स्मृती इराणींच्या घरासमोर निदर्शने

By Admin | Updated: June 11, 2014 23:44 IST2014-06-11T23:44:10+5:302014-06-11T23:44:10+5:30

वादग्रस्त चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम संपुष्टात आणण्याची मागणी करीत एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली़

Demonstrations at Smriti Irani's house | स्मृती इराणींच्या घरासमोर निदर्शने

स्मृती इराणींच्या घरासमोर निदर्शने

नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठाचा वादग्रस्त चार वर्षांचा पदवी अभ्यासक्रम (एफवाययूपी) संपुष्टात आणण्याची मागणी करीत काँग्रेसच्या एनएसयूआय विद्यार्थी संघटनेने आज बुधवारी केंद्रीय मनुष्यबळविकास मंत्री स्मृती इराणी यांच्या निवासस्थानाबाहेर निदर्शने केली़
भारतीय राष्ट्रीय विद्यार्थी परिषदेचे (एनएसयूआय) सरचिटणीस मोहित शर्मा यांच्या नेतृत्वाखाली निदर्शक सकाळी ९ च्या सुमारास लोधी इस्टेटस्थित स्मृती यांच्या घराबाहेर पोहोचले व त्यांनी भाजपा सरकारविरोधी घोषणाबाजी केली़ (लोकमत न्यूज नेटवर्क)

Web Title: Demonstrations at Smriti Irani's house