दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन बिहारमध्ये? खगडियामध्ये एनआयएची छापेमारी; मेटल डिटेक्टरने घराची तपासणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 30, 2025 15:21 IST2025-11-30T15:21:23+5:302025-11-30T15:21:40+5:30

निवृत्त पोस्टमास्टर मोहम्मद हादी यांच्या घरी सुमारे पाच तास चाललेल्या या तपासामुळे दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासाला मोठे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

Delhi blasts connection in Bihar? NIA raids Khagaria; House inspected with metal detector | दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन बिहारमध्ये? खगडियामध्ये एनआयएची छापेमारी; मेटल डिटेक्टरने घराची तपासणी

दिल्ली बॉम्बस्फोटाचे कनेक्शन बिहारमध्ये? खगडियामध्ये एनआयएची छापेमारी; मेटल डिटेक्टरने घराची तपासणी

दिल्लीतील लाल किल्ल्याजवळ झालेल्या भीषण बॉम्बस्फोटाच्या तपासाचे धागेदोरे आता बिहारपर्यंत पोहोचल्याचे संकेत मिळत आहेत. राष्ट्रीय तपास यंत्रणेच्या टीमने बिहारच्या खगडिया जिल्ह्यातील मानसी पोलीस ठाण्याच्या हद्दीतील सैदपूर गावात रविवारी पहाटे अचानक छापेमारी केली. निवृत्त पोस्टमास्टर मोहम्मद हादी यांच्या घरी सुमारे पाच तास चाललेल्या या तपासामुळे दिल्ली बॉम्बस्फोटाच्या तपासाला मोठे वळण मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

भिंत ओलांडून घरात प्रवेश

पटना येथील एनआयए टीमच्या जवळपास अर्धा डझन अधिकाऱ्यांनी पहाटे ३ वाजण्याच्या सुमारास सैदपूर गावात धडक दिली. छापेमारी दरम्यान कोणताही अनुचित प्रकार घडू नये यासाठी कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली होती. विशेष म्हणजे, ज्यावेळी टीम पोहोचली, त्यावेळी मो. हादी यांच्या घराचे मुख्य गेट बंद होते आणि घरातील सर्व सदस्य झोपलेले होते. सुरक्षा दलाच्या जवानांनी थेट घराच्या दरवाजाची भिंत ओलांडून आधी आत प्रवेश केला. त्यानंतर मुख्य गेट उघडून अधिकारी आत दाखल झाले. घरातील सदस्यांना उठवून त्यांनी आपली ओळख सांगितली आणि घरात कोणताही आक्षेपार्ह वस्तू नाही, याची खात्री करण्यास सांगितले.

मेटल डिटेक्टरने भिंतींचा तपास

सुमारे पाच तास चाललेल्या या तपासणी दरम्यान एनआयएच्या टीमने घरातील प्रत्येक कोपरा तपासला. त्यांनी लॅपटॉप, मोबाईल आणि इतर इलेक्ट्रॉनिक उपकरणांची कसून तपासणी केली. यावेळी सुरक्षा पथकांनी भिंतींना मेटल डिटेक्टर लावून किंवा लावण्याचा प्रयत्न करून घरात कोणतीही स्फोटक वस्तू लपवलेली नाही ना, याची खात्री केली. या अचानक झालेल्या कारवाईमुळे कुटुंबीयांमध्ये एकच खळबळ उडाली होती.

पोस्टमास्टरच्या मुलाचा मोबाईल जप्त

या तपासणीदरम्यान एनआयएच्या टीमने निवृत्त पोस्टमास्टर मो. हादी यांच्या मुलाचा मोबाईल फोन जप्त केला आणि तो आपल्या सोबत घेऊन गेले. तसेच, त्यांच्या मुलाला १ डिसेंबर रोजी पटना येथे येऊन तपासणीत पूर्ण सहकार्य करण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. या छापेमारीमागे १० नोव्हेंबर रोजी लाल किल्ल्याजवळ कारमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाचे कनेक्शन तपासले जात असल्याचे मानले जात आहे. या हल्ल्यात १५ लोकांचा मृत्यू झाला होता. मानसी पोलीस ठाण्याचे प्रमुख दीपक कुमार यांनी एनआयएच्या या छापेमारीच्या वृत्ताला दुजोरा दिला आहे.

Web Title : दिल्ली बम विस्फोट का बिहार में कनेक्शन? खगड़िया में एनआईए का छापा

Web Summary : दिल्ली बम विस्फोट मामले में बिहार कनेक्शन की आशंका। एनआईए ने खगड़िया में एक सेवानिवृत्त पोस्टमास्टर के घर पर छापा मारा, एक मोबाइल फोन जब्त किया और लाल किले के पास दिल्ली विस्फोट से संभावित संबंधों की जांच की।

Web Title : Delhi Bomb Blast Link in Bihar? NIA Raid in Khagaria

Web Summary : NIA suspects a Bihar connection to the Delhi bomb blast. A raid in Khagaria targeted a retired postmaster's home, seizing a mobile phone and investigating possible links to the Delhi blast near Red Fort.