खाकी विरुद्ध खाकी! शिमल्यामध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिल्ली पोलिसांना हिमाचल पोलिसांनी ५ तास रोखलं, नेमकं प्रकरण काय?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2026 09:15 IST2026-02-26T09:13:54+5:302026-02-26T09:15:22+5:30

Delhi Police vs HP Police: दिल्लीतील AI समिटमध्ये शर्टलेस आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना पकडण्यासाठी गेलेल्या दिल्ली पोलिसांना शिमल्यात रोखण्यात आले. हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांवर अपहरणाचा गुन्हा दाखल केल्याने खळबळ.

Delhi Police vs HP Police! High voltage drama in Shimla; Delhi Police stopped by Himachal Police for 5 hours, what is the real issue? | खाकी विरुद्ध खाकी! शिमल्यामध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिल्ली पोलिसांना हिमाचल पोलिसांनी ५ तास रोखलं, नेमकं प्रकरण काय?

खाकी विरुद्ध खाकी! शिमल्यामध्ये हायव्होल्टेज ड्रामा; दिल्ली पोलिसांना हिमाचल पोलिसांनी ५ तास रोखलं, नेमकं प्रकरण काय?

देशाची राजधानी दिल्ली आणि हिमाचल प्रदेशचे पोलीस बुधवारी शिमला येथे आमनेसामने आल्याने खळबळ उडाली. दिल्लीत पार पडलेल्या 'एआय समिट' दरम्यान झालेल्या 'शर्टलेस' आंदोलनाचे धागेदोरे शिमल्यापर्यंत पोहोचले आहेत. रोहडू येथून तीन युवक काँग्रेस कार्यकर्त्यांना अटक करून दिल्लीला नेणाऱ्या दिल्ली पोलिसांच्या पथकाला हिमाचल पोलिसांनी तब्बल ५ तास ताब्यात ठेवल्याने दोन्ही राज्यांच्या पोलिसांत मोठा संघर्ष पाहायला मिळाला.

२० फेब्रुवारी २०२६ रोजी दिल्लीतील भारत मंडपम येथे आयोजित 'इंडिया एआय इम्पैक्ट समिट'मध्ये युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी शर्ट काढून आंदोलन केले होते. या प्रकरणी दिल्ली पोलिसांनी तपासाची चक्रे फिरवत शिमल्याजवळील रोहडू येथील एका रिसॉर्टवर छापा टाकला. येथून सौरभ, सिद्धार्थ आणि अरबाज या तिघांना ताब्यात घेऊन दिल्ली पोलीस पथक निघाले होते.

हिमाचल पोलिसांचा आक्षेप आणि 'अपहरणाचा' गुन्हा
दिल्ली पोलिसांनी स्थानिक पोलिसांना कोणतीही पूर्वकल्पना न देता ही कारवाई केल्याचा दावा हिमाचल पोलिसांनी केला. यामुळे संतप्त झालेल्या हिमाचल पोलिसांनी सोलन जिल्ह्यातील धरमपूर येथे नाकाबंदी करून दिल्ली पोलिसांच्या गाड्या अडवल्या. स्थानिक पोलिसांच्या माहितीनुसार, दिल्ली पोलिसांनी रिसॉर्टमधील सीसीटीव्हीचा डीव्हीआर कोणतीही पावती न देता सोबत नेला होता. या प्रकरणी हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या १५ ते २० कर्मचाऱ्यांविरुद्ध चक्क 'अपहरणाचा' गुन्हा दाखल केला आणि त्यांना ५ तास रोखून धरले.

२४ तासांनंतर संघर्ष निवळला
बुधवार रात्री उशिरापर्यंत चाललेल्या या हायव्होल्टेज ड्रामानंतर, गुरुवारी पहाटे दिल्ली पोलिसांनी स्थानिक न्यायालयातून 'ट्रान्झिट रिमांड' मिळवला. त्यानंतरच हिमाचल पोलिसांनी दिल्ली पोलिसांच्या पथकाला आणि अटक केलेल्या कार्यकर्त्यांना दिल्लीकडे जाण्याची परवानगी दिली.

Web Title : शिमला में दिल्ली पुलिस को हिमाचल पुलिस ने रोका, हाई वोल्टेज ड्रामा

Web Summary : दिल्ली पुलिस और हिमाचल पुलिस शिमला में भिड़ गए। दिल्ली पुलिस ने एक विरोध प्रदर्शन की जांच करते हुए तीन लोगों को गिरफ्तार किया। हिमाचल पुलिस ने दिल्ली पुलिस को बिना सूचना के और सीसीटीवी फुटेज चोरी करने के आरोप में पांच घंटे तक हिरासत में रखा, अपहरण का मामला भी दर्ज किया। ट्रांजिट रिमांड मिलने के बाद मामला सुलझा।

Web Title : Delhi Police Detained by Himachal Police in Shimla Showdown

Web Summary : Delhi and Himachal police clashed in Shimla after Delhi police, investigating a protest, arrested three people. Himachal police detained the Delhi team for five hours, alleging lack of notification and theft of CCTV footage, even filing kidnapping charges. The issue resolved after a transit remand was secured.