दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांवर शाईफेक

By Admin | Updated: September 19, 2016 13:21 IST2016-09-19T13:18:54+5:302016-09-19T13:21:58+5:30

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्यावर शाईफेक

Delhi Deputy Chief Minister Manish Sisodiyanovar Shaypek | दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांवर शाईफेक

दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदियांवर शाईफेक

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि.19- दिल्लीचे उपमुख्यमंत्री मनिष सिसोदिया यांच्यावर शाईफेक करण्यात आली आहे. दिल्लीचे नायब राज्यपाल नजीब जंग यांच्या निवासस्थानाबाहेर त्यांच्यावर शाईफेक करण्यात आली.  

आज दुपारी सिसोदिया डेंग्यू आणि चिकुनगुनियाच्या वाढत्या रूग्णांबाबत चर्चा कऱण्यासाठी नजीब जंग यांच्या भेटीला गेले होते. राज्यपालांच्या निवासस्थानाबाहेर सिसोदिया पत्रकारांशी बोलत असताना ब्रजेश शुक्ला या व्यक्तीने त्यांच्यावर शाईफेक केली. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.       

सिसोदिया हे आमच्या पैशांवर परदेशात जातात आणि इकडे दिल्लीचे नागरीक समस्यांना तोंड देत आहेत असं शाईफेक करणा-या आरोपीने म्हटले आहे. काल रात्री उशीरा सिसोदिया फिनलॅंडच्या दौ-याहून परतले. पोलिसांनी आरोपीला ताब्यात घेतले आहे.       

 

 

Web Title: Delhi Deputy Chief Minister Manish Sisodiyanovar Shaypek