शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
6
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
7
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
8
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
9
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
10
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
11
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
12
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
13
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
14
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
15
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
16
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
17
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
18
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
19
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
20
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
Daily Top 2Weekly Top 5

दुष्काळग्रस्त भागात सामने नकोत

By admin | Updated: October 15, 2016 04:52 IST

सर्व जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर (एमसीए) ढकलू पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले.

मुंबई : सर्व जबाबदारी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनवर (एमसीए) ढकलू पाहणाऱ्या भारतीय क्रिकेट नियामक मंडळाला (बीसीसीआय) शुक्रवारी उच्च न्यायालयाने चांगलेच फैलावर घेतले. क्रिकेट केवळ मैदानावर किंवा स्टेडियममध्ये खेळला जातो, असे समजू नका. मैदानाबाहेरही त्याचे परिणाम  होतात. त्यामुळे बाहेरच्यांचाही विचार करा, अशा शब्दांत उच्च न्यायालयाने बीसीसीआयची कानउघाडणी करत दुष्काळी भागांत सामने न ठेवण्याची सूचनाही केली.दरवर्षी राज्यातील काही भागांतील नागरिकांना दुष्काळाला सामोरे जावे लागते, ही समस्या कायमस्वरूपी मिटावी यासाठी राज्य सरकारला उपाययोजना आखण्याचा आदेश द्यावा, अशी मागणी करणाऱ्या अनेक याचिका उच्च न्यायालयात दाखल करण्यात आल्या आहेत. या याचिकांवरील सुनावणी मुख्य न्या. मंजुळा चेल्लुर व न्या. एम.एस. सोनक यांच्या खंडपीठापुढे होती. या याचिकांमध्येच ‘लोकसत्ता मूव्हमेंट’ या एनजीओने आयपीएलचे सामने राज्यात खेळू देऊ नयेत, अशी मागणी करणारी जनहित याचिका दाखल केली आहे.दुष्काळ संपला असून आयपीएलचे सामनेही संपले आहेत, त्यामुळे आता बीसीसीआयला यामधून प्रतिवादी म्हणून वगळावे, अशी विनंती शुक्रवारच्या सुनावणीत बीसीसीआयच्या वकिलांनी खंडपीठाला केली. बीसीसीआयची ही विनंती मान्य करण्यास खंडपीठाने नकार दिला. (प्रतिनिधी)