शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तान निघाला अमेरिका-इराण शांतता करार घडवून आणायला, दोनच आठवड्यांत बसला २०० अब्जांचा फटका; शाहबाज यांना मोठा धक्का!
2
रिंकूची बॅटिंगसह फिल्डिंगमध्ये कमाल! LSG विरुद्ध सुपर ओव्हरमध्ये नरेन ठरला KKR च्या विजयाचा हिरो
3
शेअर्स मार्केट मध्ये मोठा परतावा देण्याच्या नावाखाली गंडा, फरार सागर कारिवडेकर अखेर ताब्यात
4
LSG vs KKR : नो बॉलचा ड्रामा! शमीनं शेवटच्या चेंडूवर सिक्सर मारला अन् सामन्यात सुपर ओव्हरचं ट्विस्ट
5
सूर्य कोपला, विदर्भात तापला! उष्णतेचा कहर; अकोल्यात देशातील सर्वाधिक ४६.९ अंश सेल्सिअस तापमान
6
बेलसर येथे ड्रेनेज टाकी साफ करताना तीन कामगारांचा गुदमरून मत्यू 
7
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
8
LSG vs KKR : लखनौच्या मैदानात रिंकू सिंहचा 'मैं हूँ ना' शो! MS धोनीचा १५ वर्षांपूर्वीचा विक्रम मोडला
9
शिवाजी महाराज पूज्यनियच, माझ्या वक्तव्याचा विपर्यास केलागेला - धीरेंद्र शास्त्री
10
"फक्त जिम करून बॉलर होणार नाहीस, तर..." शमीच्या तालमीत कसा घडला मोहसिन खान?
11
बाजारात आली नवीन इलेक्ट्रिक कार, ६३० किमी रेंज, केवळ ९ मिनिटांत होईल फुल चार्ज! जबरदस्त आहेत फीचर्स
12
ट्रेनवर चढलेल्या युवकाचा विजेच्या धक्क्याने मृत्यू, ओएचई वायरला स्पर्श; विद्युत पुरवठा विस्कळीत, रेल्वे पोलिसांत गुन्हा दाखल
13
पंतनं खिलाडूवृत्ती नाही जपली! Angkrish Raghuvanshi ची विकेट ठरली वादग्रस्त; नेमकं काय घडलं?
14
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
15
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
16
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
17
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
18
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
19
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
20
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
Daily Top 2Weekly Top 5

ऐकावं ते नवलच! ...म्हणून गावकऱ्यांनी सरपंचांची काढली थेट गाढवावरून मिरवणूक

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 24, 2021 09:42 IST

donkey totka village sarpanch riding donkey : गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे.

नवी दिल्ली - देशभरात चांगला पाऊस पडावा यासाठी विविध गोष्टी केल्या जातात. अनेक खेड्यांमध्ये आजही यंदा पाऊस उत्तम पडावा म्हणून चित्र-विचित्र प्रकार केले जातात. मध्य प्रदेशच्या (Madhya Pradesh) विदिशा जिल्ह्यातही अशीच एक अजब घटना समोर आली आहे. पाऊस पडत नसल्याने त्रस्त झालेल्या गावकऱ्यांनी इंद्रदेवाला खूश करण्यासाठी गावच्या सरपंचांना थेट गाढवावर बसवून संपूर्ण गावात फिरवल्याची घटना समोर आली आहे. असं केल्यामुळे देव प्रसन्न होईल आणि लवकरात लवकर चांगला पाऊस पडेल अशी लोकांना आशा आहे. 

गावकऱ्यांनी सरपंचांना घडवलेल्या गाढवाच्या सवारीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर जोरदार व्हायरल होत आहे. मिळालेल्या माहितीनुसार, मध्य प्रदेशच्या अनेक भागांमध्ये समाधानकारक पाऊस न झाल्यानं लोकं चिंतेत आहेत आणि वेगवेगळे पर्याय अवलंबून पाहात आहेत. याच दरम्यान विदिशा जिल्ह्यातील रंगई गावात पावसासाठी एक अनोखी गोष्ट करण्यात आली. यात गावाचे सरपंच सुशील वर्मा यांना गाढवावर बसवून संपूर्ण गावभर फिरवण्यात आलं. हार घालून त्यांची खास गाढवावरून मिरवणूकचं काढण्यात आली. यामध्ये गावातील सर्व लोक उत्साहाने सहभागी झाले होते. 

गाढवावर बसलेल्या सरपंचाचं ठिकठिकाणी स्वागत केलं जात होतं. गावातील लोक त्यांची आरती करत होते. महिला, लहान मुलांनी देखील या मिरवणुकीत सहभाग घेतला होता. सरपंच गाढवावर बसले असून लोक बँड-बाजा घेऊन नाचत गात असलेले पाहायला मिळाले. हाच व्हिडीओ सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात व्हायरल झाला आहे. ही मिरवणूक पटेल बाबा देवस्थान येथून सुरू झाली आणि गणेश मंदिरापर्यंत पोहोचली. तिथे लोकांनी चांगल्या  देवाकडे प्रार्थना केली. काही ठिकाणी उत्तम पाऊस पडावा म्हणून बेडकांचं लग्न लावण्याची देखील पद्धत आहे. 

सरपंच सुशील वर्मा यांनी दिलेल्या माहितीनुसार, ग्रामीण भागात असं मानलं जातं, की गावच्या सरपंचांची गाढवावरून मिरवणूक काढल्यास इंद्रदेवता प्रसन्न होतात आणि पाऊस चांगला होतो. याच कारणामुळे गाढवावरून सवारी केली, कारण जनतेच्या सुखात आणि दुखात सहभागी होणं हे एका प्रमुखाचं काम आहे. तसेच चांगल्या पावसासाठी देवाकडे प्रार्थना केल्याचं देखील सरपंचांनी म्हटलं आहे. तर काही गावकऱ्यांनी असं केल्यास पाऊस येतो असं म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

 

टॅग्स :Madhya Pradeshमध्य प्रदेशIndiaभारत