पाकिस्तानचं भारताविरोधात नवं कारस्थान; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात केले २०००० सैनिक

By ऑनलाइन लोकमत | Published: July 1, 2020 10:56 AM2020-07-01T10:56:23+5:302020-07-01T13:09:12+5:30

पाकिस्तानकडून दोन आघाड्यांच्या युद्धाची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

india china face off pakistan army north ladakh chinese army terrorist talk | पाकिस्तानचं भारताविरोधात नवं कारस्थान; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात केले २०००० सैनिक

पाकिस्तानचं भारताविरोधात नवं कारस्थान; गिलगिट-बाल्टिस्तानमध्ये तैनात केले २०००० सैनिक

Next

नवी दिल्लीः लडाखमधील वास्तविक नियंत्रण रेषे(LAC)वर भारत आणि चीनमधील सुरू असलेल्या तणावाचा फायदा घेण्यासाठी पाकिस्तान प्रयत्नशील आहे. भारतीय गुप्तचर यंत्रणांच्या माहितीनुसार, पाकिस्तानी लष्कराने उत्तर लडाखमध्ये सैन्याची तैनाती वाढवली आहे. त्यासोबतच चिनी सैन्याची दहशतवादी संघटना अल बद्रशी चर्चा सुरू असल्याचीही माहिती समोर आली आहे, गुप्तचर यंत्रणांनी ही माहिती दिली आहे. पाकिस्तानने आपल्या सैनिकांचे दोन गट गिलगिट-बाल्टिस्तान भागात तैनात केले आहेत. उत्तर लडाखमध्ये सुमारे 20 हजार अतिरिक्त सैनिक पाकिस्तानकडून तैनात करण्यात आले आहेत. पाकिस्तानकडून दोन आघाड्यांच्या युद्धाची तयारी सुरू असल्याचे गुप्तचर यंत्रणांचे म्हणणे आहे.

विशेष म्हणजे चिनी सैन्याने जम्मू-काश्मीरमध्ये हिंसाचार पसरवण्यासाठी दहशतवादी संघटना अल बद्र यांच्याशी बोलली सुरू केली आहेत. पाकिस्तानची गुप्तचर संस्था आयएसआय जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवादी कारवाया वाढविण्याची तसेच बॅट ऑपरेशन पुढे नेण्याचा विचार करीत आहे. यासाठी काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या 100 दहशतवाद्यांची मदत घेतली जाऊ शकते, असे सूत्रांचे म्हणणे आहे. जम्मू-काश्मीरमध्ये दहशतवाद्यांविरुद्ध भारतीय सुरक्षा दलांचे अभियान सुरू आहे आणि नुकतेच 120हून अधिक दहशतवाद्यांना ठार करण्यात आलं आहे. ठार झालेल्यांमध्ये काही विदेशी दहशतवादीच होते.

सुरक्षा दलाच्या कारवायांमुळे पाकिस्तानचे सर्वच प्लॅन फिस्कटत आहेत आणि नवीन डावपेचांचा अवलंब केला जात आहे. दोन आघाड्यांवर युद्ध झाल्यास पाकिस्तानने काश्मीरमध्ये उपस्थित असलेल्या दहशतवाद्यांकडून सुरक्षा दलांवर हल्ला करण्याची योजना आखली आहे. या इनपुटनंतर सुरक्षा यंत्रणा सतर्क झाल्या आहेत आणि आवश्यक पावले उचलली जात आहेत.

काश्मीरमध्ये सीआरपीएफच्या पथकावर दहशतवादी हल्ला; एक जवान शहीद, दोन गंभीर जखमी

आज दहशतवाद्यांनी काश्मीरच्या सोपोरमध्ये केंद्रीय राखील पोलीस दलाच्या पथकावर हल्ला केला. यामध्ये एका जवानाला वीरमरण आलं. तर आणखी तीन जण जखमी झाले आहेत. त्यातल्या दोघांची प्रकृती गंभीर आहे. सोपोरमध्ये निगराणी करणाऱ्या सीआरपीएफच्या पथकावर दहशतवाद्यांनी हल्ला केला. त्यामध्ये चार जवान आणि एक नागरिक झाला. त्यांना तातडीनं रुग्णालयात दाखल करण्यात आलं. त्यापैकी एका जवानाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती एएनआयनं दिली. तर दोन जवानांची प्रकृती गंभीर आहे. दहशतवाद्यांच्या हल्ल्यात एका नागरिकाचा मृत्यू झाला आहे.

हेही वाचा

TikTok बंद झाल्यानं Chingariला मिळाली हवा, आनंद महिंद्राही ट्विट करत म्हणाले...

यंदा गणेशोत्सव साजरा करणार नाही; लालबागचा राजा मंडळाचा ऐतिहासिक निर्णय

CoronaVirus : पतंजलीच्या कोरोनिलला अखेर आयुष मंत्रालयाची मान्यता; पण घातली महत्त्वाची अट…

केंद्रीय मंत्रिमंडळात लवकरच खांदेपालट; ज्योतिरादित्य शिंदेंना संधी मिळणार

आजचे राशीभविष्य - 1 जुलै 2020; 'या' राशीच्या व्यक्तींना आजचा दिवस लाभदायी

Web Title: india china face off pakistan army north ladakh chinese army terrorist talk

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.