित होत आले आहे. जवाहरलाल नेहरू, इंदिरा गांधी, राजीव गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी वाड्रा, यांनीच भारतीय राजकारणात नेतृत्व हे जन्मसिद्ध हक्क असल्याची कल्पना दृढ केली. दरम्यान, या लेखाचे भाजपकडून कौतुक करण्यात आले आहे. 

भाजपची प्रतिक्रिया

भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनी थरुर यांच्या लेखाचे वर्णन “सखोल आणि विचारप्रवर्तक” असे केले असून, थरूर यांना “खतरों के खिलाड़ी” असे संबोधत आपल्या पक्षातील राजकीय घराणेशाहीवर थेट प्रश्न उपस्थित केल्याबद्दल कौतुक केले. पूनावाला म्हणाले, “थरूर यांनी अत्यंत विचारपूर्वक सांगितले आहे की, गांधी परिवाराने भारतीय राजकारणाला ‘फॅमिली बिझनेस’मध्ये बदलले.”

केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनीही थरुर यांच्या निरीक्षणांचे समर्थन करत म्हटले की, “थरुर यांचा अनुभवावर आधारित लेख काँग्रेस आणि राजदला निश्चितच त्रासदायक ठरेल, कारण त्यांचे राजकारण फक्त कुटुंबापुरते मर्यादित आहे.”

काँग्रेसची प्रतिक्रिया 

काँग्रेस नेते रशीद अल्वी यांनी मात्र या वादावर प्रतिक्रिया देताना म्हटले की, “वंशवाद केवळ राजकारणात नाही, तर प्रत्येक क्षेत्रात दिसतो. लोकशाहीत शेवटी निर्णय जनता घेते. एखाद्याचे वडील खासदार होते म्हणून त्याच्या निवडणुकीवर बंदी घालता येत नाही.”

English
हिंदी सारांश
Web Title : Dynastic politics harmful to democracy: Shashi Tharoor targets Gandhi family.

Web Summary : Shashi Tharoor criticizes dynastic politics as detrimental to democracy, impacting governance quality. He points to parties like Congress, SP, and DMK, where leadership passes through generations. BJP praised his remarks, while Congress defended the practice.
टॅग्स :Shashi Tharoorशशी थरूरPoliticsराजकारणcongressकाँग्रेसBJPभाजपा