शहरं
Join us  
Trending Stories
1
देशाला अंधारात बुडवून मुनीर इराणला, शाहबाज सौदीला...! पाकिस्तान सरकारने मागितली जनतेची माफी...
2
धक्कादायक! 'बॉडी मसाज'च्या नावाखाली अंगावर नाचला; लातूरमध्ये तरुणाचा मणका सरकला, एकावर गुन्हा दाखल
3
वाराणसीत स्मार्ट मीटरचा कहर! २ युनिट वापराचे आले २००० बिल; दाद मागणाऱ्याची वीजच कापली, ग्रामीण भागातील जनता संतप्त
4
Pune Water Supply: पुणे शहरात गुरुवारी पाणी येणार; टँकर चालकांच्या संपामुळे 'पाणीपुरवठा बंद' पुढे ढकलला
5
'इराण आणि अमेरिकेमध्ये चर्चा सुरू आहे का, पाकिस्तानची आता भूमिका काय?', परराष्ट्र मंत्र्यांनी दिले उत्तर
6
इराणचे जहाज अचानक गुजरातच्या किनाऱ्यावर! भारतीय रिफायनरींचा तेल खरेदीस नकार; काय आहे नेमके कारण?
7
इराणवर हल्ला केला अन् अंदाज चुकला, "अपेक्षाच केली नव्हती...", ट्रम्प यांचा खळबळजनक दावा
8
Rishabh Pant Injured : अरे देवा; हे काय घडलं? हेजलवूडच्या वेगवान चेंडूवर रिषभ पंत जायबंदी; मैदान सोडण्याची आली वेळ
9
प्रशिक्षणावेळी हिंदू देवतांविषयी अपमानजनक टिप्पणी करायचे; TCS प्रकरणात मोठा खुलासा
10
विनोद कांबळीच्या मेंदूत रक्ताची गाठ; मित्राने केला धक्कादायक खुलासा, ब्रेन स्ट्रोकचा मोठा धोका!
11
रिषभ पंतच्या LSG चा सेम गेम प्लॅन; RCB कडून किंग कोहली फक्त बॅटिंगला येणार? पहिल्यांदाच असं घडलं
12
सावधान! गुगल क्रोमवरची एक चूक अन् तुमची बँक खाती होतील रिकामी; केंद्र सरकारचा हाय-अलर्ट!
13
भाजपाचे सहा, तर शिंदेसेनेला एक जागा, नागपूर मनपातील भाजपाच्या स्विकृत सदस्यांच्या नावांची घोषणा
14
अमेरिकेची माघार!४८ तासांतच होर्मुजची नाकेबंदी संपली; डोनाल्ड ट्रम्प यांनी केली मोठी घोषणा!
15
MI ला मोठा धक्का! रोहित शर्मा पंजाब विरुद्धच्या सामन्यातून बाहेर; वानखेडेवर रंगणार हाय-व्होल्टेज ड्रामा
16
ट्रम्प नरमले! अमेरिका-इराणमध्ये आणखी दोन आठवड्यांचा युद्धविराम होण्याची शक्यता, चर्चेसाठी ३ मुद्दे महत्वाचे
17
अकोल्यात उष्माघाताचा पहिला बळी? ४४ अंश तापमानाने घेतला जीव; ऑटोमध्ये आढळला मृतदेह
18
तुर्कीमधील शाळेत गोळीबार, ४ जणांचा मृत्यू, २० जखमी; दोन दिवसांतील दुसरी घटना
19
हात पकडून जवळ खेचले, मग Kiss केले आणि शरीरसंबंध ठेवले; TCS प्रकरणातील पीडितेचा थरारक अनुभव
20
इराणच्या अणू हक्कासाठी रशियाची एन्ट्री! युरेनियम समृद्धीकरणाला पुतिन यांचा पाठिंबा; अमेरिकेचा दबाव झुगारला
Daily Top 2Weekly Top 5

