शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

दिलीप गांधी म्हणतात, तंबाखूने होते अन्नपचन !

By admin | Updated: April 4, 2015 07:06 IST

तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा अन्योन्य संबंध नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून अगोदरच देशभर चर्चेत आलेले भाजपाचे खासदार दिलीप गांधी

नवी दिल्ली/अहमदनगर : तंबाखूजन्य पदार्थांचे सेवन आणि कॅन्सरचा अन्योन्य संबंध नसल्याचे वादग्रस्त वक्तव्य करून अगोदरच देशभर चर्चेत आलेले भाजपाचे खासदार दिलीप गांधी यांनी पुन्हा तंबाखूची पिंक टाकली. ‘तंबाखू सेवनाने कॅन्सर होतो, हे अद्याप सिद्ध झालेले नाही; पण अन्नपचन मात्र होते’, असा जावई शोध त्यांनी लावला आहे. विशेष म्हणजे देशात तंबाखू विक्रीशी संबंधित नियमांच्या समीक्षेसाठी नेमलेल्या संसदीय समितीचे खा. गांधी हे अध्यक्ष आहेत.आढळगाव (जि. नगर) येथे पत्रकारांशी बोलताना खा. गांधी म्हणाले, की मी संसदेत नुसत्या तंबाखूने नव्हे तर इतर कारणांनी कॅन्सर होतो, असे बोललो़ परंतु माझ्या वक्तव्याचा चुकीचा अर्थ काढण्यात आला. विडी व्यवसायावर दोन कोटी नागरिकांचा उदरनिर्वाह अवलंबून आहे. तंबाखू व्यवसायाबाबत अमेरिका आणि भारताची परिस्थिती वेगळी आहे. आपल्या भौगोलिक परिस्थितीचा विचार करणारे निर्णय घ्यावे लागतात. परंतु काही समाजसेवकांची काही झाले तरी उठाठेव सुरू होते, असेही ते म्हणाले. भाजपा खासदाराची मुक्ताफळेभाजपाचे आणखी एक खासदार रामप्रसाद सरमाह यांनीही तंबाखूजन्य पदार्थांच्या समर्थनार्थ मुक्ताफळे उधळली आहेत. सिगारेट आणि कर्करोग यांचा संबंध असल्याचे कुठलेही स्पष्ट पुरावे नसल्याचे सरमाह यांनी म्हटले आहे. सिगारेटमुळे कर्करोग होतो वा नाही, हा वादविवादाचा मुद्दा आहे. दररोज एक बाटली दारू पिणारे आणि ४० सिगारेट ओढणाऱ्या दोन ज्येष्ठ वकिलांना मी ओळखतो. यापैकी एक अद्यापही हयात आहेत. कर्करोगाशिवाय त्यांनी वयाची ७५ वर्षे पूर्ण केली आहेत आणि दुसरे गृहस्थही वयाच्या ८६ वर्षांपर्यंत सुदृढ आयुष्य जगल्यानंतर स्वर्गवासी झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.गुप्ता यांनी केले विडीचे समर्थनभाजपाचेच अलाहाबादचे खासदार आणि बडे विडी व्यावसायिक श्यामचरण गुप्ता यांनी विडीचे समर्थन  केले आहे. बिडी पिल्यामुळे कुठलीही शारीरिक हानी होत नाही. दररोज कित्येक बिडी पिणाऱ्या पण ज्यांना कर्करोग नाही, असे म्हणाल तेवढे लोक मी तुमच्यापुढे उभे करू शकतो, असा दावा गुप्ता यांनी केला. साखर, भात, बटाट्याने मधुमेह होतो म्हणून या सर्व वस्तूंवर आपण धोक्याचा इशारा लिहितो का, असा सवालही त्यांनी केला. विरोधकांची टीकाभाजपा खासदारांच्या तंबाखूजन्य पदार्थांबाबतच्या या विधानांमुळे विरोधकांच्या भुवया ताणल्या आहेत. जदयू नेते के.सी. त्यागी यांनी शुक्रवारी भाजपा खासदारांच्या या विधानांवर जोरदार टीका केली. भाजपा खासदारांची वक्तव्ये म्हणजे, हितासाठीचा संघर्ष आहे. तंबाखू ही आरोग्यासाठी हानिकारक आहे, यावर भारत सदस्य असलेल्या जागतिक आरोग्य संघटनेनेही शिक्कामोर्तब केले आहे, असे त्यागी म्हणाले.मित्रपक्षाचाही आक्षेपभाजपा प्रणीत रालोआ सरकारमधील घटक पक्ष असलेल्या पीएमकेनेही भाजपा खासदारांच्या या वक्तव्यावर आक्षेप नोंदवला आहे. कुठल्याही शास्त्रीय आधाराशिवाय भाजपा खासदारांनी केलेली वक्तव्ये पूर्णत: अज्ञानी व मूर्खपणाची आहेत. या लोकांनी अज्ञान पाजळणारी अशी वक्तव्ये थांबवावीत, असे पीएमकेचे संस्थापक नेते आणि माजी केंद्रीय आरोग्यमंत्री अंबुमणी रामदास म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)