शहरं
Join us  
Trending Stories
1
टीएमसी की भाजप... पश्चिम बंगालमध्ये महिला अन् पुरुषांची पहिली पसंती कुणाला?  'हे' आकडे सत्तेचं गणित बदलणार
2
कोल्हापूर जिल्ह्यातील मुलींच्या शोषण प्रकरणाला वेगळे वळण, बजरंग दलाच्या पदाधिकाऱ्याला पिस्तुलाचा धाक दाखवत जीवे मारण्याची धमकी
3
नागपुरात ‘रेडिएशन’ची धमकी; संघ मुख्यालय-स्मृतिमंदिरात ‘रेडिओॲक्टिव्ह’ पदार्थ टाकल्याचा दावा, पोलीस आयुक्तांना निनावी पत्र
4
SRH विरुद्ध नमन धीरच्या चुकांवर चुका! हेडला तीनदा जीवनदान; तिथंच MI च्या हातून सामना निसटला
5
धारमध्ये भीषण अपघात; ३५ मजुरांनी भरलेली पिकअप उलटून स्कॉर्पिओला धडकली; १२ जणांचा जागीच मृत्यू, १५ हून अधिक जखमी
6
ममता बॅनर्जी यांचा २० हजार मतांनी पराभव होणार! सुवेंदू अधिकारी यांचा दावा; भाजपला किती जागा मिळणार? केली मोठी भविष्यवाणी
7
IPL 2026 : हेडच्या वादळानंतर क्लासेनचा क्लास शो! SRH कडून पराभवानंतर MI साठी वाजली धोक्याची घंटा
8
"मी १९८४ पासून निवडणूक लढतेय, पण यावेळी..."; ममता संतापल्या, विजयासंदर्भात काय बोलून गेल्या? 
9
पत्राचाळ रहिवाशांना मोठा दिलासा! म्हाडा १० टक्के भाडेवाढ देणार; DCM एकनाथ शिंदेंचा निर्णय
10
Ryan Rickelton Record : MI कडून जे रोहित-सचिनलाही जमलं नाही, ते रिकल्टननं करून दाखवलं!
11
दोन राज्यांत सत्तांतर! तिसऱ्या तामिळनाडूच्या एक्झिट पोलमध्ये काय? अभिनेता विजयची धमाकेदार एन्ट्री होण्याचे संकेत
12
कोण आहे Allah Ghazanfar? अभिषेक शर्माचं वादळ रोखत ईशान किशनला गोल्डन डकवर धाडलं तंबूत!
13
MI vs SRH : वानखेडेवर Ryan Rickelton ची विक्रमी सेंच्युरी! तिलक वर्मासह जयसूर्याचा विक्रम मोडला
14
'No more Mr. Nice Guy', बंदुकीसह फोटो पोस्ट करत डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला पुन्हा धमकी
15
आसाममध्ये भाजपा हॅटट्रिक करणार, काँग्रेस वनवास अद्यापही कायम; Exit Pollचे कल काय सांगतात?
16
“छत्रपती शिवाजी महाराजांची बदनामी मान्य आहे का? एकनाथ शिंदे गप्प का?”: हर्षवर्धन सपकाळ
17
Exit Poll: पश्चिम बंगालमध्ये ममता दीदींसोबतच खेला होणार; भाजपा... पाहा एक्झिट पोलचा सर्वात मोठा कल!
18
AI VS Humans : एआय की माणूस, कोण स्वस्त? दिग्गज टेक कंपनी NVIDIA सगळंच सांगितलं!
19
‘ही’ आहे पाकिस्तानची हायस्पीड ट्रेन, किती वेगाने जाते? वंदे भारत ट्रेनला देते का टक्कर? पाहा
20
केरळमध्ये 'लाल' किल्ला ढासळणार? एक्झिट पोलमध्ये काँग्रेसप्रणित UDF ची मोठी मुसंडी; विजयन यांची 'हॅट्ट्रिक' हुकणार!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: दिल्लीत हिंसाचार घडविण्यासाठी उत्तर प्रदेशातून आले होते ३०० लोक

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 12, 2020 04:18 IST

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा : दोषींची गय केली जाणार नाही

शीलेश शर्मा नवी दिल्ली : दिल्लीत हिंसाचार करण्यासाठी उत्तर प्रदेशातून तीनशे लोक आले आहेत, असा दावा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी दिल्लीतील हिंसाचारावरील चर्चेला उत्तर देताना लोकसभेत केला.

चर्चेला सुरुवात करताना काँग्रेसचे लोकसभेतील नेते अधीर रंजन चौधरी यांनी दिल्ली पोलीस आणि गृहमंत्र्यांवर आरोप करीत अमित शहा यांच्या राजीनाम्याची मागणी केली. तीन दिवस दिल्ली जळत असताना पोलीस मात्र बघ्याच्या भूमिकेत होते. गृहमंत्री काय करीत होते? पंतप्रधान अजूनही काही बोलत नाहीत? राष्ट्रीय सुरक्षा सल्लागारांनाच का पाठविण्यात आले? हिंसाचारग्रस्तांचे अश्रू पुसण्याची गृहमंत्र्यांची जबाबदारी नव्हती का? दिल्लीतील हिंसाचार हा लाजिरवाणा कलंक असून, याला गृहमंत्रालय सर्वस्वी जबाबदार आहे.

चौधरी यांच्यासह सर्व विरोधी पक्षांनीही गृहमंत्री अमित शहा यांच्या भूमिकेवर प्रश्न उपस्थित करून त्यांच्या राजीनाम्याची मागणी केली.७०० एफआयआर दाखल चर्चेला उत्तर देताना गृहमंत्री अमित शहा यांंनी सांगितले की, दिल्लीतील हिंसाचाराला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न झाला. जगापुढे खरे आले पाहिजे. दिल्ली पोलिसांना शब्बासकी देत त्यांनी दिल्ली पोलिसांवरील आरोप फेटाळले. माझ्या सूचनेनुसार राष्ट्रीय सुरक्षा सल्लगार अजित डोबाल यांना पाठविण्यात आले होते. पूर्ण घटनाक्रम सांगत त्यांनी दिल्लीतील हिंसाचार रोखण्यासाठी केव्हा काय-काय प्रयत्न करण्यात आले, याची तपशीलवार माहिती दिली. आतापर्यंत ७०० एफआयआर दाखल करण्यात आले असून, २,६४७ जणांना ताब्यात घेण्यात आले आहे किंवा अटक करण्यात आलेली आहे. एक गौप्यस्फोट करताना गृहमंत्री म्हणाले की, लोकांकडून मिळालेले व्हिडिओ तपासले जात आहेत.गृहमंत्र्यांनी सत्य नाही सांगितले - अधीर रंजनगृहमंत्र्यांचे निवेदन संपत असताना काँग्रेसच्या सदस्यांनी त्यांच्या राजीनाम्याची मागणी करीत सभात्याग केला. सभागृहातून बाहेर पडल्यानंतर काँग्रेसचे अधीर रंजन चौधरी यांनी आरोप केला की, गृहमंत्र्यांनी दिशाभूल करणारे निवेदन केले. सत्य सांगितले नाही. आमच्या चुकीमुळे घडले, यापुढे असे होऊ देणार नाही, असे त्यांना म्हणता आले असते. दिशाभूल करणारे निवेदन ऐकायचे नसल्याने आम्ही सभात्याग केला.

टॅग्स :delhi violenceदिल्लीAmit Shahअमित शहाcongressकाँग्रेस