कोरियन मुलांशी लग्नाची ओढ अन् खोलीत रहस्यमय चिन्हांचा खेळ; तीन बहिणींच्या आयुष्याचा असा झाला शेवट!

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 5, 2026 09:27 IST2026-02-05T09:26:55+5:302026-02-05T09:27:20+5:30

गाझियाबादमध्ये कोरियन संस्कृतीच्या वेडापायी तीन सख्ख्या बहिणींची नऊ मजल्यावरून उडी मारून स्वतःला संपवल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Desire to Marry Korean Boys & A Mysterious Play of Symbols 3 Sisters Leap to Death as K Obsession Turns Fatal in Ghaziabad | कोरियन मुलांशी लग्नाची ओढ अन् खोलीत रहस्यमय चिन्हांचा खेळ; तीन बहिणींच्या आयुष्याचा असा झाला शेवट!

कोरियन मुलांशी लग्नाची ओढ अन् खोलीत रहस्यमय चिन्हांचा खेळ; तीन बहिणींच्या आयुष्याचा असा झाला शेवट!

Ghaziabad Triple Death Case: उत्तर प्रदेशातील गाझियाबादमध्ये उच्चभ्रू वस्तीत तीन सख्ख्या अल्पवयीन बहिणींनी इमारतीच्या ९ व्या मजल्यावरून उडी मारून आत्महत्या केल्याच्य घटनेने संपूर्ण देशाला हादरवून सोडलं आहे. के-पॉप आणि के-ड्रामा यांसारख्या कोरियन संस्कृतीच्या टोकाच्या वेडापायी या मुलींनी हे टोकाचे पाऊल उचलल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

गाझियाबादमधील टीला मोड परिसरातील भारत सिटी सोसायटीमध्ये मंगळवारी रात्री २ च्या सुमारास ही घटना घडली. निशिका (१६), प्राची (१४) आणि पाखी (१२) या तिन्ही बहिणींनी आपल्या खोलीचा दरवाजा आतून बंद केला. त्यानंतर बाल्कनीमध्ये स्टूल ठेवून एकीमागून एक अशा तिघींनीही ९ व्या मजल्यावरून खाली झेप घेतली. खाली पडल्याचा मोठा आवाज आल्यानंतर शेजारी धावून आले, मात्र तोपर्यंत तिघींचाही जागीच मृत्यू झाला होता.

८ पानांची डायरी आणि सुसाइड नोट

पोलिसांना घटनास्थळी एक चिठ्ठी आणि ८ पानांची डायरी सापडली आहे. या डायरीतून धक्कादायक खुलासे समोर आले आहेत. डायरीत मुलींनी लिहिले होते की, त्यांना स्वतःला भारतीय म्हणवून घेणे आवडत नव्हते, त्या स्वतःला मानसिकदृष्ट्या कोरियन मानत होत्या. सुसाइड नोटमध्ये मुलींनी आपल्या वडिलांची माफी मागताना, "बाबा माफ करा, आम्ही कोरिया सोडू शकत नाही. कोरिया आमचा जीव आहे. तुम्ही आम्हाला त्यापासून तोडू शकत नाही, म्हणून आम्ही जीव देत आहोत," असं म्हटलं होतं.

या मुलींना कोरियन मुलांशी लग्न करण्याची आणि तिथेच स्थायिक होण्याची इच्छा होती. त्यांच्या खोलीत केवळ कोरियन कलाकारांची पोस्टर्स आणि भिंतीवर 'ब्रोकन हार्ट'ची चित्रे सापडली आहेत. 

मुलींचे वडील चेतन गुर्जर यांनी पोलिसांना सांगितले की, तिन्ही मुली दिवसभर मोबाईलमध्ये कोरियन चित्रपट आणि गाणी पाहण्यात मग्न असायच्या. त्यांचा अभ्यास आणि मानसिक स्थिती बिघडत चालल्याने ४ दिवसांपूर्वीच वडिलांनी त्यांचा मोबाईल काढून घेतला होता. डिजिटल जगापासून आणि कोरियन संस्कृतीपासून दूर जावे लागल्याच्या धक्क्यातूनच त्यांनी हे पाऊल उचलल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.

रहस्यमय चिन्हे आणि 'कोरियन स्टाइल' यंत्र

जेव्हा पोलिसांनी खोलीचा दरवाजा तोडून आत प्रवेश केला, तेव्हा तेथील दृश्य भयानक होते. घराच्या जमिनीवर कोरियन स्टाइलची काही अनाकलनीय चिन्हे किंवा यंत्रे काढलेली होती. नातेवाईकांनी दिलेल्या माहितीनुसार, घरातील वातावरण अतिशय भीतीदायक जाणवत होते.

कोणताही सुसाइड गेम नाही

सुरुवातीला हा प्रकार ब्लू व्हेलसारख्या एखाद्या ऑनलाइन टास्क आधारित गेमचा असावा असा संशय होता. मात्र, डीसीपी निमिष पाटील यांनी स्पष्ट केले की, तपासात अद्याप कोणत्याही ऑनलाइन सुसाइड गेमचे पुरावे मिळालेले नाहीत. या मुली प्ले-स्टोअरवरील सामान्य गेम्स खेळत होत्या. त्यांचे मोबाईल आणि इलेक्ट्रॉनिक गॅजेट फॉरेन्सिक तपासासाठी पाठवण्यात आली आहेत.
 

Web Title : कोरियाई जुनून ने गाजियाबाद में बहनों को आत्महत्या करने पर मजबूर किया।

Web Summary : गाजियाबाद में कोरियाई संस्कृति से ग्रस्त बहनों ने आत्महत्या कर ली। एक नोट में कोरिया में रहने की उनकी इच्छा का खुलासा हुआ। उन्हें भारतीय होना पसंद नहीं था। घटना से पहले उनके पिता ने उनके फोन जब्त कर लिए थे। कमरे में कोरियाई प्रतीक थे।

Web Title : Korean obsession led to sisters' suicide in Ghaziabad apartment.

Web Summary : Ghaziabad sisters, obsessed with Korean culture, committed suicide. A note revealed their desire to live in Korea. They disliked being Indian. Their father confiscated their phones before the incident. Room had Korean symbols.