शहरं
Join us  
Trending Stories
1
तुम्हाला राजकारणात मुलं होत नाही, त्यात आमचा दोष काय?; उद्धव ठाकरेंचा घणाघात
2
रिकामे झाले, दुसरीकडे काम, भाजपचा फॉर्म्युला; अनेक नेत्यांना दुसऱ्या मतदारसंघात पाठवले
3
आरक्षणाची मर्यादा ७३ टक्के करणार, शेतकऱ्यांना कर्जमाफी देऊ; राहुल गांधी यांची पुण्यातील सभेत घोषणा
4
PPF Vs NPS: रिटायरमेंटसाठी कोणता प्लान ठरेल बेस्ट? 'हे' आहेत पीपीएफ आणि एनपीएसचे फायदे
5
एकनाथ खडसेंच्या प्रवेशाला विरोध कशाला असेल ? वार्तालापात विनाेद तावडे यांनी मांडली भूमिका
6
Wipro चे संस्थापक अझीम प्रेमजी बँकिंग क्षेत्रात उतरणार; 'या' बँकेतील हिस्सा खरेदी करण्याच्या तयारीत
7
पहिल्या भाषणानंतर बाळासाहेबांनी दिलेला 'तो' सल्ला राज ठाकरेंनी कायम लक्षात ठेवला
8
अमेठीत २५ वर्षांत प्रथमच मैदानात नसेल गांधी घराणे; बालेकिल्ल्यातून काॅंग्रेसने उमेदवार बदलला, भाजप नेत्यांचे टीकास्त्र
9
उद्धव यांच्या आजारपणात मोदी करायचे विचारपूस ; पंतप्रधानांच्या विधानावर राजकीय टोलेबाजी सुरू
10
खासदारांना डावलून आमदार रिंगणात, नव्या चेहऱ्यांमुळे चुरस; रणनीती ठरणार का यशस्वी?
11
सरकारने सर्वसामान्यांचे जगणे मुश्कील केले; आदित्य ठाकरेंचा हल्लाबोल
12
आजचे राशीभविष्य - ४ मे २०२४; आज आपणास खूप मोठा आर्थिक लाभ होईल
13
रावसाहेब दानवे षटकार मारणार ? जालन्यात चुरशीची लढाई, भाजपचा वरचष्मा; मविआ कमकुवत!
14
तिकीट तर कापले, आता पुनर्वसनाचा प्रश्न, महायुतीने १२ विद्यमान खासदारांना बसवले घरी
15
शेतकरी संकटात असताना केंद्राकडून सत्तेचा गैरवापर सुरू ; शरद पवार यांची टीका
16
जादूटोण्याच्या संशयातून दोघांना जिवंत जाळले; घरात मृत्युसत्र, १५ जणांना अटक
17
मुंबईत मराठी टक्का कोणाच्या फायद्याचा? मराठी मते आपल्याच झोळीत पाडून घेण्यासाठी घमासान रंगणार
18
भाजपने १२ केंद्रीय मंत्र्यांना तिकीट नाकारले; निकालावर ११ केंद्रीय मंत्र्यांचे भवितव्य ठरणार
19
ॲड. उज्ज्वल निकम २८ कोटींचे मालक; एक कार, अंधेरी, जळगाव आणि दहिसर येथे घरे
20
आता ‘त्या’ महिलेच्या अपहरणाचाही गुन्हा दाखल; पाच दिवसांपासून बेपत्ता असल्याची तक्रार दाखल

कोर्ट मॅरेज आता होणार अधिक सोपे

By ऑनलाइन लोकमत | Published: January 14, 2021 5:19 AM

आंतरधर्मीय विवाहेच्छुकांना दिलासा

लोकमत न्यूज नेटवर्क लखनऊ : आंतरधर्मीय विवाह करण्यासाठी इच्छुक असलेल्या जोडप्यांना अलाहाबाद उच्च न्यायालयाने नववर्षात एक सुवार्ता दिली आहे. विवाह नोंदणी कार्यालयात नोंदणी केल्यानंतर त्यासंदर्भातील नोटीस कार्यालयाने जारी करावी की नाही, हे ठरविण्याचा संपूर्ण अधिकार विवाहेच्छुक जोडप्याला असेल, असा महत्त्वपूर्ण निकाल अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिला आहे. विशेष म्हणजे उत्तर प्रदेश सरकारने अलीकडेच बेकायदेशीररीत्या धर्मांतर घडवून आणण्याविरोधात कायदा पारित केल्याच्या पार्श्वभूमीवर हा निकाल जाहीर झाला आहे. 

१९५४च्या विशेष विवाह कायद्यान्वये आंतरधर्मीय विवाह करण्याची इच्छा असलेल्या जोडप्याला विवाह नोंदणी कार्यालयातील जिल्हा विवाह अधिकाऱ्याकडे ३० दिवस आधी नोंदणी करावी लागते. त्यानंतर विवाह नोंदणी कार्यालय या विवाहाला कोणाचा काही आक्षेप आहे किंवा काय, हे जाणून घेण्यासाठी आंतरधर्मीय विवाहासंदर्भातील नोटीस प्रकाशित करते. नोटीस प्रकाशित झाल्यानंतर त्यावर आक्षेप नोंदविण्यासाठी ३० दिवसांचा कालावधी असतो. यादरम्यान जर कोणी आक्षेप नोंदविला नाही तर विवाह नोंदणी कार्यालयात आंतरधर्मीय विवाह सोहळा पार पडतो. मात्र, अलाहाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानुसार आता विवाह नोंदणी कार्यालयाने ही नोटीस जारी करावी किंवा कसे, याचा संपूर्ण अधिकार विवाहेच्छुक जोडप्याला असेल. नोटीस जारी करावी की केली जाऊ नये, यासंदर्भातील लेखी सूचना विवाहेच्छुक जोडपे विवाह नोंदणी कार्यालयात सादर करू शकतात. इस्लाम धर्माचा त्याग करून हिंदू मुलाशी विवाह करण्यास इच्छुक असलेल्या एका महिलेच्या याचिकेवर सुनावणी करताना अलाहाबाद उच्च न्यायालयाने वरील महत्त्वपूर्ण निकाल दिला. 

निकाल देताना कोर्टाने नोंदविलेली निरीक्षणेnअशा प्रकारची नोटीस जारी करणे हे स्वातंत्र्य आणि खासगीपणा जपण्याच्या हक्कांचा संकोच आहे.nविशेष विवाहाची नोटीस जारी करणे म्हणजे जोडप्याच्या खासगीपणाचा भंग आहे.nतसेच अशा प्रकारांमुळे संबंधितांवर उगाचच सामाजिक दबाव वगैरे निर्माण होण्याचा धोका असतो.nविवाह कोणाशी करावा, हे ठरविण्याच्या अधिकाराचे हे हनन ठरते.

टॅग्स :Courtन्यायालयmarriageलग्न