शहरं
Join us  
Trending Stories
1
IPL 2024 GT vs RCB: RCB चा 'विराट' शो! विल जॅक्सचे ४१ चेंडूत शतक; ४ ओव्हर राखून विजय
2
"मुस्लीम लोक सर्वाधिक कंडोम वापरतात..."; ओवेसींनी दिला केंद्राच्या डेटाचा हवाला, PM मोदींवर पलटवार
3
बीडमध्ये पंकजा मुंडे, मनोज जरांगे एकाच व्यासपीठावर; दोघांचाही एकमेकांना नमस्कार
4
BANW vs INDW: भारताची विजयी सलामी! बांगलादेश त्यांच्याच घरात ढेर; पाहुण्यांची सांघिक खेळी
5
ठाण्यात ऐन निवडणुकीत ठाकरेंची शिवसेना अडचणीत; एम. के. मढवींना अटक
6
माजी पंतप्रधानांच्या नातवाचे अश्लिल व्हिडीओ व्हायरल; निवडणूक होताच खासदार देशातून फरार
7
'अरे! तुमचं डोकं फुटलंय की सिलिंडर...'; बेंगलोर ब्लास्टवरून पंतप्रधान मोदी काँग्रेसवर बरसले 
8
माढ्याचा खासदार प्रत्येक वेळी नवा; आता कोण? परंपरा टिकणार की बदलणार?
9
IPL 2024 GT vs RCB : साई 'सु'दर्शन! शाहरूखही चमकला; युवा भारतीय खेळाडूंनी RCB ला धू धू धुतले
10
अनेक तासांचा प्रवास आता मिनिटांत! 'वंदे भारत' मेट्रोच्या रुपात येणार, कधी सुरू होणार? पाहा...
11
IPL 2024 GT vs RCB : "विराटच्या स्लो स्ट्राईक रेटबद्दल बोललं जातं पण...", इरफानची 'मन की बात'!
12
Narendra Modi : "राम मंदिर बांधण्याचा निर्णय देशाच्या स्वातंत्र्याच्या दुसऱ्याच दिवशी घ्यायला हवा होता"
13
'आप'च्या थीम साँगवर निवडणूक आयोगाचा आक्षेप; आतिशी म्हणाल्या, "त्यांनी हुकूमशाही केली तर योग्य, आम्ही गाणं लिहिलं तर चूक"
14
IPL 2024 GT vs RCB : WHAT A BALL सिराज! अखेर शाहरूख खानच्या घातक खेळीचा अंत
15
सांगलीत विशाल पाटलांना धक्का; चंद्रहार पाटील यांच्या प्रचारात विश्वजीत कदम सक्रिय
16
पवार कुटुंबातील आपल्या बाजूने कोण? सुप्रिया सुळेंच्या बाजूने कोण? आणि तटस्थ कोण? अजितदादांनी सविस्तर सांगितलं
17
'काँग्रेसची मुघल विचारसरणी, त्यांना औरंगजेबाचे अत्याचार आठवत नाहीत', PM मोदींचा हल्लाबोल
18
"मला त्याच्याकडून एकच गोष्ट शिकायचीय", गंभीरची 'विराट' बॅटिंग; ट्रोलर्सला दिलं प्रत्युत्तर!
19
न्यूझीलंडच्या नव्या खेळाडूंनी पाकिस्तानला घाम फोडला; आफ्रिदीने कशीबशी लाज राखली
20
भारताला वर्ल्डकप जिंकून देणारे गॅरी कस्टर्न बनले पाकिस्तानचे प्रशिक्षक 

dr. V. Anantha Nageswaran:अर्थसंकल्पापूर्वीच केंद्र सरकारचा मोठा निर्णय, देशाचे मुख्य आर्थिक सल्लागार बदलले

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 8:27 PM

dr. V. Anantha Nageswaran: केंद्र सरकारने डॉ. व्ही. अनंत नागेश्वरन यांची देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारपदी नियुक्ती केली आहे.

नवी दिल्ली: येत्या 31 जानेवारीपासून अर्थसंकल्पीय अधिवेशनाला सुरुवात होणार असून, 1 फेब्रुवारीला अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे. पण तत्पुर्वी केंद्र सरकारने नवीन मुख्य आर्थिक सल्लागाराची नियुक्ती केली आहे. डॉ.व्ही.अनंत नागेश्वरन (dr. V. Anantha Nageswaran) यांना जबाबदारी देण्यात आली आहे. त्यांनी तात्काळ प्रभावाने देशाचे नवे मुख्य आर्थिक सल्लागार म्हणून पदभार स्वीकारला आहे.

सरकार पुढील आठवड्यात देशाचा अर्थसंकल्प सादर करणार आहे,  पण त्या आधी नागेश्वरन यांची नियुक्ती केल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. यंदाचे अर्थसंकल्पीय अधिवेशन 31जानेवारीपासून सुरू होत आहे. आर्थिक आढावा त्याच दिवशी संसदेत मांडला जाणार आहे. तर 2022-23 या आर्थिक वर्षाचा केंद्रीय अर्थसंकल्प अर्थमंत्री निर्मला सीतारामन 1 फेब्रुवारी रोजी सादर करतील.

पीएम मोदींचे सल्लागार 

अनंत नागेश्वरन हे 2019 ते 2021 पर्यंत पंतप्रधानांच्या आर्थिक सल्लागार परिषदेचे अर्धवेळ सदस्य होते. याशिवाय त्यांनी लेखक, शिक्षक, मार्गदर्शक अशा अनेक भूमिका निभावल्या आहेत. ते भारतातील प्रसिद्ध बिझनेस स्कूल आणि मॅनेजमेंट इन्स्टिट्यूटचे प्राध्यापक आहेत. सिंगापूरच्या अनेक शैक्षणिक संस्थांमध्ये ते शिक्षकही राहिले आहेत.

आयआयएम अहमदाबादमधून शिक्षण घेतलेअनंत नागेश्वरन IFMR ग्रॅज्युएट स्कूल ऑफ बिझनेसचे डीन होते. याशिवाय ते क्रे विद्यापीठात अर्थशास्त्राचे व्हिजिटिंग प्रोफेसरही राहिले आहेत. अनंत नागेश्वरन यांनी इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट, अहमदाबाद (IIM-A) मधून मॅनेजमेंटमध्ये पोस्ट-ग्रॅज्युएट डिप्लोमा केला आहे. याशिवाय त्यांनी मॅसॅच्युसेट्स विद्यापीठातून डॉक्टरेटची पदवीही घेतली आहे.

टॅग्स :Central Governmentकेंद्र सरकारEconomyअर्थव्यवस्था