शहरं
Join us  
Trending Stories
1
अनिल अंबानी प्रकरणात मोठी घडामोड! विश्वासू सहकाऱ्याला ईडीने ठोकल्या बेड्या
2
जागतिक व्यापारावर टांगती तलवार! इराणची तिन्ही समुद्र मार्ग बंद करण्याची धमकी; अमेरिकेच्या नाकेबंदीला नाकेबंदीनेच उत्तर
3
IPL 2026: भुवीसह रसीखला 'सलाम'! विराटची 'इम्पॅक्टफुल' खेळी; LSG ला पराभूत करत RCB टॉपला
4
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
5
१०० टक्के फिट नसतानाही जबरदस्त इम्पॅक्ट; पण किंग कोहलीचं अर्धशतक हुकल्यावर अनुष्काचा चेहरा पडला
6
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
7
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
8
IPL 2026 Catch of Tournament : लढवय्या पंतसमोर सॉल्टचा रुबाब! अफलातून झेलसह लुटली मैफील (VIDEO)
9
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
10
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
11
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
12
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
13
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
14
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
15
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
16
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
17
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
18
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
19
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
20
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
Daily Top 2Weekly Top 5

३२ कारमधून चार शहरांमध्ये स्फोट घडविण्याचा दहशतवाद्यांचा होता कट

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 14, 2025 06:50 IST

Delhi Blast Update: केवळ एकच नव्हे तर ३२ विविध कारचा वापर करून देशांतील चार शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा व्यापक कट असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 'ह्युंडई आय २०' व 'फोर्ड इकोस्पोर्ट' या दोन कारमध्ये काही सुधारणा केल्या होत्या.

नवी दिल्ली -  केवळ एकच नव्हे तर ३२ विविध कारचा वापर करून देशांतील चार शहरांमध्ये बॉम्बस्फोट घडवण्याचा दहशतवाद्यांचा व्यापक कट असल्याचे तपास यंत्रणांचे म्हणणे आहे. हे बॉम्बस्फोट घडवण्यासाठी 'ह्युंडई आय २०' व 'फोर्ड इकोस्पोर्ट' या दोन कारमध्ये काही सुधारणा केल्या होत्या. तसेच हे बॉम्बस्फोट घडवून आणण्यासाठी आठ जणांची टीम केली होती. 

कार चालवणारा उमर नबीचदिल्ली स्फोटात वापरलेली कार डॉ. उमर नबी हाच चालवत होता. स्फोटाच्या ठिकाणाहून एकत्र केलेल्या शरीराच्या अवशेषांतून मिळवलेले डीएनए त्याच्या आईच्या डीएनएशी जुळले आहेत. याशिवाय स्फोटांपूर्वीचे एक सीसीटीव्ही फुटेजही तपास यंत्रणांच्या हाती असून उमर नबी स्फोटापूर्वी काही तास रामलीला मैदानाजवळ दिसला होता. स्फोट झालेल्या परिसरातील एका दुकानाच्या छतावर गुरुवारी सकाळी एक तुटलेला मानवी हात सापडला. 

तिसरी कारही जप्तदिल्ली स्फोटाशी संबंधित तिसरी कारही जप्त करण्यात आली असून ती डॉ. शाहीन सईदच्या नावावर आहे. अल-फलाह विद्यापीठातील एका कॉलेजच्या परिसरात उभी होती. स्फोटांपूर्वी रेकी करण्यासाठी या कारचा वापर केल्याचा संशय आहे. या विद्यापीठाच्या परिसरातील ३०हून अधिक कारची चौकशी करण्यात आली असून मेडिकल कॉलेजसह हॉस्टेलच्या परिसरात उभ्या कारच्याही नोंदणी व मालकीविषयी माहिती घेतली जात आहे. यापैकी कारचा वापर स्फोटकांची वाहतूक करण्यासाठी असल्याचे पोलिसांचे म्हणणे आहे. 

स्फोटकांसाठी जमवला २६ लाखांचा निधी‘व्हाइट-कॉलर टेरर मॉड्युल’शी संबंधित डॉ. मुजम्मिल गनई, डॉ. अदील अहमद राथर, डॉ. शाहीन सईद व डॉ. उमर नबी या चौघांनी स्फोटक साहित्य खरेदी करण्यासाठी २६ लाखांपेक्षा अधिक रुपयांचा निधी  गोळा केल्याची बाब तपासात उघड झाली. ही रक्कम सुरक्षित ठेवण्याची व कटात वापरण्याची जबाबदारी डॉ. उमरकडे दिली होती. या रकमेतील तीन लाख रुपयातून २६ क्विंटल एनपीके खत गुरुग्राम, नूंह व अन्य शहरांमधून  खरेदी केले गेले. हे खत आयईडी म्हणून वापरले गेले. 

English
हिंदी सारांश
Web Title : Terrorists Planned Bombings in Four Cities Using 32 Cars

Web Summary : A terror plot to bomb four cities using 32 cars was uncovered. 'Hyundai i20' and 'Ford EcoSport' cars were modified. Eight individuals, including Dr. Umar Nabi, were involved. Funds were raised to purchase explosives, including 26 quintals of NPK fertilizer.
टॅग्स :delhiदिल्लीBlastस्फोट