शहरं
Join us  
Trending Stories
1
“असा नेता लाभणे भारताचे भाग्य”; प. बंगाल विजयानंतर ट्रम्प यांनी केले PM मोदींचे खास अभिनंदन
2
पुण्यात आजोबाकडून अल्पवयीन मुलीवर अत्याचाराचा प्रयत्न; नागरिकांच्या सतर्कतेमुळे अनर्थ टळला
3
Sanju Samson Record : संजूनं साधला 'द्विशतकी' डाव; किंग कोहली-KL राहुलनंतर अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
4
“ममता दीदी अन् किशोरी पेडणेकर बहिणी, दोघींना खुर्चीचा मोह सुटत नाही”; कुणी केली खोचक टीका?
5
संजूचा धमाका; कार्तिक शर्मानंही दाखवला दम! DC ला पराभूत करत CSK नं प्लेऑफ्सची दावेदारी केली भक्कम
6
पश्चिम बंगाल, आसाम झाले, आता पुढचा नंबर कोणाचा? BJPचे टार्गेट सेट; काँग्रेसचे टेन्शन वाढणार?
7
निवडणूक हरताच ममतादीदींना इंडिया आघाडी आठवली; म्हणाल्या, “राजीनामा देणार नाही, सगळे पाठिशी”
8
“सेक्यूलर पक्ष भाजपाला रोखू शकत नाही, जनादेश स्वीकारा”; प. बंगाल निकालावर ओवेसी थेट बोलले
9
काय रे देवा! दोघांच्या गोंधळात तिसऱ्याचा फायदा; चेन्नईकरांनी Sameer Rizvi चा सोपा झेल सोडला (VIDEO)
10
“ममतादीदी पडतील असे कधी वाटले नाही”; पश्चिम बंगाल निवडणूक निकालावर मनोज जरांगेंनाही शंका
11
ममता बॅनर्जींचा CMपद सोडण्यास नकार, आता भाजप सत्तास्थापना कशी करणार? हे आहेत २ पर्याय
12
कोणत्याही ट्रेनमध्ये सहजपणे लोअर बर्थ कसा मिळेल? IRCTCनेच सांगितली खास ट्रिक, तुम्ही वापरली का?
13
चौकट मोडली, T20 मध्ये छाप सोडली! केएल राहुल म्हणतो; "प्रत्येक वेळी मनासारखं घडत नाही, पण…"
14
टी-२० क्रिकेटमध्ये टीम इंडियाला तोड नाही; IPL दरम्यान ICC नं केली मोठी घोषणा
15
TMC ला गळती; मनोज तिवारींचा पक्षाला रामराम, ममतांवर केला ५ कोटी मागितल्याचा आरोप
16
इंडिगो विमानात पॉवर बँकचा स्फोट; विमानतळावर प्रवाशांची आपत्कालीन सुटका, एक महिला जखमी
17
Latest Marathi News LIVE: गोंदियात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी; शेतकरी चिंतेत
18
IPL 2026 : पलटवार करण्यासाठी DC नं खेळला हा डाव! मॅच विनरच्या कमबॅकसह CSK ची ताकद वाढली
19
पश्चिम बंगालमधील भाजपा विजयानंतर पाकची मोठी प्रतिक्रिया; थेट युद्धाची भाषा केली, म्हणाले...
20
Budget Travel: अवघ्या २० हजारांत अनुभवा केरळचं सौंदर्य; वायनाडला भेट देण्यापूर्वी हे नक्की वाचा!
Daily Top 2Weekly Top 5

Delhi Violence: आंदोलन अशांत! हिंसाचारानंतर आंदोलकांमध्ये फूट; 'त्या' दिवशी नेमकं घडलं काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 28, 2021 02:29 IST

लाल किल्ल्यावर पोहोचले आंदोलक,बहुतांश शेतकरी परतीच्या मार्गावर! सीमेवरच राहू; संयुक्त माेर्चा ठाम

