शहरं
Join us  
Trending Stories
1
Anil Deshmukh: अनिल देशमुख यांची उच्च न्यायालयात धाव, आरोप निश्चितीला स्थगितीची मागणी
2
Mumbai-Pune Expressway: मुंबई-पुणे एक्स्प्रेसवेवर आज आणि उद्या 'ब्लॉक; कारण काय? पर्यायी मार्ग कोणते? A टू Z माहिती
3
आजचे राशीभविष्य - २३ एप्रिल २०२६, व्यापार - व्यवसायात लाभ होतील, नोकरीत वरिष्ठ खुश होतील
4
Ashwini Paul: ड्रग्ज सप्लायर अश्विनीचे आंतरराष्ट्रीय कनेक्शन; एअर कार्गोतून तस्करी?
5
राज्यात १८ प्रकल्पांत २.५६ लाख कोटींची गुंतवणूक; कोणत्या जिल्ह्यात किती रोजगार उपलब्ध होणार? 
6
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
7
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
8
दातात पकडून चिमुकल्यावर अघोरी उपचार, अकोल्यातील धक्कादायक प्रकार, व्हिडीओ व्हायरल
9
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
10
वि. स. खांडेकर ते सिमोन डी बोवॉयर... सगळे हुतात्मा चौकातील फुटपाथवर..!
11
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
12
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
13
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
14
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
15
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
16
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
17
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
18
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
19
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
20
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
Daily Top 2Weekly Top 5

जिल्हा वार्षिक योजना आज विभागीय बैठक

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

नागपूर: २०१५-२०१६ या वर्षासाठी नागपूर विभागातील सहा जिल्‘ांच्या वार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याबाबत बुधवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.

नागपूर: २०१५-२०१६ या वर्षासाठी नागपूर विभागातील सहा जिल्ह्यांच्या वार्षिक योजनांना अंतिम मंजुरी देण्याबाबत बुधवारी स. ११ वा. विभागीय आयुक्त कार्यालयात बैठक आयोजित करण्यात आली आहे.
अर्थराज्यमंत्री दीपक केसरकर यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या बैठकीत नागपूरचे पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्यासह विभागातील इतर जिल्ह्यांचे पालकमंत्री आणि संबंधित खात्याचे अधिकारी उपस्थित राहणार आहे. २०१४-१५ या वर्षासाठी नागपूर जिल्ह्याची वार्षिक योजना २२५ कोटींची होती. या वर्षी त्यात वाढ करून देण्याची मागणी आहे. जिल्हा नियोजन समितीच्या बैठकीत २०१५-१६ या वर्षासाठी ६८५ कोटी रुपयांचे प्रस्ताव विविध योजनांकडून सादर करण्यात आले आहे. त्यात सर्वसाधारण योजना ४४४.५९ कोटी, अनुसूचित जाती उपाययोजना १३६.२३ कोटी, आदिवासी उपाययोजना २६.०८ कोटी आणि ओटीएसपी ७८.५० कोटी रुपयांचा समावेश आहे. हा आराखडा शासनाकडे मंजुरीसाठी पाठविण्यात आला आहे. यावर बुधवारच्या बैठकीत निर्णय होण्याची शक्यता आहे. नागपूर हा मुख्यमंत्र्यांचा जिल्हा असल्याने मागील वर्षीच्या तुलनेत या वर्षी जिल्ह्याला घसघशीत निधी मिळेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
दरम्यान सकाळी १० वा. आयुक्त कार्यालयात पालकमंत्र्यांच्या उपस्थितीत पाणी आरक्षण समितीची बैठक होणार असून दुपारी ३ वा. वनामतीच्या सभागृहात कृषी विभागाच्या योजनांचा आढावा घेण्यात येणार आहे. (प्रतिनिधी)