शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला आरक्षण विधेयक पडले, आगामी राजकारण आणि निवडणुकांवर याचा काय परिणाम होईल?
2
आजचे राशीभविष्य, १८ एप्रिल २०२६: आज आर्थिक लाभाची शक्यता; प्रत्येक काम सहजतेने पूर्ण होईल
3
मंत्र्यासोबत एकाच व्यक्तीला मंत्रिमंडळ सभागृहापर्यंत प्रवेश
4
वगळलेली नावे निकाल बदलू शकतात का? सर्वोच्च न्यायालयाचा सवाल
5
मुख्यमंत्र्यांच्या चिरंजीवांना पाडण्यासाठी उतरले दिग्गज, चेपॉक-तिरुवल्लिकेनी मतदारसंघात दोन दिग्गज आमने-सामने
6
काळीज पिळवटून टाकणारी क्रूरता! आईच्या डोळ्यादेखत मुलाला अमानुष मारहाण
7
गाईने मुलीचे प्राण वाचविल्याच्या व्हिडीओमागचं सत्य काय? समोर आली अशी माहिती
8
उष्णतेच्या लाटेचा होतोय नवा साइड इफेक्ट; आता मूतखडा, मूत्रमार्गांतील संसर्गांमध्ये वाढ
9
लोकलमध्ये दोन महिलांमध्ये हाणामारी; साेशल मीडियावर व्हिडीओ व्हायरल
10
इराण म्हणतोय होर्मुझ खुला केला, ट्रम्प म्हणतायत आभारी, पण आम्ही करणार नाही! इराण संतापला आणि म्हणाला...
11
ॲक्सिस बँकेतदेखील झाल्या होत्या नाशिकसारख्या घटना; अमृता फडणवीस यांचा गौप्यस्फोट
12
IPL 2026 : KKR च्या २५ कोटींच्या ऑलराउंडरची बॅट तळपली; पण शेवटी गिलसह GT चा संघच ठरला भारी
13
Job Alert: RBI मध्ये इंजिनीअर पदांसाठी भरती जाहीर! पदवीधरांना मोठी संधी; जाणून घ्या पगार आणि पात्रता
14
महिला आरक्षण विधेयक पडले अन्...! पाठोपाठ 'परिसीमन'सह इतर दोन बिलेही सरकारने घेतली मागे; नेमकं काय घडलं?
15
नाशिक TCS प्रकरण: संशयित आरोपी निदा खानचा पती मुंब्र्यातून पोलिसांच्या ताब्यात; तिचे २ महिन्यांपासून ठाण्यात होते वास्तव्य
16
"असंवैधानिक मार्गाचा अवलंब केला, 'INDIA'ने रोखले..."; महिला आरक्षण विधेयक कोसळल्यानंतर राहुल गांधी काय म्हणाले? 
17
होर्मुझची सामुद्रधुनी खुली झाल्याने तेल आणि वायूच्या किमती कोसळल्या! भारतावर याचा काय परिणाम होणार?
18
मोदी सरकारला १२ वर्षांत पहिल्यांदाच धक्का! एनडीएच्या महिला खासदारांचा संसदेच्या आवारात संताप, उद्यापासून...
19
तुम्ही पंतप्रधानांचा चेहरा पाहिला का?; विधेयक नामंजूर होताच राहुल गांधींचे वक्तव्य
20
मोठी बातमी! लोकसभेत महिला आरक्षण विधेयक फेटाळले; २३० खासदारांनी विरोधात मतदान केले 
Daily Top 2Weekly Top 5

ड्युटीवर जाणार्‍या सीआरपीएफ जवानाचा अपघातात मृत्यू महामार्गावर झाला अपघात : वर्षभरापूर्वीच झाले होते लग्न

By admin | Updated: March 5, 2016 00:55 IST

दहा दिवसाची सु˜ी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्‍या राकेश सुभाष पाटील-पवार या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला,

नशिराबाद : दहा दिवसाची सु˜ी संपल्यानंतर आसाम येथे ड्युटीवर जाणार्‍या राकेश सुभाष पाटील-पवार (वय २५ रा.मुडी मांडळ, ता.अमळनेर)या जवानाचा शुक्रवारी दुपारी अडीच वाजता नशिराबाद नजीक गोदावरी वैद्यकीय महाविद्यालयाजवळ ट्रक-दुचाकी अपघातात मृत्यू झाला, तर पत्नी नंदीनी या गंभीर जखमी झाल्या आहेत. त्यांच्यावर गोदावरी रुग्णालयात उपचार सुरु आहेत.राकेश हा आसाम येथे ड्युटीला होता. दहा दिवसापूर्वीच तो सु˜ीवर घरी आला होता. ही सु˜ी संपल्यानंतर आसामला जाण्यासाठी भुसावळ येथून रेल्वे असल्याने सकाळी दहा वाजता मुडी मांडळ येथून दुचाकीने (क्र.एम.एच.१९ बी.डब्लु.८६३६) पत्नीला सोबत घेऊन भुसावळकडे निघाला. दुपारी अडीच वाजेच्या दरम्यान आयशर ट्रक (क्र.एम.एच.०५ के.९९०६) व दुचाकी यांच्यात अपघात झाला. यात राकेश याच्या डोक्यातील कवटीच बाहेर आली, त्यामुळे तो जागीच गतप्राण झाला तर पत्नी नंदीनी यांनाही जबर मार लागल्याने त्याही गंभीर अवस्थेत आहेत. नशिराबाद पोलीस स्टेशनचे सहायक निरीक्षक सार्थक नेहते व त्यांच्या सहकार्‍यांनी नंदीनी यांना गोदावरी रुग्णालयात दाखल करून राकेशचा मृतदेह जिल्हा रुग्णालयात आणला.वडील गेले होते बसनेराकेश व त्याची पत्नी दुचाकीने तर त्याचे वडील सुभाष सुकलाल पाटील हे बसने भुसावळला गेले होते. मुलाला सोडण्यासाठी ते भुसावळपर्यंत आले होते, मुलगा भुसावळला न पोहचताच त्याच्या मृत्यूचाच निरोप त्यांना मिळाला. दरम्यान, राकेश याचे वर्षभरापूर्वीच लग्न झाले होते. तो एकुलता एक मुलगा होता. बहिणीचे लग्न झालेले आहे. आई-वडिलांनी मजुरी करून त्याला वाढविले. घरची परिस्थिती जेमतेमच होती. तो नोकरीला लागल्याने आता कुटुंबाला चांगले दिवस आले होते. पाच वर्षापूर्वी तो सीआरपीएफमध्ये भरती झाला होता.जिल्हा रुग्णालयात नातेवाईकांची गर्दीराकेशच्या अपघाताचे वृत्त समजताच त्याच्या अमळनेर, जळगाव व पारोळा तालुक्यातील नातेवाईकांनी जिल्हा रुग्णालयात धाव घेतली. शवविच्छेदन करून मृतदेह त्यांच्या ताब्यात देण्यात आला. हिसाळे ता.शिरपूर येथील त्याची सासुरवाडी आहे.