शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
2
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
3
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
4
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
5
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
6
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
7
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
8
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
9
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
10
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
11
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
12
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
13
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
14
'ऑपरेशन सिंदूर'चा धसका! वर्ष उलटूनही हाफिज सईद आणि मसूद अजहर बिळांतून बाहेर येण्यास घाबरतायत
15
T20 मध्ये ६९ चेंडूत नाबाद १९५ धावा! आयुष म्हात्रेच्या जागी CSK 'या' धडाकेबाज फलंदाजाला संधी देणार?
16
पश्चिम आशियातील संघर्षामुळे महागाई वाढणार? RBI चे गव्हर्नर संजय मल्होत्रा यांचा इशारा, म्हणाले...
17
"ज्याच्यावर प्रेम केलं तोच राक्षस निघाला"; बापानेच केली जुळ्या मुलींची हत्या, पत्नी म्हणाली, फाशी द्या
18
"हा दिवस आणि ही वेळ कोणत्याही बहिणीवर येऊ नये", सुप्रिया सुळे अजित पवारांच्या आठवणीने प्रचारसभेत भावूक 
19
नवी मुंबई मनपात खळबळ! अतिक्रमण विभागाचे उपायुक्त डॉ. कैलास गायकवाड ४३ हजारांची लाच घेताना अटकेत
20
येत्या २४ तासांत काहीतरी मोठे घडणार! डोनाल्ड ट्रम्प स्वतः इराणसोबत चर्चा करण्याची शक्यता, जेडी वेन्स पाकिस्तानला निघाले...
Daily Top 2Weekly Top 5

"आपने सरकारी तिजोरी रिकामी केली, तरीही…", मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांचे आश्वासन

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 24, 2025 12:02 IST

दिल्लीतील महिलांना पैसे कधी मिळायला सुरुवात होणार असा सवाल, आपकडून सतत विचारला जात आहे. तर ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा होतील, असे भाजप म्हटले आहे.

नवी दिल्ली : दिल्लीत भारतीय जनता पक्षाचे (भाजप) सरकार स्थापन झाले आहे. भाजपने निवडणूक काळात महिलांना आर्थिक मदत करण्याचे आश्वासन दिले होते. यावरून आता आम आदमी पक्ष (आप) आक्रमक झाला आहे. दिल्लीतील महिलांना पैसे कधी मिळायला सुरुवात होणार असा सवाल, आपकडून सतत विचारला जात आहे. तर ८ मार्चपर्यंत महिलांच्या खात्यात २५०० रुपये जमा होतील, असे भाजप म्हटले आहे.

दरम्यान, दिल्लीच्या मागील आप सरकारने सरकारी तिजोरी रिकामी केली आहे, असा आरोप दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी केला आहे. तसेच, महिलांना दरमहा २५०० रुपये देण्याच्या योजनेच्या अंमलबजावणीचा पुनरुच्चार रेखा गुप्ता यांनी  केला आहे. दुसरीकडे, रेखा गुप्ता यांच्या आरोपांना प्रत्युत्तर देताना आप नेत्या आणि माजी मुख्यमंत्री आतिशी म्हणाल्या की, भाजपला आर्थिकदृष्ट्या मजबूत सरकार देण्यात आले आहे. तसेच, कारणं देण्याऐवजी भाजपने आपली आश्वासने पूर्ण करण्यावर लक्ष केंद्रित करावे, असे आतिशी यांनी म्हटले आहे. 

दिल्ली विधानसभेचे पहिले अधिवेशन आज (२४ फेब्रुवारी) सुरू होत आहे. तत्पूर्वी, रेखा गुप्ता यांनी सोमवारी दिल्लीतील नवगठित आठव्या विधानसभेच्या पहिल्या अधिवेशनाआधी प्रदेश कार्यालयात भाजप आमदारांची बैठक घेतली. त्यावेळी त्या म्हणाल्या की, महिला समृद्धी योजनेच्या अंमलबजावणीबाबत अधिकाऱ्यांसमवेत अनेक बैठका झाल्या. या अंतर्गत दिल्लीतील पात्र महिलांना २,५०० रुपये प्रति महिना दिले जाणार आहेत. 

योजना लागू करण्याच्या तयारीबाबत विचारलेल्या प्रश्नाच्या उत्तरात रेखा गुप्ता म्हणाल्या की, मागील सरकारने आमच्यासाठी अशी स्थिती निर्माण केली आहे की, तिजोरीत खडखडाट करून ठेवला आहे. जेव्हा आम्ही वित्तीय स्थितीचा आढावा करण्यासाठी बैठक घेतली तेव्हा ही बाब समोर आली. असे असले तरी आम्ही योजना नक्की लागू करणार आहेत. 

टॅग्स :delhiदिल्लीBJPभाजपा