शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
4
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
5
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
6
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
7
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
8
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
9
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
10
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
11
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
12
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
13
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
14
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
15
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
16
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
17
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
18
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
19
केजीएमयूमध्ये खळबळ: १२वी पास तरूण बनला 'डॉक्टर'; बनावट लेटरहेडचा वापर करून रचला मोठा डाव!
20
"राजकारणात काम करणाऱ्या महिला, नेत्यांसोबत बेड…"; पप्पू यादव यांच्या विधानावर नोटिस जारी, खासदारकी धोक्यात? 
Daily Top 2Weekly Top 5

दिल्लीचे नवे मुख्यमंत्री २० फेब्रुवारीला घेणार शपथ, पण वेळेत बदल...  

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2025 15:57 IST

Delhi CM's grand oath-taking on Feb 20 : या शपथविधी सोहळ्यात ३० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील आणि विशेषतः दिल्लीतील लोक या सोहळ्याचे साक्षीदार असतील.

Delhi CM's grand oath-taking on Feb 20 : नवी दिल्ली : नुकत्याच झालेल्या दिल्ली विधानसभा निवडणुकीत भाजपने विजय मिळवला. यानंतर भाजपकडून अद्याप सत्ता स्थापनेच्या हालचाली सुरु आहेत. दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांचा शपथविधी समारंभ २० फेब्रुवारी रोजी सकाळी ११ वाजता रामलीला मैदानावर होणार आहे. याआधी २० फेब्रुवारीला संध्याकाळी ४.३० वाजता होणार असे म्हटले होते. मात्र, आता वेळेत बदल करण्यात आला आहे. 

हा शपथविधी सोहळा भव्य करण्यासाठी तयारी सुरू आहे. २७ वर्षांनंतर सत्तेत परतलेला भाजप शपथविधी सोहळ्याद्वारे दिल्लीतील जनतेला संदेश देण्याचा प्रयत्न करत आहे की, ते नेहमीच त्यांच्यासोबत आहेत आणि राहतील. या कार्यक्रमासाठी माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि आतिशी यांनाही निमंत्रण पत्रे पाठवली जाणार आहेत. याशिवाय, एनडीए शासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनाही आमंत्रित केले जाणार आहे.

दरम्यान, ज्या राज्यांमध्ये अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे आणि शपथविधीच्या दिवशी अर्थसंकल्प सादर केला जाणार आहे,  त्या राज्यांचे मुख्यमंत्री दिल्लीच्या नवीन मुख्यमंत्र्यांच्या शपथविधी सोहळ्याला उपस्थित राहू शकणार नाहीत, परंतु इतर सर्व एनडीए मुख्यमंत्री उपस्थित राहतील, अशी शक्यता वर्तविण्यात येत आहे. 

या शपथविधी सोहळ्यात ३० हजारांहून अधिक लोक सहभागी होतील आणि विशेषतः दिल्लीतील लोक या सोहळ्याचे साक्षीदार असतील. तसेच, या शपथविधी सोहळ्यात झोपडपट्टीवासीयांसह महिलांनाही आमंत्रण देण्यात आले आहे. याशिवाय, अनेक व्हीव्हीआयपींनाही कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी आमंत्रित केले जात आहे.

दिल्ली विधानसभा निवडणुकीतील विजयानंतर भाजपने अद्याप मुख्यमंत्र्यांच्या नावाबाबत कोणतीही अधिकृत घोषणा केलेली नाही. पण, त्याआधीच शपथविधी सोहळ्याची तयारी जोरात सुरू आहे. २० फेब्रुवारीला सकाळी ११ वाजता रामलीला मैदानावर शपथविधी समारंभात होणार असल्यामुळे संपूर्ण मैदानावर रेड कार्पेट अंथरले जाईल,  असे सांगितले जात आहे.

टॅग्स :delhiदिल्लीdelhi electionदिल्ली निवडणूकBJPभाजपा