बोअरवेलच्या कामात भ्रष्टाचार...जोड आहे

By admin | Updated: April 18, 2015 01:43 IST

जिल्हा परिषद : पाणी नसलेल्या बोअरवेलवर बसविले हातपंप

जिल्हा परिषद : पाणी नसलेल्या बोअरवेलवर बसविले हातपंप
नागपूर : जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात तातडीच्या उपायोजना म्हणून मोठ्या प्रमाणात बोअरवेलची कामे करण्यात आली आहेत. परंतु निविदातील निकषानुसार खोदकाम झालेले नाही. काही ठिकाणी पाणी नसतानाही हातपंप बसवून कंत्राटदारांनी लाखो रुपयांचा भ्रष्टाचार केल्याचा आरोप शुक्रवारी विरोधी सदस्यांनी जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या बैठकीत केला.
जिल्ह्यातील टंचाईग्रस्त गावात पाणीपुरवठा विभागामार्फ त ५२ बोअरवेलची कामे करण्यात आली. अनेक ठिकाणी पाणी नसलेल्या बोअरवेलवर हातपंप बसविण्यात आले. यासाठी निविदातील निकष डावलून कमी जाडीच्या पाईपचा वापर करण्यात आला. तांत्रिक विभागाच्या अधिकाऱ्यांनी या कामाची पाहणी न करता लाखो रुपयांची बिले मंजूर केल्याचा आरोप विरोधी पक्षनेते मनोहर कुंभारे यांनी केला. या प्रकरणाची चौकशी करून दोषी अधिकाऱ्यांकडून बोगस बिलाची वसुली करण्यात यावी, अशी मागणी त्यांनी केली.
आता चौकशी केली तरी बोअरवलेची कामे निकषानुसार झाली की नाही याची शहानिशा शक्य नाही. खोदकाम करतानाच संबंधित विभागाच्या अधिकाऱ्यांनी त्याची तपासणी करणे गरजेचे होते, परंतु याकडे दुर्लक्ष करण्यात आले. बोगस कामामुळे कंत्राटदारांनी शासकीय दराच्या तुलनेत २५ ते ३० टक्के कमी दराने कामे केल्याचे विरोधी सदस्यांनी निदर्शनास आणले.
चार महिन्यांपूर्वी स्थायी समितीने या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश दिले होते. परंतु चौकशी न करता कंत्राटदारांना बिले देण्यात आली. काही कंत्राटदारांकडे बोअरवेलच्या दोन गाड्या असताना वेगवेगळ्या नावाने निविदा सादर करून सहा गाड्या असल्याचे दर्शविले आहे. सदस्य आक्रमक झाल्याने या प्रकरणाची चौकशी करून यात दोषी आढळल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्याचे निर्देश अध्यक्ष निशा सावरकर यांनी दिले. उपाध्यक्ष शरद डोणेकर, सभापती आशा गायकवाड, उकेश चव्हाण, पुष्पा वाघाडे, दीपक गेडाम, सदस्य रूपराव शिंगणे, मुख्यकार्यकारी अधिकारी शिवाजी जोंधळे यांच्यासह विभागप्रमुख उपस्थित होते.(प्रतिनिधी)
चौकट....
निवृत्तीलाभ देताना भ्रष्टाचार
जि.प.सेवेतून कर्मचारी सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांना देय असलेले लाभ मंजूर करताना संबंधित कर्मचारी सेवानिवृत्त झालेल्या कर्मचाऱ्यांकडे पैशाची मागणी करतात. त्याशिवाय प्रकरणे निकाली काढत नाही. कर्मचारीच कर्मचाऱ्यांचे आर्थिक शोषण करीत आहेत. यासाठी १५ ते २० कर्मचाऱ्यांची प्रकरणे प्रलंबित आहेत. काही कर्मचाऱ्यांच्या सेवापुस्तिका गहाळ करण्यात आल्याच्या मुद्यावरून सदस्यांनी अधिकाऱ्यांना धारेवर धरले. या प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश सावरकर यांनी दिले.