हिंगणा तामसवाडी येथे घाणीचे साम्राज्य

By Admin | Updated: September 4, 2015 21:54 IST2015-09-04T21:54:24+5:302015-09-04T21:54:24+5:30

वल्लभनगर : हिंगणा तामसवाडी येथे पावसाचे पाणी व सांडपाणी रोडवर तसेच घरात शिरत आहे. ही समस्या निकाली काढावी याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिवांना निवेदन सादर केले आहे.

Depressed Empire at Hingana Tamaswadi | हिंगणा तामसवाडी येथे घाणीचे साम्राज्य

हिंगणा तामसवाडी येथे घाणीचे साम्राज्य

्लभनगर : हिंगणा तामसवाडी येथे पावसाचे पाणी व सांडपाणी रोडवर तसेच घरात शिरत आहे. ही समस्या निकाली काढावी याबाबत ग्रामस्थांनी ग्रामपंचायत सचिवांना निवेदन सादर केले आहे.
हिंगणा, तामसवाडी येथे पावसाचे पाणी व शेतशिवारातील पाणी विश्वनाथ दामोधर यांच्या घरात शिरले. रोडवर मोठे डबके साचले आहे. डबक्यामुळे डासांची उत्पत्तीसुद्धा वाढत आहे. त्यामुळे ग्रामस्थांना आजारांची लागणसुद्धा आहे. ही समस्या निकाली निघण्यासाठी विश्वनाथ दामोधर, प्रतापसिंह राठोड, व्यंकटराव ओहे, देवीदास जाधव, प्रल्हाद जाधव, अमर पळसपगार, विश्वनाथ गायकवाड, रामेश्वर सोळंके, गौतम घनबहादूर, सारंग ओटे यांनी सचिवांना निवेदन दिले आहे. (वार्ताहर)

Web Title: Depressed Empire at Hingana Tamaswadi