शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

कडक सलाम! दहशतवाद्यांकडून तुफान गोळीबार सुरू असताना चिमुरड्यासाठी धावला सीआरपीएफ जवान

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 1, 2020 13:01 IST

स्वत:चा जीव धोक्यात घालून वाचवले चिमुरड्याचे प्राण

श्रीनगर: जम्मू-काश्मीरच्या सोपोरमध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या पथकावर हल्ला झाला. त्यामध्ये एका जवानाला वीरमरण आलं. तर एका नागरिकाचा मृत्यू झाला. दहशतवाद्यांसोबत जवानांची चकमक सुरू असताना एक मन हेलावून टाकणारी घटना घडली. ती घटना पाहून अनेकांच्या काळजाचा ठोका चुकला.सोपोरमध्ये दहशतवाद्यांनी सीआरपीएफच्या ताफ्यावर हल्ला केला. दहशतवाद्यांकडून अंदाधुंद गोळीबार सुरू होता. दहशतवाद्यांच्या गोळीबारात एका ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू झाला. त्या मृत व्यक्तीचा तीन वर्षांचा नातू तिथेच होता. आजोबांना जमिनीवर निपचित पडलेलं पाहून नातू त्यांना उठवण्याचा प्रयत्न करू लागला. मात्र आजोबा उठत नसल्याचं पाहून तो रडू लागला. दरम्यान दहशतवाद्यांचा गोळीबार सुरूच होता. त्यामुळे त्या चिमुरड्याच्या जीवालाही धोका होता.चिमुकल्याचा जीव संकटात असल्याचं पाहून सीआरपीएफचा जवान त्याचा जीव वाचवण्यासाठी धावला. त्याला चिमुरड्याला एका हातात घेतलं आणि सुरक्षित ठिकाणी नेलं. चिमुकल्याला घेऊन जात असलेल्या जवानाचा फोटो सध्या सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. यामध्ये चिमुकल्याच्या चेहऱ्यावरची निरागसता, त्याच्या डोळ्यातले अश्रू आणि त्याला समजावण्याचा प्रयत्न करणाऱ्या जवानाच्या चेहऱ्यावरील भाव अगदी स्पष्टपणे दिसत आहेत.दहशतवाद्यांच्या हल्ल्यात आजोबा गमावलेल्या चिमुकल्याचे अश्रू थांबत नव्हते. त्याला त्याच्या कुटुंबीयांकडे नेण्यासाठी पोलिसांनी गाडी सुरू केली. जवानासोबत गाडी असतानाही चिमुकला रडत होता आणि त्याची समजूत काढण्याचे प्रयत्न अगदी अविरतपणे सुरू होते. 'आम्ही तुला तुझ्या आईकडे नेतोय. तुझ्यासाठी बिस्कीट, चॉकलेट आणलंय', अशा शब्दांमध्ये जवान या चिमुकल्याची समजूत काढत होता.काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमीभारताविरोधात पाकनं दोन आघाड्यांवर उघडला मोर्चा; चिनी सैनिक दहशतवाद्यांच्या संपर्कात

टॅग्स :Jammu Kashmirजम्मू-काश्मीरTerror Attackदहशतवादी हल्ला