विकास झाडे

नवी दिल्ली : प्रजासत्ताक दिनी आंदोलक शेतकऱ्यांनी काढलेली रॅली थेट दिल्लीत घुसली आणि त्यानंतर दिल्लीत अभूतपूर्व असा हिंसाचार झाला. हा हिंसाचार घडवणारे आणि लाल किल्ल्यावर झेंडा फडकावणारे आंदोलक नव्हते, असा दावा शेतकरी संघटना करीत आहेत. दुसरीकडे हिंसाचारानंतर आता बहुतांश शेतकरी हे त्यांच्या गावाकडे परतीच्या मार्गावर आहेत. संयुक्त किसान मोर्चाच्या नेत्यांनी मात्र सरकार तिन्ही कायदे मागे घेत नाही तोपर्यंत सीमेवरच राहू, असे सांगितले आहे. सरकारने चर्चेची कवाडे खुली आहेत, असा पवित्रा कायम ठेवला आहे. 

नेमके काय घडले?

  • गेल्या दोन महिन्यांपासून दिल्लीच्या सीमांवर कृषी कायदे मागे घेणे आणि एमएसपी कायदा तयार करणे यासाठी दोन लाखांवर शेतकरी तळ ठोकून होते. त्यात ७५ पेक्षा अधिक शेतकऱ्यांचा मृत्यू झाला.
  • सरकारसोबत १२ बैठका झाल्यानंतर कोणताही तोडगा निघू शकला नाही. त्यामुळे शेतकऱ्यांनी २६ जानेवारीला दिल्लीत रॅली काढण्याची घोषणा केली होती. 
  • पोलीस प्रशासन आणि शेतकरी नेत्यांमध्ये रॅलीची नियोजित वेळ शेतकऱ्यांनी पाळली नसल्याने गाझीपूर सीमेवर गोंधळ उडाला. 
  • पोलीस आणि शेतकऱ्यांमध्ये चकमकी झाल्यात. काही ठिकाणी शेतकऱ्यांनी पोलिसांवर दगडफेक केली तर काही ठिकाणी पोलिसांनी लाठीचार्ज, अश्रुधूर आणि शेतकऱ्यांच्या वाहनांची नासधूस करतानाचे चित्र होते.

 

शेतकऱ्यांचा आरोप...भाजप प्रणीत नेत्यांनी जमावाला चिथावलेट्रॅक्टर रॅली सुरू करण्यापूर्वीच संयुक्त किसान मोर्चात घुसलेल्या काही भाजप प्रणीत नेत्यांनी जमावाला चिथावले. त्यामुळे रॅलीला हिंसात्मक वळण मिळाले, अशी प्रतिक्रिया संयुक्त किसान मोर्चाचे समन्वयक संदीप गिड्डे-पाटील यांनी दिली. सिंघू, गाझीपूर आणि टिकरी सीमेवरील शेकडो आंदोलक दिशाभूल झाल्याने अक्षरधामसमोर पोहोचले. पोलिसांचे सुरक्षाकडे तोडत ते आयटीओच्या दिशेने निघाले. दिल्लीची माहिती नसल्याने हजारो आंदोलक पोलीस मुख्यालयापर्यंत पोहोचल्याचेही ते म्हणाले.

शेतकरी संघटना तोडण्याचा प्रयत्नचिल्ला सीमेवर शेतकऱ्यांच्या भानु गटाचे आंदोलन सुरू होते. या गटाचे नेते भानु प्रताप सिंह यांनी आज ते आवरते घेतले. परंतु या संघटनेचा संयुक्त किसान मोर्चाशी संबंध नव्हता. त्यांना आधीच काढून टाकण्यात आले होते.

चौकशी कराट्रॅक्टर मोर्चामध्ये झालेल्या हिंसाचाराची निवृत्त न्यायाधीशांच्या समितीतर्फे चौकशी करण्यात यावी, अशी विनंती करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात बुधवारी दाखल करण्यात आली आहे. 

गृहमंत्र्यांनी घेतला आढावादिल्लीतील हिंसाचारानंतर तेथील कायदा-सुव्यवस्थेच्या स्थितीचा केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी बुधवारी एका बैठकीत आढावा घेतला. 

टॅग्स :delhiदिल्लीFarmerशेतकरी