शहरं
Join us  
Trending Stories
1
अरब देशांत अडकलेल्यांसाठी खुशखबर! इराणने उघडली हवाई हद्द; मायदेशी परतण्याचा मार्ग मोकळा
2
कर्नाटकला विजेचा झटका! वीज दरात झाली वाढ, आता सर्वसामान्यांचे बजेट कोलमडणार
3
Bank of Maharashtra Robbery: दिवसाढवळ्या बँक ऑफ महाराष्ट्र बँकवर दरोडा; गोळीबार करत लाखो रुपये आणि सोनंही पळवलं!
4
Aaditya Thackeray : "गैरमार्गाने विजय मिळवण्यासाठीचे फेररचना विधेयक, राजकीय हेतूने..."; आदित्य ठाकरेंचा निशाणा
5
DA Hike: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, डीए वाढला; मंत्रिमंडळाचं शिक्कामोर्तब, किती वाढणार सॅलरी?
6
कधीकाळी चेंडूच्या वेगाने दहशत निर्माण करणारा 'हा' गोलंदाज आज ICU मध्ये देतोय मृत्यूशी झुंज
7
आता कच्चं तेल, LPG आणि खतांची कमतरता भासणार नाही, होर्मुझवरुन भारतात येण्यास ४१ जहाजं तयार
8
पालक पनीर , कढई पनीर, शाही पनीर...; तुम्हाला काय आवडतं? व्हिडिओ पाहिल्यानंतर खाणं सोडून द्याल!
9
इराण-इस्रायल युद्धामुळे जग हादरलं! ५० अब्ज डॉलर्सचं कच्चं तेल नष्ट, भारतावरही मोठा परिणाम
10
७८ मेल, २२ फोन कॉल... धर्मांतरासाठी WhatsApp ग्रुपचा वापर; चॅटिंगमधून धक्कादायक खुलासा
11
मध्य रेल्वेवर आज मध्यरात्री १० तासांचा विशेष ब्लॉक
12
Nida Khan : TCS धर्मांतर प्रकरणातील आरोपी निदा खान कुठे पळाली? पतीने पोलिसांना लोकेशन सांगितलं, पण...
13
आता जनगणना करायला घरी 'गर्लफ्रेंड' येणार; नगरपालिकेचे फर्मान वाचून सोशल मीडियात मीम्स व्हायरल
14
हृदयद्रावक! "बाबा, मी अडकलोय"; रशियातून ६ महिन्यांनी आला लेकाचा मृतदेह; कुटुंबाचा आक्रोश
15
Nagpur: फर्निचरची तोडफोड, कर्मचाऱ्यांना मारहाण, व्यवस्थापकावर फोडल्या बाटल्या; बारमध्ये तरुणांचा राडा
16
पुणे हादरलं! भाजप पदाधिकाऱ्याच्या पत्नीने केली सेक्रेटरीची हत्या; मुलीच्या मदतीने गोणीत भरला मृतदेह
17
विक्रमी नफा होऊनही कर्मचारी कपात करणार Meta; १६ हजार कर्मचाऱ्यांवर टांगती तलवार
18
अक्षय्य तृतीयेला २० हजारात घरी आणा नवीन Honda Activa; दर महिना किती भरावा लागेल EMI?
19
संबंध बनवण्यासाठी ब्लॅकमेल करायचा, विवाहितेने युवकाला कायमचा संपवला; अत्यंत क्रूरपणे केली हत्या
20
नाशिक TCS प्रकरणात आता ATS ची एन्ट्री; निदा खानचे दिल्ली बॉम्बस्फोटातील आरोपीशी संबंध?
Daily Top 2Weekly Top 5

पेट्रोल-डिझेल दरवाढीमुळे संताप

By admin | Updated: March 18, 2016 04:15 IST

पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे

नवी दिल्ली : पेट्रोलच्या दरात नोव्हेंबरपासून ४. 0२ रुपये आणि डिझेलच्या दरात ६.९७ रुपये वाढ झाल्याने देशभरात संताप आहे. यूपीए सरकारच्या काळात पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढताच भाजपचे नेते जोरदार टीका सुरू करीत. डॉ. मनमोहन सिंग सरकारवर दरवाढीचे खापर फोडत.आता मात्र दरवाढीवर भाजपा नेते मूग गिळून गप्प आहेत.केंद्रामध्ये यूपीए सरकार असताना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत तेलाच्या किमती प्रति गॅलन १२0 डॉलर्सवर गेल्या होत्या. त्यामुळे पेट्रोल व डिझेलचे भाव वाढत होते. त्याबद्दल भाजपचे सर्वच नेते यूपीए सरकारला दोषी धरत होते. आजच्या घडीला जागतिक बाजारपेठेत तेलाचे भाव ४0 डॉलर्सच्या खाली आले आहेत. त्या प्रमाणात पेट्रोल व डिझेलचे दर खाली येणे अपेक्षित होते. पण तसे न होता सतत दरवाढ सुरू असून, त्यामुळे सामान्यांमध्ये संताप आहे.डिझेलच्या सततच्या दरवाढीमुळे मालवाहतूक आणि प्रवासी वाहतूक लवकरच आणखी महाग होण्याची शक्यता आहे.सर्व राज्यांच्या परिवहन मंडळाच्या (स्टेट ट्रान्सपोर्ट-एसटी) बसेस डिझेलवर धावतात. खासगी बसेसही डिझेलवर चालतात. त्यामुळे सर्व देशभर प्रवासी भाडे उन्हाळ्याच्या सुटीच्या काळात महागणारआहे. मालवाहतूक करणारे ट्रक, टेम्पो हेही डिझेलवरच चालत असून, मालवाहतूकदारही आपले दर वाढवण्याच्या तयारीत असून, महाराष्ट्राच्या एसटी महामंडळाचा तोटा वाढतच चालला आहे. (लोकमत न्यूज नेटवर्क)भाजप नेत्यांनी वेळोवेळी केलेले ट्विट पुढीलप्रमाणे...नरेंद्र मोदी : (२३ मे २0१२ रोजी दरवाढ झाली, तेव्हा) हे काँग्रेस आणि यूपीए सरकारचे अपयश असून, यामुळे गुजरातच्या जनतेवर आर्थिक बोजा पडणार आहे. स्मृती इराणी : (१५ जानेवारी २0११ रोजी पेट्रोल-डिझेलचे दर वाढले, तेव्हा) जनतेच्या संतापाकडे केंद्र सरकार दुर्लक्ष करीत आहे.लोकांच्या भावनांचा अंत पाहत आहे.सुषमा स्वराज : ( ३ नोव्हेंबर २0११ रोजी पेट्रोल व डिझेलची भाववाढ झाल्यावर ) डॉ. मनमोहन सिंग सरकार सामान्यांच्या समस्यांविषयी असंवेदनशील आहे.स्मृती इराणी : (१६ नोव्हेेंबर २0११ रोजीच्या दरवाढीविषयी) केंद्र सरकारच्या चुकीच्या आर्थिक धोरणांचा हा परिणाम आहे.आता नरेंद्र मोदी, सुषमा स्वराज आणि स्मृती इराणी हे तिन्ही नेते केंद्रात सत्तेवर असूनही दरवाढ होणे ही जनतेची फसवणूक असल्याची टीका सर्व स्तरांतून होत आहे.