"ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!"; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 20, 2026 21:06 IST2026-02-20T21:06:01+5:302026-02-20T21:06:48+5:30

आपल्याला कुठल्याही प्रकारचे 'टॅरिफ वॉर' नको आहे अथवा जगात अस्थिरता निर्माण करणारे कोणतेही युद्ध नको आहे. माझी लढाई केवळ...

Donald Trump is 80 and I am 80 people at this age Brazilian President lula who is on a visit to India, spoke clearly ai summit india | "ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!"; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले

"ट्रम्प ८० चे अन् मीही ८० चा, या वयात लोक...!"; भारत दौऱ्यावर आलेले ब्राझीलचे राष्ट्रपती स्पष्टच बोलले

ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला डा सिल्वा सध्या भारत दौऱ्यावर आहेत. त्यांनी अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या संदर्भात मोठे विधान केले आहे. दिल्लीतील 'एआय समिट'मध्ये (AI Summit) सहभागी होण्यासाठी आलेले लूला म्हणाले, "राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प ८० वर्षांचे झाले आहेत आणि मीही लवकरच ८० वर्षांचा होणार आहे. असे असताना, ८० वर्षांच्या दोन व्यक्तींनी परस्परांशी लढण्याची गरज नाही, आपण जगासाठी रोल मॉडेल व्हायला हवे."

नेमकं काय म्हणाले लुला डा सिल्वा? -
'टॅरिफ वॉर'संदर्भात आपली भूमिका मांडताना 'आज तक'सोबत बोलताना लुला डा सिल्वा म्हणाले, "आपल्याला केवळ एवढेच सांगायचे आहे की, आपल्याला कुठल्याही प्रकारचे 'टॅरिफ वॉर' नको आहे अथवा जगात अस्थिरता निर्माण करणारे कोणतेही युद्ध नको आहे. महात्मा गांधी आपल्या जीवनाचे आदर्श आहेत."

राष्ट्राध्यक्ष लुला डा सिल्वा चर्चेसंदर्भात ब्राझीलच्या मर्यादा स्पष्ट करताना म्हणाले, ज्या मुद्द्यावर मी राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांच्याशी चर्चा करू शकत नाही तो म्हणजे ब्राझीलचे सार्वभौमत्व आणि स्वातंत्र्य. ही गोष्ट माझी आणि माझ्या लोकांची आहे. यावेळी, "ट्रम्प ८० वर्षांचे आहेत आणि मीही ८० वर्षांचा होणार आहे. ८० वर्षांच्या दोन व्यक्तींना लढण्याची गरज नाही. आपण रोल मॉडेल असायला हवे.

माझी लढाई कोणत्याही प्रकारच्या असमानतेविरुद्ध -
बुशच्या इराण युद्ध कालातील एक प्रसंग सांगताना ते म्हणाले, "बुश यांच्या इराकमधील युद्धादरम्यान त्यांनी आपल्याला सहभागी होण्यास सांगितले होते. मात्र, ब्राझीलमध्ये माझी लढाई उपासमारीविरुद्ध होती. ती माझी लढाई बनली आहे, तसेच महिलांवरील हिंसाचाराविरोधातही. माझी लढाई कोणत्याही प्रकारच्या असमानतेविरुद्ध आहे."

Web Title : ब्राजील के राष्ट्रपति लूला: ट्रम्प और मुझे 80 में नहीं लड़ना चाहिए।

Web Summary : भारत दौरे पर राष्ट्रपति लूला डा सिल्वा ने कहा कि ट्रम्प और वे, दोनों 80 के करीब, रोल मॉडल होने चाहिए, प्रतिद्वंद्वी नहीं। उन्होंने महात्मा गांधी से प्रेरणा लेते हुए टैरिफ युद्धों और अस्थिरता से बचने और असमानता से लड़ने की वकालत की।

Web Title : Brazil President Lula: Trump and I shouldn't fight at 80.

Web Summary : President Lula da Silva, on an India visit, stated that he and Trump, both nearing 80, should be role models, not rivals. He advocates for avoiding tariff wars and instability, drawing inspiration from Mahatma Gandhi and focusing on fighting inequality.